Mukesh Ambani : आपल्या पाहुण्यांवर किती खर्च करतात मुकेश आणि नीता अंबानी...ऐकून व्हाल थक्क

Guest of Ambani Family : रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani)हे केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील प्रसिद्ध उद्योगपती आहेत. ते भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी (Richest Man)एक आहेत. त्यांची काम करण्याची शैली आणि राहणीमान याचे आकर्षण अनेकांना असते. खरं तर मुकेश अंबानी हे अतिशय साधे आयुष्य जगतात. मात्र अंबानी कुटुंबिय फक्त स्वत:च आलिशान जीवनशैली जगतात असे नाही तर ते त्यांच्या पाहुण्यांनासुद्धा आलिशान पद्धतीनेच पाहुणचार करतात.

Ambani family lifestyle
अंबानी कुटुंबियांची जीवनशैली  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मुकेश अंबानी हे अतिशय साधे आयुष्य जगतात.
  • अंबानी कुटुंबियांच्या लाइफस्टाइलकडे, त्यांच्या संपत्तीकडे आणि ते करत असलेल्या खर्चाकडे सर्वांचेच लक्ष असते
  • अंबानी कुटुंबिय त्यांच्या पाहुण्यांनासुद्धा आलिशान पद्धतीनेच पाहुणचार करतात.

Mukesh Ambani Lifestyle : नवी दिल्ली : रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani)हे केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील प्रसिद्ध उद्योगपती आहेत. ते भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी (Richest Man)एक आहेत. त्यांची काम करण्याची शैली आणि राहणीमान याचे आकर्षण अनेकांना असते. खरं तर मुकेश अंबानी हे अतिशय साधे आयुष्य जगतात. पण त्यांची पत्नी नीता अंबानी (Nita Ambani) आणि मुले विलासी आणि शाही जीवनासाठी प्रसिद्ध आहेत. अंबानी कुटुंबियांच्या लाइफस्टाइलकडे, त्यांच्या संपत्तीकडे आणि विविध समारंभांमध्ये ते करत असलेल्या खर्चाकडे सर्वांचेच लक्ष असते. मात्र अंबानी कुटुंबिय फक्त स्वत:च आलिशान जीवनशैली जगतात असे नाही तर ते त्यांच्या पाहुण्यांनासुद्धा आलिशान पद्धतीनेच पाहुणचार करतात. (Mukesh Ambani gives luxurious treatment to his guest, check details)

अधिक वाचा : ASIA CUP 2022: या खेळाडूला टीम इंडियात न घेतल्याने भडकले चाहते, सोशल मीडियावर काढला राग

मुकेश अंबानी देशातील सर्वात महागड्या घरात राहतात आणि त्यांच्या घरात 600 लोक राहतात आणि ते त्यांच्या घरातील स्वयंपाक, साफसफाई आणि सुरक्षेसह सर्व गोष्टींची खूप काळजी घेतात. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी दिवसभरात किती खर्च करतात, याची चर्चा सोशल मीडियावर होते असते. मात्र त्याचबरोबर चाहत्यांना त्यांच्या घरी आलेल्या पाहुण्यांसाठी दिवसाचा किती खर्च येतो याकडेही उत्सुकता असते. अंबानी कुटुंबियांचा पाहुणचार कसा असतो ते जाणून घेऊया.

अधिक वाचा : Ranveer Singh: न्यूड फोटशूटनी वाढवल्या रणवीर सिंगच्या अडचणी, न्यायालयात याचिका दाखल

कसे होते स्वागत

मुकेश अंबानींच्या घरी पाहुणे आले की त्यांना राजेशाही थाटामाटाचे जीवन अनुभवायला मिळते. वास्तविक, सर्वप्रथम त्यांना Acqua di Cristallo Tributo a Modigliani च्या बाटलीतून पाणी दिले जाते. या 750 मिली बाटलीची किंमत सुमारे 60,000 डॉलर इतकी आहे. भारतीय चलनानुसार या ब्रँडच्या ७५० एमएल पाण्याच्या बाटलीसाठी ४४ लाख रुपये मोजावे लागतात.

अधिक वाचा : Bihar Political Crisis: बिहारमध्ये राजकीय भूकंप, नितीश कुमारांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा; भाजपला हादरवलं

यानंतर, नॉरिटकेच्या एका भांड्यात पाहुण्याला चहा दिला जातो. ज्याची किंमत लाखात आहे. खरं तर, नोरिटेक सध्याच्या काळात आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. यानंतर, पाहुण्यांना त्यांच्या आवडीचे शाही भोजन दिले जाते.

जेवणात काय असते

खुद्द मुकेश अंबानी यांना साधे आणि गुजराती जेवण खायला आवडते. पण जेव्हा त्यांच्या घरी पाहुणे येतात तेव्हा त्यांना त्यांच्या आवडीचे शाही जेवण दिले जाते. हे जेवण अतिशय ताज्या आणि शुद्ध भाज्यांनी बनवले जाते.

आपल्या पाहुण्यांवर मुकेश आणि नीता अंबानी  किती खर्च करतात याची कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. एवढे मात्र नक्की अंबानी कुटुंबाच्या पाहुण्यांना कशाचीही कमतरता नसते आणि राजेशाही थाटातील पाहुणचाराची सरबराई केली जाते. पाहुण्यांचे डोळे दिपवून टाकणारा पाहुणार केला जातो हे मात्र नक्की. 

अलीकडच्या काळात गौतम अदानींनी श्रीमंतांच्या यादीत मुसंडी मारली आहे. तर त्याच वेळी, रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत घट झाली आहे आणि ते टॉप 10 मधून बाहेर पडले आहेत. रँकिंगमध्ये 11व्या क्रमांकावर असलेल्या मुकेश अंबानी यांची संपत्ती 85.3 अब्ज डॉलर इतकी आहे आणि वर्षभरात 4.73 अब्ज डॉलरची घसरण झाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी