Maharashtra State Cooperative Bank Recruitment 2022 : मुंबई : तुम्हाला जर बॅंकेत करियर करायचे असेल तर तुमच्यासाठी मोठी संधी चालून आली आहे. चांगले पद आणि चांगला पगार देणारी बॅंकेतील नोकरी तुम्हाला मिळू शकते. महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेत विविध पदांसाठी मोठी नोकरभरती होते आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSC Bank) ने पदवीधर तरुणांसाठी प्रशिक्षणार्थी अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी लिपिक या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट mscbank.com/careers वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 मे 2022 ही आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेतील नोकरभरतीविषयी माहिती जाणून घेऊया. (MSC bank recruitment for gradutaes for various positions)
प्रशिक्षणार्थी लिपिक - 166
प्रशिक्षणार्थी अधिकारी - 29
प्रशिक्षणार्थी लिपिक: किमान 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.
प्रशिक्षणार्थी अधिकारी - कोणत्याही शाखेतील किमान 60% गुणांसह पदवीधर. JAIIB/CAIIB उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. आणि दोन वर्षांचा अनुभव.
प्रशिक्षणार्थी लिपिक - प्रशिक्षण कालावधी दरम्यान रु. 15,000/- प्रति महिना.
प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, प्रशिक्षणार्थी लिपिक यांना बँकेच्या नियमित श्रेणीमध्ये नियुक्त केले जाईल. 30,000/- प्रति महिना उपलब्ध असेल.
प्रशिक्षणार्थी अधिकारी - प्रशिक्षण कालावधी दरम्यान प्रति महिना 20,000 रु. /-.
प्रशिक्षण कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर, प्रशिक्षणार्थी अधिका-यांना बँकेच्या नियमित श्रेणीत स्थान दिले जाईल आणि त्यांना सुमारे 45,000 रु./- दरमहा वेतन दिले जाईल.
प्रशिक्षणार्थी लिपिक - 21 ते 28 वर्षे
प्रशिक्षणार्थी अधिकारी - 23 ते 32 वर्षे
निवड - ऑनलाइन लेखी परीक्षेच्या आधारे.
अधिक वाचा : 7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून पुन्हा मोठी भेट, जुलै मध्ये पुन्हा होणार महागाई भत्त्यात वाढ
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ऑनलाइन अर्जाची नोंदणी सुरू करण्याची तारीख: 05 मे 2022
अर्ज शुल्क ऑनलाइन भरण्याची शेवटची तारीख: 25 मे 2022
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रवेश पत्र तारीख: 10 दिवस आधी
एमएससी बँक परीक्षेची तारीख: जुलै 2022 चा पहिला आठवडा
प्रशिक्षणार्थी लिपिक - 1,180 रु. /- (जीएसटीसह)
प्रशिक्षणार्थी अधिकारी - 1,770 रु./- (जीएसटीसह)
महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक ही महाराष्ट्रातील अग्रगण्य बॅंक आहे. शिवाय ही राज्य सहकारी बॅंक असल्यामुळे यात करियरची उत्तम संधी आहे. बॅंकेतील नोकरी ही एरवीदेखील उत्तम करियर समजली जाते. त्यातच जर राज्य सहकारी बॅंकेतच नोकरी करण्याची संधी मिळत असेल तर फारच उत्तम. तुम्हाला जर बॅंकेत करियर करायचे असेल तर वेळेत अर्ज करून तुम्ही परीक्षा देऊ शकता. पदवीधरांसाठी ही मोठी संधी आहे.