Mukesh Ambani : मुकेश अंबानी आणि कुटुंबीयांना दक्षिण मुंबईतील ज्वेलरने धमकावले; 2 तासात केला 8 वेळा कॉल

Mukesh Ambani family : अंबानी कुटुंबियांना (Ambani Family) एका सराफानेच धमकावण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि कुटुंबीयांना सोमवारी धमकीचे फोन आल्याची माहिती प्रसार माध्यमांमधून समोर आली आहे. यानंतर एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणातील संशयित हा विष्णू भौमिक नावाचा दक्षिण मुंबईतील सराफ असून त्याने कॉल करताना तो 'अफजल' असल्याचा दावा केला.

Mukesh Ambani
मुकेश अंबानी 
थोडं पण कामाचं
  • मुकेश अंबानी आणि कुटुबियांना धमकावण्याचा धक्कादायक प्रकार
  • दक्षिण मुंबईतील सराफाने फोनवरून धमकावले
  • पोलिसांकडून संशियत ताब्यात, तपास सुरू

Mukesh Ambani Update : नवी दिल्ली : मुकेश अंबानी हे भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात धनाढ्य व्यक्तींपैकी एक व्यक्ती आहेत. मात्र आता मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांनाच धमकावले गेले आहे. अंबानी कुटुंबियांना (Ambani Family) एका सराफानेच धमकावण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि कुटुंबीयांना सोमवारी धमकीचे फोन आल्याची माहिती प्रसार माध्यमांमधून समोर आली आहे. यानंतर एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणातील संशयित हा विष्णू भौमिक नावाचा दक्षिण मुंबईतील सराफ असून त्याने  कॉल करताना तो 'अफजल' असल्याचा दावा केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबानी कुटुंबाला भौमिककडून 2 तासांच्या कालावधीत आठ कॉल्स आले. (Mukesh Ambani and his family threatened by South Mumbai jeweller)

अधिक वाचा : Maharashtra: Loan Appच्या माध्यमातून चीनचा भारतीय लोकांच्या पैशावर डल्ला; खरेदी केले जाताय क्रिप्टो करन्सी

रिलायन्स फाउंडेशनच्या हॉस्पिटलमध्ये कॉल

पोलिसांनी सांगितले की, 56 वर्षीय भौमिकने एका कॉल दरम्यान धीरूभाई अंबानी यांचे नाव देखील घेतले. संशयित हा दहिसर येथील रहिवासी असल्याचे समजते. त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवरसंदर्भातील नोंदी पोलिसांकडून पडताळण्यात येत आहेत. सोमवारी अंबानी कुटुंबाला अनेक धमकीचे कॉल आले. सकाळी साडेदहाच्या सुमारास रिलायन्स फाऊंडेशनच्या हरस्कीनदास हॉस्पिटलच्या नंबरवर कॉल आले. एका निवेदनात, मुंबई पोलिसांनी म्हटले होते, "रिलायन्स फाऊंडेशनने रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकीच्या कॉल्सबद्दल तक्रार दाखल केली आहे. रुग्णालयात तीनपेक्षा जास्त कॉल आले आहेत. चौकशी सुरू आहे."

अधिक वाचा : IND vs ZIM: झिम्बाब्वे दौऱ्याआधी भारतीय संघाला मोठा झटका, हा खेळाडू दुखापतीमुळे बाहेर

केंद्रीय तपास यंत्रणांनी मागवला अहवाल

पोलिसांनी असेही सांगितले की काही केंद्रीय तपास यंत्रणांनी या प्रकरणाचा तपशील मागवला आहे. "संशयिताने मुकेश अंबानींना धमकावले होते आणि शिवीगाळ केली होती. त्याला कलम ५०६(२) अंतर्गत गुन्हेगारी धमकी आणि धमक्या दिल्याबद्दल अटक करण्यात आली आहे," अशी माहिती पोलिसांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.

मागील वर्षीचे स्कॉर्पिओ प्रकरण

गेल्या वर्षी अंबानींच्या निवासस्थानाबाहेर २० स्फोटक जिलेटिन काठ्या आणि धमकीचे पत्र असलेली स्कॉर्पिओ कार सापडली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. काही दिवसांत कारचे मालक, ठाणे येथील व्यापारी मनसुख हिरेन हे एका खाडीत मृतावस्थेत आढळले. अखेर या प्रकरणातील सूत्रधारासह काही पोलिस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती.

अधिक वाचा : Vinayak Mete Death : विनायक मेटे यांच्या मृत्यूबद्दल पत्नी ज्योती मेटे यांनी व्यक्त केला संशय, चौकशी करून सत्य समोर आणण्याची केली मागणी

आशिया आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओमध्ये मोठा बदल झाला आहे. मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी याला कंपनीच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे.रिलायन्स जिओचे नवे चेअरमन आकाश अंबानी याआधी कंपनीत नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होते. मुकेश अंबानी हे प्रमुख कंपनी Jio Platforms Ltd चे चेअरमन म्हणून कायम राहतील. Jio Platforms Limited कडे Jio चे डिजिटल सेवा ब्रँड आहेत, ज्यात Reliance Jio Infocomm चा समावेश आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी