Ambani New Home | मुकेश अंबानींचे मुक्काम पोस्ट लंडन, विकत घेतले अॅंटिलियापेक्षा आलिशान घर, साजरी केली पहिली दिवाळी

Mukesh Ambani New Home | मुकेश अंबानी यांच्या लंडनमधील आलिशान घरात ४९ बेडरुम आहेत. या घरात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधादेखील आहेत. कोरोना महामारीच्या काळात आपल्या प्रसिद्ध ४ लाख चौ. फूट क्षेत्रफळाच्या अॅंटिलियामध्ये अटकून पडल्यानंतर अंबानी कुटुंबियांना असे वाटले की आणखी एक घर असले पाहिजे.

Mukesh Ambani New Home
मुकेश अंबानींचे लंडन येथे नवे घर 
थोडं पण कामाचं
  • मुकेश अंबानी यांनी लंडन येथे नवीन घर विकत घेतले
  • अंबानी कुटुंबिय आता लंडनला आपले दुसरे घर बनवू पाहतायेत
  • अंबानींनी ५९२ कोटी रुपयांचे आलिशान घर विकत घेतले

Mukesh Ambani New Home | लंडन : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांनी लंडन येथे नवीन घर विकत घेतले आहे. अंबानी कुटुंबिय आता लंडनला आपले दुसरे घर बनवू पाहत आहेत. प्रसार माध्यमांमधून आलेल्या माहितीनुसार लंडनमध्ये मुकेश अंबानी यांनी ५९२ कोटी रुपयांचे आलिशान घर विकत घेतले आहे. हे घर बकिंगघमशायर येथील स्टोक पार्कमध्ये तब्बल ३०० एकरमध्ये आहे. देशातील सर्वात श्रीमंत कुटुंब आता लंडनवासी होऊ पाहते आहे. (Mukesh Ambani New Home | Ambani family to shift in new Home in England)

कसे आहे लंडनमधील अंबानींचे घर

मुकेश अंबानी यांच्या लंडनमधील आलिशान घरात ४९ बेडरुम आहेत. या घरात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधादेखील आहेत. कोरोना महामारीच्या काळात आपल्या प्रसिद्ध ४ लाख चौ. फूट क्षेत्रफळाच्या अॅंटिलियामध्ये अटकून पडल्यानंतर अंबानी कुटुंबियांना असे वाटले की आणखी एक घर असले पाहिजे. लॉकडाउनच्या काळात अंबानी कुटुंबियांनी जामनगर येथे बराच काळ घालवला. जामनगर येथे रिलायन्सचा तेलशुद्धीकरण कारखाना आहे. ही जगातील सर्वात मोठी रिफायनरी आहे.

स्टोक पार्कचा व्यवहार पूर्ण

सूत्रांकडून समोर आलेल्या माहितीनुसार अंबानी कुटुंबियांना लॉकडाइन काळात अशी एक मालमत्ता हवी होती जी मोकळी असेल आणि निवांत असेल. मुंबईतील त्यांचे घर हे तसे मोकळे नाही. त्यामुळे अशा घराचा शोध सुरू झाला होता. स्टोक पार्कचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर ऑगस्टपासून त्याचे नुतनीकरण सुरू होते. अंबानींनी या नव्या घरात आपल्याला हव्या तशा सुविधा आणि बदल करून घेतले आहेत.

एप्रिलमध्ये लंडनमध्ये हलवणार मुक्काम

असे सांगण्यात येते आहे की यंदाची दिवाळी अंबानी कुटुंबियांनी नव्या घरातच साजरी केली आहे. अंबानी कुटुंबिय लंडनमध्ये आहे. यानंतर ते मुंबईत परत येणार आहेत. त्यानंतर एप्रिल महिन्यात इंग्लंडमधील आपल्या नव्या घरी अंबानी कुटुंबिय मुक्काम हलवणार आहेत. या घरात अंबानींनी मंदिरदेखील बनवले आहे. मुंबईतून दोन पुजारीदेखील मंदिरातील पूजाअर्चेसाठी नेले जाणार आहेत. मुंबईतील त्यांच्या घरी असणाऱ्या मंदिरासारखेच हुबेहुब हे मंदिर आहे. गणेश देवतेची प्रतिमा मार्बलची आहे आणि राधा कृष्ण, हनुमान यांच्या मुर्ती राजस्थानी कलाकारीमध्ये आहेत. 

मुकेश अंबानी यांना तीन अपत्ये आहेत. आकाश, अनंत आणि ईशा. आकाश अंबानी २९ वर्षांचा आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये आकाश अंबानीचा समावेश जिओ प्लॅटफॉर्म्सच्या संचालक मंडळात करण्यात आला होता. एप्रिल २०१८ मध्ये आकाशचा समावेश सावन मीडियाच्या (Saavn Media)संचालक मंडळात करण्यात आला होता. तर ऑक्टोबर २०१४ मध्ये आकाशचा समावेश जिओ इन्फोकॉम आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्सच्या संचालक मंडळादेखील करण्यात आला होता. मुकेश अंबानी यांचे छोटे सुपूत्र अनंत अंबानी (Anant Ambani) यांना रिलायन्स न्यू एनर्जी सोलर आणि रिलायन्स न्यू सोलर एनर्जीचे (Reliance new energy solar) संचालक करण्यात आले आहे. याआधी फेब्रुवारी २०२१ मध्ये अनंत अंबानी यांना रिलायन्सच्या ऑईल टू केमिकल व्यवसायाचा संचालक करण्यात आले होते.


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी