भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये असेल: मुकेश अंबानी 

काम-धंदा
रोहित गोळे
Updated Nov 22, 2020 | 16:04 IST

पंडित दीनदयाळ पेट्रोलियम विद्यापीठाच्या आठव्या दीक्षांत समारोहात रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी म्हणाले की कोविड दरम्यान आपल्या सर्वांची जबाबदारी पूर्वीपेक्षा अधिक वाढली आहे.

mukesh_ambani
भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये असेल: अंबानी  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • भारत टॉप ३ अर्थव्यवस्थेत असेल, मुकेश अंबानींनी व्यक्त केला विश्वास
  • दीनदयाळ पेट्रोलियम विद्यापीठाच्या आठव्या दीक्षांत समारोहात मुकेश अंबानी बोलत होते
  • भारताची अर्थव्यवस्था लवकरच रुळावर येण्याची आशाही त्यांनी केली व्यक्त

गांधीनगर: रिलायन्स (Reliance) इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी शनिवारी सांगितले की कोरोना विषाणूविरूद्धच्या (Coronavirus) लढ्यात भारताने महत्त्वपूर्ण टप्प्यात प्रवेश केला आहे. ते असे म्हणाले की, आपण आता अशा टप्प्यावर आलो आहोत की, जिथे आपल्याला हलगर्जीपणा करता येणार नाही. सरकारने केलेल्या धाडसी सुधारणांमुळे आगामी काळात जलद आर्थिक पुनरुज्जीवन आणि वेगवान प्रगती होईल. असे ते म्हणाले.

देशातील काही भागात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. यामुळे प्रशासनाला पुन्हा काही बंधन घालणं भाग पडत आहे. उदाहरणार्थ, अहमदाबादमध्ये प्रशासनाने नाईट कर्फ्यू लागू केला आहे तर दिल्लीसारख्या शहरात वाहतुकीवर काही निर्बंध लादले गेले आहेत. या सगळ्या परिस्थिती दरम्यान, अंबानी म्हणाले की, 'भारताने कोविड-१९ साथीच्या रोगाविरोधातील लढाईत एक महत्त्वपूर्ण टप्प्यात प्रवेश केला आहे. आता या टप्प्यावर आपण हलगर्जीपणा करता कामा नये.' मुकेश अंबानी हे पंडित दीनदयाल पेट्रोलियम विद्यापीठाच्या आठव्या दीक्षांत समारोहात ते बोलत होते. 

याच वेळी अंबानी असंही म्हणाले की, 'आर्थिक विकासामुळे येत्या दोन दशकांत अभूतपूर्व संधी निर्माण होतील आणि भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांपैकी एक असेल. आता जगासमोर या गोष्टीचं आव्हान असणार आहे की, पर्यावरणाला इजा न करता आपल्या अर्थव्यवस्थेला पुढे वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे.' 

ते म्हणाले की, 'या शतकाच्या मध्यावर जग आवश्यक असलेल्या दुप्पट उर्जा वापरणार आहे. येत्या दोन दशकांत भारताची दरडोई उर्जा गरज दुप्पट होईल. त्यामुळे स्वच्छ व हरित ऊर्जा महासत्ता बनण्याबरोबरच आर्थिक महासत्ता होण्याचे दुहेरी उद्दीष्ट भारताने साध्य करणे आवश्यक आहे.'

देशातील सर्वात यशस्वी उद्योजक मुकेश अंबानी यांनी ज्या पद्धतीने आपले विचार मांडले आहेत त्या दृष्टीने सर्वानीच विचार करणं आवश्यक आहे. कारण की, कोरोनासारख्या साथीच्या रोगामुळे प्रत्येक देशाची प्राथमिकताच बदलली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी