Pradhan Mantri Mudra Yojana: जर तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा असलेला व्यवसाय
(Business) वाढवायचा आहे, पण भांडवलाअभावी तुम्ही ते शकत नाहीत. तर काळजी मग करण्याची गरज नाही. कारण भारत सरकार (Government of India) एका योजनेतून तुमची पैशाची चिंता मिटवणार आहे. तुमचा व्यवसाय वाढविण्यासाठी पाच -पन्नास नाही तर तब्बल 10 लाख रुपयांची मदत करणार आहे. मग जाणून घ्यायचं ना सरकारच्या योजनेबद्दल. मग स्कीप करता हा लेख वाचा या लेखाच्या मदतीने तुम्ही तुमच्या व्यवसायात मोठी भरारी घेऊ शकतात. (want grow your business? the government will provide a loan of rs 10 lakh)
अधिक वाचा : वाघाचे फोटो काढताना रवीना टंडनने मोडला नियम
तर ही योजना आहे, प्रधानमंत्री मुद्रा योजना योजना (PMMY)आहे, ज्या अंतर्गत भारत सरकार व्यवसाय सुरू करण्यासाठी 10 लाख रुपयांचे कर्ज देते. योग्यप्रकारे अर्ज केल्यास या योजनेचा लाभ आपल्याला लगेच मिळू शकतो. कोणताही भारतीय नागरिक त्याचा/तिचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना (PMMY)अंतर्गत कर्जासाठी अर्ज करू शकतो.
अधिक वाचा : मुंबईतील बड्या नेत्याने सोडले ठाकरेंचे शिवबंधन
नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि वाढविण्यासाठी या कर्जाच्या पैसाचा उपयोग करू शकतात. हे कर्ज घेण्यासाठी तुम्ही बँका, NBFC किंवा मायक्रोफायनान्स कंपन्यांमार्फत अर्ज करू शकता. जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला आणि तुम्हाला कर्ज मंजुर झाले तर हे कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला 5 वर्षाचा कालावधी दिला जातो. यासाठी मुद्रा कार्ड दिले जाते. सरकारद्वारे मुद्रा योजना तीन प्रकरात दिले जाते. एक म्हणजे शिशु योजना यात 50 हजार रुपयांचे कर्ज मिळते. त्यानंतर येते किशोर योजना 50 हजार ते 5 लाख रुपयांचे कर्ज मिळत असते. त्यानंतर तरुण योजना यात 5 ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळत असते.
अधिक वाचा : द काश्मीर फाईल्स म्हणजे असभ्य चित्रपट -IFFI ज्युरी प्रमुख
http://www.mudra.org.in/