आजोबा होण्याआधीच मुकेश अंबानी यांनी खरेदी केली खेळण्यांची कंपनी

काम-धंदा
Updated May 10, 2019 | 16:02 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

रिलायन्स इंडस्ट्रीजची सबसिडअरी रिलायन्स ब्राड्स लिमिटेडने ब्रिटनची खेळण्यांची कंपनी हॅमलेज ग्लोबल हेल्डिंग्स लिमिटेडला ६.७९ कोटी पौंड मध्ये विकत घेण्याची घोषणा केली आहे.

mukesh ambani
मुकेश अंबानी 

मुंबई: भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी आजोबा होण्याआधीच खेळण्यांची कंपनी विकत घेतली आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी मुकेश अंबानी यांची मुलगी इशा अंबानीचे लग्न आनंद पिरामलसोबत झाले. त्यानंतर डिसेंबर २०१८मध्ये त्यांच्या मोठ्या मुलाचे आकाशचे लग्न श्लोका मेहतासोबत झाले. 

कुटुंबात येणाऱ्या नव्या पाहुण्यांसाठी मुकेश अंबानींचे हे गिफ्ट खूप चांगले असेल. अंबानी यांनी ब्रिटनची खेळण्याची कंपनी हॅमलेज ग्लोबल होल्डिंग्ल लिमिटेडला ६.७९ कोटी पौंड(साधारण ६२० कोटी रूपये) ला विकत घेण्याची घोषणा केली. सध्या हॅमलेजची मालकी चीनची फॅशन कंपनी सी बॅनर इंटरनॅशनलकडे आहे. सी बॅनर इंटरनॅशनलने २०१५मध्ये १० कोटी पौंडला ही कंपनी खरेदी केली होती. हॅमलेज काही वर्षांपासून तोट्यात आहे. 

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स ब्रँड आणि सी बॅनर इंटरनॅशनल होल्डिंग्स यांच्यात गुरूवारी एका करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. रिलायन्स ब्रँड्स हॅमलेज ग्लोबल होल्डिंग्स लिमिटेडच्या १०० टक्के मालकीचा अधिकार घेतला. हॅमलेजचे १८ देशांमध्ये १६७ स्टोर्स आहेत. भारतात रिलायन्स हॅमलेजची मास्ट फ्रेंचायजी आहे आणि सध्या २९ शहरांमध्ये ८८ स्टोर्स आहेत. 

रिलायन्स ब्रँडचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन मेहता यांनी दिलेल्या माहितीनुसार जागतिक स्तरावर रिलायन्सने विकत घेतलेल्या हॅमलेज ब्राँडमुळे ते जागतिक रिेटेल इंडस्ट्रीसाठी एक प्रमुख खलनायिकता बनू शकते.

आकाश-श्लोकाच्या लग्नाला दिग्गजांची मांदियाळी

गेल्या डिसेंबर २०१८मध्ये मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी याचा विवाह श्लोका मेहताशी पार पडला. या विवाहात बॉलिवूड तसेच अनेक दिग्गज राजकारणी व्यक्तींनी हजेरी लावली होती. याआधी आकाशची जुळी बहीण इशा अंबानी हिचा आनंद पिरामलशी विवाह झाला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी