Gautam Adani यांची संपत्ती घटली!, Mukesh Ambani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

Forbes World Billionaire List-2023: अमेरिकन शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत झपाट्याने घट झाली. त्यामुळे नुकत्याच फोर्ब्सने प्रदर्शित केलेल्या वर्ल्ड अब्जाधीश यादीत अदानी यांचा क्रमांक घसरला आहे. तर मुकेश अंबानी पुन्हा बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

Mukesh Ambani again became the richest person in Asia, know where Gautam Adani is in the Forbes list ...
नव्या आर्थिक वर्षात अदानींना धक्का !, मुकेश अंबानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • फोर्ब्स वर्ल्ड अब्जाधीश यादी-2023 जाहीर
  • आशियातील अब्जाधीशांमध्ये मुकेश अंबानी पहिल्या क्रमांकावर
  • गौतम अदानी 24 व्या क्रमांकावर घसरले

Mukesh ambani - Gautam adani : मुकेश अंबानी पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. 'फोर्ब्स'ने मंगळवारी जारी केलेल्या 2023 च्या अब्जाधीशांच्या यादीत ही माहिती दिली. जागतिक यादीत अंबानींचे प्रमुख प्रतिस्पर्धी गौतम अदानी यांची 24 व्या स्थानावर घसरण झाली आहे. 24 जानेवारी रोजी अदानी हे जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. त्यावेळी त्यांची संपत्ती १२६ अब्ज डॉलर होती. (Mukesh Ambani again became the richest person in Asia, know where Gautam Adani is in the Forbes list ...)

अधिक वाचा : दुकानदाराने 5 किंवा 10 रुपयाचे नाणे घेण्यास नकार दिला तर काय करावे? हे आहेत RBI चे नियम

अमेरिकन शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर त्याच्या संपत्तीत झपाट्याने घट झाली. फोर्ब्सने म्हटले आहे की अदानी यांची एकूण संपत्ती आता 47.2 अब्ज डॉलर्स आहे आणि ते अंबानीनंतर दुसरे सर्वात श्रीमंत भारतीय आहेत. अंबानी (65) हे 83.4 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील 9व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.

अधिक वाचा : Gold Jewellery Hallmarking : आजपासून बदलले सोने खरेदीचे नियम, खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

फोर्ब्सने म्हटले आहे की, गेल्या वर्षी अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज $100 अब्ज पेक्षा जास्त महसूल मिळवणारी पहिली भारतीय कंपनी ठरली. त्यांचा व्यवसाय तेल, दूरसंचार ते रिटेलपर्यंत पसरलेला आहे. फोर्ब्सच्या मते, जगातील 25 सर्वात श्रीमंत लोकांची एकूण संपत्ती $2,100 अब्ज आहे. 2022 मध्ये हा आकडा $2,300 अब्ज होता. गेल्या वर्षी जगातील टॉप 25 श्रीमंतांपैकी दोन तृतीयांश श्रीमंतांच्या संपत्तीत घट झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

अधिक वाचा : ZP Recruitment: जिल्हा परिषदेत भरती, पगार 60,000 रुपये, जाणून घ्या पदाचे नाव आणि इतर माहिती

या यादीनुसार शिव नाडर हे तिसरे सर्वात श्रीमंत भारतीय आहेत. सायरस पूनावाला यांना देशातील चौथ्या श्रीमंत व्यक्तीचे स्थान मिळाले आहे. स्टील बॅरन लक्ष्मी मित्तल पाचव्या, ओपी जिंदाल ग्रुपच्या सावित्री जिंदाल सहाव्या, सन फार्माचे दिलीप सांघवी सातव्या आणि डीमार्टचे राधाकृष्ण दमाणी आठव्या क्रमांकावर आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी