Mukesh Ambani Birthday: ६२ वर्षांचे झाले मुकेश अंबानी, त्यांच्या या ५ सक्सेस TIPS तुम्हालाही बनवतील अब्जाधीश

काम-धंदा
Updated Apr 19, 2019 | 13:27 IST | टाइम्स नाऊ हिंदी

मुकेश अंबानींचं आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून नाव घोषित करण्यात आलंय. जर आपल्यालाही त्यांच्यासारखं यशस्वी व्हायचं असेल तर जाणून घ्या त्यांच्या यशाचं गमक...

Mukesh Ambani
मुकेश अंबानींचा वाढदिवस  |  फोटो सौजन्य: BCCL

मुंबई: आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा आज १९ एप्रिलला वाढदिवस आहे. ते आज ६२ वर्षांचे झाले. नुकतंच त्यांचं नाव टाईम मॅगझिनच्या १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत सामिल झालंय. टाईम द्वारे नेते, अभिनेते आणि विशेष व्यक्तींची नावं सामिल गेले आहेत. अनिल अंबानी यांचं नाव मोस्ट इन्फ्लूएंशिअल टायटन अंतर्गत लिस्टमध्ये आहे.. फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलियनर्सच्या लिस्ट नुसार मुकेश अंबानी यांच्याकडे ४२.१ अरब डॉलर इतकी संपत्ती आहे. म्हणजेच भारतीय चलनानुसार २७१८ अरब २० कोटी ३३ लाख ४० हजार इतका मोठा आकडा आहे.

जर आपण या संख्येतील शून्य मोजत असाल आणि मुकेश अंबानींसारखं यश तुम्हाला मिळवायचं असेल तर पहिले त्यांचं यशाचं गमक माहिती करायला हवं. बिझनेस वर्ल्डमध्ये मुकेश अंबानी यांना त्यांच्या यशामागे या टिप्स आहेत, असं वाटतं. अंबानीही अनेक वेळा याबद्दल बोलले आहेत. 

तर जाणून घ्या मुकेश अंबानींच्या यशाच्या या ५ टिप्स

  1. यश मिळेपर्यंत थांबायच नाही : मुकेश अंबानी यांचं म्हणणं आहे की, जेव्हा आपण एखादं लक्ष्य ठरवतो. तेव्हा ते मिळेपर्यंत आराम करायचा नाही. सर्वजण आपल्याला मागे टाकण्याचा प्रयत्न करत असतात, म्हणून प्रत्येकवेळी आपल्या टार्गेटचा विचार करत राहायला हवा. तेव्हाच आपण नंबर वन बनू शकता.
  2. स्वप्न मोठं तर यशही मोठं : मुकेश अंबानी यांचा विचार आहे की मोठं स्वप्न पाहणं आपल्याला यश मिळवून देऊ शकतं. त्यांचा मंत्र आहे की, मोठं स्वप्न पाहा आणि ते पूर्ण होईपर्यंत शांत बसू नका. 
  3. जोखीम उचलणं आवश्यक : अनेकदा कोणतीही जोखीम घेण्यासाठी लोकं घाबरतात मात्र मुकेश अंबानी जोखीम पत्करायला मागे पुढे पाहत नाहीत. त्यांचं म्हणणं आहे की, यातून मिळालेला अनुभव आपल्याला लीडर बनवतो. 
  4. छंद चांगली गोष्ट आहे : मुकेश अंबानी यांचं म्हणणं आहे की, माणसानं आपले छंद पूर्ण करायला हवेत. त्यामुळं आपले स्वप्न पूर्ण करण्याचा आपला आत्मविश्वास वाढतो आणि पुढे जाण्याची जिद्दही मिळते. 
  5. चांगल्या टीमची मदत : मुंकेश अंबानी म्हणतात, एका चांगल्या टीम शिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. बिझनेस वर्ल्डमध्ये मुकेश अंबानी आपली टीम खूप समजूतदारपणे निवडण्यासाठी ओळखले जातात आणि त्यानं काय फरक पडतो, ते आपण मुकेश अंबानींकडे बघून ठरवू शकतो. 
     

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Mukesh Ambani Birthday: ६२ वर्षांचे झाले मुकेश अंबानी, त्यांच्या या ५ सक्सेस TIPS तुम्हालाही बनवतील अब्जाधीश Description: मुकेश अंबानींचं आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून नाव घोषित करण्यात आलंय. जर आपल्यालाही त्यांच्यासारखं यशस्वी व्हायचं असेल तर जाणून घ्या त्यांच्या यशाचं गमक...
Loading...
Loading...
Loading...