Mukesh Ambani Dubai Home : मुकेश अंबानींनी खरेदी केले दुबईतील आतापर्यंतचे सर्वात महागडे घर, पाहा किंमत आणि थाट...

Ambani's Dubai Villa : रिलायन्स समूहाचे चेअरमन आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे नेहमी त्यांची संपत्ती आणि मालमत्ता यासंदर्भात चर्चेत असतात. त्यांचे घर अॅंटिलिया (Antilia) नेहमीच उत्सुकतेचा विषय असते. मात्र आता दुबईतदेखील (Dubai) मुकेश अंबानी यांनी लक्ष वेधून घेतले आहे. मुकेश अंबानी यांनी दुबईत आतापर्यंतची सर्वात महागडी मालमत्ता खरेदी केली आहे. अंबानी कुटुंबाने दुबईत समुद्राजवळ एक आलिशान व्हिला (Luxurious Villa) विकत घेतल्याचे वृत्त समोर आले आहे.

Mukesh Ambani New Home
मुकेश अंबानींचे नवे घर 
थोडं पण कामाचं
  • मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे नेहमी त्यांची संपत्ती आणि मालमत्ता यासंदर्भात चर्चेत असतात
  • आता मुकेश अंबानींनी दुबईत एक आलिशान विकत घेतला आहे
  • हा व्हिला अंबानींचे धाकटे पुत्र अनंत अंबानी यांच्यासाठी आहे

Costliest property in Dubai : दुबई : रिलायन्स समूहाचे चेअरमन आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे नेहमी त्यांची संपत्ती आणि मालमत्ता यासंदर्भात चर्चेत असतात. त्यांचे घर अॅंटिलिया (Antilia) नेहमीच उत्सुकतेचा विषय असते. मात्र आता दुबईतदेखील (Dubai) मुकेश अंबानी यांनी लक्ष वेधून घेतले आहे. मुकेश अंबानी यांनी दुबईत आतापर्यंतची सर्वात महागडी मालमत्ता  खरेदी केली आहे. अंबानी कुटुंबाने दुबईत समुद्राजवळ एक आलिशान व्हिला (Luxurious Villa) विकत घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. या घराची किंमत सुमारे 8 कोटी डॉलर असल्याचे सांगितले जाते आहे. वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, दुबई शहरातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा निवासी मालमत्तेचा करार आहे. मात्र, दुबईतील या मालमत्तेच्या व्यवहाराबाबत अंबानींच्या बाजूने गुप्तता ठेवण्यात आली आहे. या व्यवहाराबाबत कोणतीही अधिकृत माहिती अंबानी कुटुंबाकडून जाहीर करण्यात आलेली नाही. (Mukesh Ambani bought costliest property in Dubai)

अधिक वाचा : India vs Pakistan Match Preview Asia Cup 2022 : रविवारी आशिया कप स्पर्धेत भिडणार भारत आणि पाकिस्तान

अनंत अंबानींच्या नावावर नवी मालमत्ता

सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे की, ही आलिशान मालमत्ता या वर्षाच्या सुरुवातीला मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीसाठी (Anant Ambani) खरेदी करण्यात आली होती. समुद्रकिनाऱ्यावरील हा आलिशान बंगला पामच्या आकारात आहे. हा द्वीपसमूहाच्या उत्तरेकडील भागात आहे. या व्हिलामध्ये 10 बेडरूम, एक वैयक्तिक स्पा आणि इनडोअर आणि आउटडोअर पूल आहेत. तुमच्या माहितीसाठी ब्रिटीश फुटबॉल खेळाडू डेव्हिड बेकहॅम (David Beckham)आणि बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान (Shahrukh Khan) यांचीदेखील या परिसरात मालमत्ता आहे. म्हणजेच अनंत अंबानी आता त्यांचे नवे शेजारी असतील. अतिश्रीमंतांसाठी दुबई एक पसंतीची बाजारपेठ म्हणून उदयास आली आहे. येथील रिअल इस्टेटमध्ये जगभरातून लोक गुंतवणूक करताना दिसत आहेत.

अधिक वाचा : Optical Illusion: या फोटोमध्ये लपले आहे फुलपाखरु, ३० सेकंदात दाखवा शोधून

अनंत अंबानी यांची मालमत्ता

ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, मुकेश अंबानींचे धाकटे पुत्र अनंत अंबानी यांची एकूण संपत्ती 93.3 अब्ज डॉलर आहे. जगातील 11 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी आता 65 वर्षांचे आहेत. त्यामुळेच ते आता हळूहळू आपल्या मुलांच्या हाती कारभार सोपवत आहेत.

अधिक वाचा : सर्व मैत्रिणींनी चांगलं राहावं, मला आता सगळं जड जातंय,अलविदा अशी चिठ्ठी लिहित तरुणीने केली आत्महत्या

अंबानींचा थाट

मुकेश अंबानी (Mukesh Ambani)हे केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील प्रसिद्ध उद्योगपती आहेत. ते भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी (Richest Man)एक आहेत. त्यांची काम करण्याची शैली आणि राहणीमान याचे आकर्षण अनेकांना असते. खरं तर मुकेश अंबानी हे अतिशय साधे आयुष्य जगतात. पण त्यांची पत्नी नीता अंबानी (Nita Ambani) आणि मुले विलासी आणि शाही जीवनासाठी प्रसिद्ध आहेत. अंबानी कुटुंबियांच्या लाइफस्टाइलकडे, त्यांच्या संपत्तीकडे आणि विविध समारंभांमध्ये ते करत असलेल्या खर्चाकडे सर्वांचेच लक्ष असते. मुकेश अंबानी देशातील सर्वात महागड्या घरात राहतात आणि त्यांच्या घरात 600 लोक राहतात आणि ते त्यांच्या घरातील स्वयंपाक, साफसफाई आणि सुरक्षेसह सर्व गोष्टींची खूप काळजी घेतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी