Income Tax Return : नवी दिल्ली : प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची (ITR Filing) अंतिम मुदत 31जुलै 2022 ही आहे. 2021-22 या आर्थिक वर्षासाठीची म्हणजे 2022-23 या मूल्यांक वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्या अवघा एकच दिवस राहिला आहे. प्राप्तिकर विभागाच्या (Income Tax Department)वेबसाइटवर दिलेल्या ताज्या अपडेटनुसार, 4.52 कोटी लोकांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरले आहेत. तर 3.41 कोटी परताव्याची पडताळणी झाली आहे. काही करदात्यांनी ई-फायलिंग वेबसाइट योग्यरित्या काम करत नसल्याच्या तक्रारी देखील केल्या आहेत आणि शेवटची तारीख वाढवण्याची मागणी केली आहे. मात्र, अंतिम तारीख वाढवण्यास विभागाने स्पष्ट नकार दिला आहे. (More than 4.5 ITR filed but there will be extension for ITR filing deadline)
यासोबतच सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचे विलंब शुल्क टाळण्यासाठी 31 जुलैपर्यंत आयटीआर दाखल करण्याचे आवाहन प्राप्तिकर विभागाने केले आहे. दुसरीकडे महसूल सचिव तरुण बजाज यांनी म्हटले आहे की, आयटीआर दाखल करण्याची तारीख 31 जुलैच्या पुढे वाढवण्याचा कोणताही विचार नाही. ते म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून परिस्थिती सामान्य नसल्यामुळे आणि कोरोना महामारीचे संकट असल्यामुळे शेवटची तारीख वारंवार वाढवण्यात आली होती.
अधिक वाचा : Uddhav Thackeray Mumbai: 'राज्यपाल कोश्यारींना कोल्हापुरी जोडे दाखवा', उद्धव ठाकरेंची जहरी टीका
आम्ही तुम्हाला सांगतो की, गेल्या आर्थिक वर्षात (2020-21), वाढीव तारखेसह 31 डिसेंबर 2021 पर्यंत एकूण 5.89 कोटी ITR दाखल करण्यात आले होते. यापूर्वी 2019-20 या आर्थिक वर्षातही 5.95 कोटी लोकांनी आयटीआर भरले होते. यावेळी 29 जुलैपर्यंत हा आकडा 4.5 कोटींच्या पुढे गेला आहे. यामध्ये 3.41 कोटी रिटर्न्सची पडताळणीही झाली आहे. शेवटच्या तारखेपर्यंत हा आकडा 5.5 कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.
तरुण बजाज यांच्या मते, गेल्या वर्षी शेवटच्या तारखेला रिटर्न भरणाऱ्यांची संख्या 50 लाखांहून अधिक होती. पण, यावेळी 1 कोटीहून अधिक करदात्यांनी शेवटच्या तारखेला रिटर्न भरणे अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत आम्ही आमच्या टीमला तयार राहण्यास सांगितले आहे. प्रणाली अतिरिक्त भार वाहून नेण्यास सक्षम आहे म्हणून तारीख वाढविण्याचा कोणताही विचार केला गेला नाही.
अधिक वाचा : Arjun Khotkar Shivsena पत्रकार परिषदेत माजी मंत्री रडत रडत म्हणाले.....
तुम्हाला कार्यालयातून फॉर्म-16 मिळाला असेल, तर विलंब न करता तो भरा. तुम्ही 31 जुलै 2022 नंतर आयटीआर फाइल केल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल.
महसूल सचिव तरुण बजाज यांनी केंद्र सरकार प्राप्तिकर विवरणपत्र (ITR) भरण्याची अंतिम तारीख वाढविण्याचा विचार करत नसल्याचे सांगितल्यानंतर, हे जवळजवळ निश्चित झाले आहे की आयटीआर भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै आहे. ही अंतिम मुदत वैयक्तिक करदात्यांना लागू आहे. ज्यांच्या खात्यांचे ऑडिट करणे आवश्यक नाही. प्राप्तिकर कायद्यानुसार, उशीरा आयटीआर दाखल केल्यास 5,000 रुपयांपर्यंत उशीरा फाइलिंग शुल्क लागू केले जाते. मात्र लहान करदात्यांना, जर उत्पन्न 5 लाख रुपयांच्या पुढे जात नसेल तर विलंब भरण्याचे शुल्क 1,000 रुपये आहे.