MPSC : मोठी नोकरभरती! एमपीएससीकडून 800 ‘दुय्यम निबंधक’पदांसाठीची जाहिरात, पाहा विस्ताराने

MPSC secondary registrar recruitment : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC)नोकरभरतीची जाहिरात देण्यात आली आहे. यानुसार तब्बल 800 पदांची जाहिरात देण्यात आली असून ही दुय्यम निबंधक पदांसाठीची (secondary registrar) नोकरभरती असणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ ची जाहिरात देण्यात आली आहे. त्यामुळे इच्छूक तरुणांना मोठी संधी मिळणार आहे. एमपीएससीकडून सहसा या प्रकारची नोकरभरती केली जात नाही. दुय्यम निबंधक पदांसाठीची परीक्षादेखील लवकरच घेतली जाणार आहे.

MPSC Recruitment
एमपीएससीकडून दुय्यम निबंधकांची भरती 
थोडं पण कामाचं
  • एमपीएससीकडून मोठी नोकरभरती
  • 800 दुय्यम निबंधक पदांसाठी एमपीएससीची जाहिरात
  • 1994 नंतर प्रथमच या पदांसाठी एमपीएससीकडून नोकरभरती

MPSC Recruitment : मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC)नोकरभरतीची जाहिरात देण्यात आली आहे. यानुसार तब्बल 800 पदांची जाहिरात देण्यात आली असून  ही दुय्यम निबंधक पदांसाठीची (secondary registrar) नोकरभरती असणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ ची जाहिरात देण्यात आली आहे. त्यामुळे इच्छूक तरुणांना मोठी संधी मिळणार आहे. एमपीएससीकडून सहसा या प्रकारची नोकरभरती केली जात नाही.  दुय्यम निबंधक पदांसाठीची परीक्षादेखील लवकरच घेतली जाणार आहे. यासंदर्भातील वेळापत्रकदेखील एमपीएससीने जाहीर केले आहे. यासंदर्भात विस्ताराने जाणून घ्या.(MPSC publishes advertisement for recruitment of 800 posts of secondary registrar)

अधिक वाचा : IAF Agniveer Job 2022: अग्निवीरांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या कधीपर्यंत आणि कसा करायचा अर्ज 

1994 नंतर पहिल्यांदाच दुय्यम निबंधकांसाठी भरती

दुय्यम निबंधक पदांसाठीच्या नोकरभरती प्रक्रियेसंदर्भात एमपीएससीचे सहसचिव सुनील अवताडे यांनी माहिती देताना म्हटले आहे की 1994 नंतर मुद्रांक आणि नोंदणी विभागातील दुय्यम निबंधक संवर्गाची पदभरती झालेली नव्हती. ही पदे एमपीएससीच्या कक्षेत आणण्याची प्रक्रिया राबवण्यात आली. आता पहिल्यांदाच या पदाची भरती प्रक्रिया एमपीएससीमार्फत राबवली जाईल.

अधिक वाचा : बँकांच्या संपाबाबत मोठा निर्णय, युनियननी केली घोषणा

पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा कधी होणार

एमपीएससीच्या जाहिरातीवर तरुणांचे मोठे लक्ष असते. लाखोंच्या संख्येने तरुण राज्यभरातून एमपीएससीद्वारे भरती केल्या जाणाऱ्या विविध पदांसाठी तयारी करत असतात आणि परीक्षा देत असतात. एमपीएससीच्या नव्या जाहिरातीनुसार 8 ऑक्टोबरला दुय्यम निबंधकांच्या पदांसाठीची पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. राज्यातील विविध 37 केंद्रावरून ही परीक्षा घेतली जाणार आहे. पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे. दुय्यम निबंधकांच्या पदांसाठीची मुख्य परीक्षा डिसेंबर महिन्यात घेतली जाण्याची शक्यता आहे. एमपीएससीकडून भरती केल्या जाणाऱ्या पदांमध्ये  पोलीस उपनिरीक्षक गट ब या संवर्गातील 603 पदांची, दुय्यम निबंधक संवर्गातील 78 पदांची, सहायक कक्ष अधिकारी गट ब या संवर्गातील 42 पदांची, राज्य कर निरीक्षक गट ब या संवर्गातील 79 पदांची नोकरभरती केली जाणार आहे.

अधिक वाचा : Hotel Bill : हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये गेल्यास या गोष्टीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, मोठे बिल आल्यास करा हे काम...

अर्ज कसा आणि कधी करायचा

या विविध पदांसाठी इच्छूक असलेल्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. यासाठीची मुदत 25 जून ते 15 जुलै दरम्यानची असणार आहे. या कालावधीत ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे. एमपीसीएसीकडून दरवर्षी नोकरभरती केली जाते. मात्र अलीकडच्या काही वर्षात यातील पदांची संख्या कमी झाल्याचे दिसते. अर्थात या बदल होऊ शकतो किंवा पूर्वपरीक्षेनंतरदेखील शासनाकडून अतिरिक्त पदांची मागणी झाल्यास तीदेखील विचारात घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

एमपीएससीकडून भरती केल्या जाणाऱ्या पदांवर तरुणांचे विशेष लक्ष असते. कारण ही पदे प्रशासनातील महत्त्वाची पदे असतात आणि त्यात करियरची उत्तम संधी असते. एमपीएससीकडून सर्वसाधारणपणे पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा घेत नोकरभरती केली जाते. अधिक माहितीसाठी एमपीएससीच्या वेबसाईटवर जाऊन जाहिरात पाहता येईल.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी