Resetting life goals | कोरोनानंतर ९४ टक्के भारतीयांनी बदलली आयुष्यातील उद्दिष्टे, आरोग्यास सर्वाधिक प्राधान्य

Priorities of Indians | स्टॅंडर्ड चॅर्टर्डने नुकताच प्रसिद्ध केलेल्या 'वेल्थ एक्सपेटन्सी रिपोर्ट २०२१' (Wealth Expectancy Report 2021) मध्ये कोरोनानंतर बदललेल्या मानसिकेचे विश्लेषण केले आहे. या अहवालात म्हटले आहे की कोरोना महामारीनंतर ९४ टक्के भारतीयांनी (Indian have changed their life goals)त्यांच्या आयुष्यातील उद्दिष्टे बदलली आहेत. जवळपास ४८ टक्के लोकांचा त्यांच्या पैशांवरील विश्वास डळमळला आहे.

priorities after corona
कोरोनाने बदलली भारतीयांची उद्दिष्टे 
थोडं पण कामाचं
  • कोरोनाच्या संकटाचा भारतीयांच्या मनावर खोल परिणाम
  • बहुतांश भारतीयांकडून आयुष्यातील उद्दिष्टांमध्ये बदल
  • आरोग्यास प्राधान्य देण्यास सुरूवात

Reseting life goals | नवी दिल्ली : कोरोनानंतर (Corona pandemic)बहुतांश भारतीय आता आरोग्यास प्राधान्य देऊ इच्छितात. स्टॅंडर्ड चॅर्टर्ड  (Standard Chartered) या ब्रिटिश मल्टीनॅशनल बॅंकिग अॅंड फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने नुकताच प्रसिद्ध केलेल्या 'वेल्थ एक्सपेटन्सी रिपोर्ट २०२१' (Wealth Expectancy Report 2021) मध्ये कोरोनानंतर बदललेल्या मानसिकेचे विश्लेषण केले आहे. या अहवालात म्हटले आहे की कोरोना महामारीनंतर ९४ टक्के भारतीयांनी (Indian have changed their life goals)त्यांच्या आयुष्यातील उद्दिष्टे बदलली आहेत. जवळपास ४८ टक्के लोकांचा त्यांच्या पैशांवरील विश्वास डळमळला आहे. त्यामुळे फक्त पैसा असणे पुरेसे नसते या जाणीवेने त्यांनी आपल्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. (Most of the Indians have changed their priorities after corona, health at top)

कोविडने बदलला लोकांचा दृष्टीकोन आणि प्राधान्य

स्टॅंडर्ड चॅर्टर्डच्या नव्या अहवालानुसार कोविड-१९च्या संकटाचा भारतातील श्रीमंत किंवा सधन वर्गावर मोठा परिणाम झाला आहे. या वर्गाने आता भविष्यातील बाबींबद्दल आपला प्राधान्यक्रम बदलला आहे. कोरोनानंतर ४२ टक्के लोकांचे सर्वात वरचे उद्दिष्ट आता त्यांच्या आरोग्यात सुधारणा करणे, आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे हे झाले आहे. तर ३९ टक्के लोकांनी भविष्यातील मोठ्या संकटांना तोंड देण्यासाठी आर्थिकदृष्ट्या तयार राहण्यास प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. तर दुसऱ्या बाजूला ३७ टक्के लोकांनी त्यांच्या अपत्यांच्या भविष्यासाठी त्यांना अधिक शैक्षणिक किंवा आर्थिक मदत करण्याचे ठरवले आहे.

आर्थिक नियोजनावर आता भर

कोरोनानंतर आयुष्याबद्दलच्या बदलल्या दृष्टीकोनामुळे श्रीमंत किंवा सधन वर्गाला त्यांच्या संपत्तीची वाढ करण्यासाठी वेगळी धोरणे राबवण्याची आवश्यकता वाटते आहे. यामध्ये फक्त बचत करण्याऐवजी सकारात्मकपणे गुंतवणूक करण्याचा समावेश आहे. अर्थात सध्या जास्त जोखीम घेण्यास हा वर्ग टाळत आहे. आपल्या संपत्तीचे नियोजन आणि आर्थिक नियोजन यावर त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे.

अनेकांनी केलेल्या उशीराच्या रिटायरमेंट प्लॅनिंगमुळेदेखील कोरोनासंकट काळात त्यांच्यावरील जोखीम वाढली होती. असे आढळून आले आहे की ३३ टक्क्यांनी निवृत्तीनंतरच्या नियोजनासाठी अद्यापद बचतच सुरू केलेली नाही. तर ४३ टक्के सधन भारतीय आपल्या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर रिटायरमेंट काळात अवलंबून आहेत. यात पुढे असे दिसून आले की ५४ टक्क्यांनी ६५ वर्षांपर्यत पोचण्याआधीच रिटायर होण्याचे प्लॅनिंग केले आहे तर मागील १८ महिन्यात २० टक्के भारतीयांनी लवकर रिटायर होणे याचा आपल्या आर्थिक उद्दिष्टात समावेश केला आहे.

कोरोनामुळे लोकांच्या आत्मविश्वासात घसरण

सधन भारतीयांनी पैसे हाताळण्याच्या बाबतीत किंवा आर्थिक बाबींवर नियंत्रण मिळवण्यासंदर्भातदेखील विचार करण्यास सुरूवात केली आहे. ते आपल्या गुंतवणुकीत वैविध्य आणत आहेत. आपला पोर्टफोलिओ संतुलित करण्यासाठी नव्याने प्रयत्न करत आहेत. दीर्घकालीन आणि शाश्वत गुंतवणूक प्रकार पाहत आहेत. २७ टक्के शेअर बाजारातील ट्रेडिंगकडे वळले आहेत. जवळपास ९९ टक्के भारतीय गुंतवणुकदारांनी पाच किंवा त्यापेक्षा जास्त पावले  आपल्या गुंतवणुकीसंदर्भात उचलली आहेत. मागील वर्षभरात गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओसंदर्भात पावले उचलून देखील जवळपास निम्म्या लोकांचा यासंदर्भातील आत्मविश्वास कमी झाला आहे. या अहवालासाठी स्टॅंडर्ड चार्डर्डने आशिया, आफ्रिका, पश्चिम आशिया आणि इंग्लंडमधील नागरिकांचा अभ्यास केला. यासाठी त्यांनी श्रीमंत, नवश्रीमंत, श्रीमंत होऊ पाहणाऱ्या नागरिकांचा अभ्यास केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी