Mukesh Ambani And Anil Ambani: रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी भारतातील सर्वांत श्रीमंत बिझनेसमन आहेत. एकवेळ अशी होती की मुकेश अंबानी आणि त्यांच्या छोटा भाऊ अनिल अंबानी यांच्या संपत्तीत जास्त फरक नव्हाता. पण आता या दोघांच्या संपत्तीची तुलना केली तर दोन्ही भावांमध्ये जमीन आसमानचा फरक निर्माण झाला आहे.
६० वर्षांचे रिलायन्स एडीएजी ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत १३४९ व्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती ९५०० कोटी रूपये ( १.४ अरब डॉलर) आहे. अनिल अंबानी यांच्या आर्थिक सेवा, संरक्षण, पायाभूत सुविधा आणि मीडियाचा व्यवहार आहे. अनिल अंबानी भारतातल्या श्रीमंतांच्या यादीत 68 व्या स्थानावर आहेत.
दरम्यान अनिल अंबानी यांची कंपन्याच्या शेअरमध्ये घट झाल्यानं त्यांचं अब्जाधीश पदक गेलं. त्यांची संपत्ती १ अरब डॉलरच्या खाली पोहोचली होती. अनिल अंबानी यांनी आपल्या काही कंपन्यांमधली भागेदारी विकून कर्ज फेडत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी माहिती दिली की, माझ्या कंपनीच्या ग्रुपनं ४० हजार कोटी रूपयांचे कर्ज फेडलं आहे.
दुसरीकडे अनिल अंबानी यांचा मोठा भाऊ म्हणजेच मुकेश अंबानी हे फोर्ब्सच्या यादीत १३ व्या स्थानावर आहे. त्यांची संपत्ती ३.५४ लाख कोटी रूपये आहे. ते भारताच्या श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. ६२ वर्षीय मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचं एकूण उत्पन्न ६.१२ लाख कोटी रूपये आहे.
मुकेश अंबानी यांनी देशात 4G सेवा देणारी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओची सुरूवात केली. या कंपनीनं काही टेलि कंपन्यांची झोप उडवली. जिओचे ३० कोटींहून जास्त ग्राहक आहेत. मुकेश अंबानी लवकरच देशातला सर्वांत मोठा रिटेल ई कॉमर्स प्लेटफॉर्म घेऊन येणार आहेत.
जर का मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांच्या संपत्तीची तुलना केली तर छोट्या भावाच्या संपत्तीच्या तुलनेत मोठ्या भावाची संपत्ती जास्त आहे. मुकेश अंबानी यांची नेटवर्थ ३.५४ लाख कोटी रूपये आहे. तर अनिल अंबानी यांची नेटवर्थ ९५०० कोटी रूपये आहे. २००७ साली दोन्ही भावांच्या संपत्तीत केवळ ८४०० कोटी रूपयांचा फरक होता.
मात्र आता आपण २०१९ मध्ये दोघांची तुलना केल्यास मुकेश अंबानी यांची नेटवर्थ अनिल अंबानी यांच्यापेक्षा ३.४४ लाख कोटी रूपयांपेक्षा जास्त आहे. २००७ सालचं बोलायचं झाल्यास भारत फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी यांच्यानंतर अनिल अंबानी दुसऱ्या स्थानावर होते. त्यावेळी त्यांची नेटवर्थ ८० हजार कोटी रूपये होती. तर मुकेश अंबानी यांची त्यावेळी नेटवर्थ ८८.४ हजार कोटी रूपये होती.