नवी दिल्ली : रिलायन्स जिओच्या स्वस्त मोबाईल डाटामुळे देशातील इंटरनेट वापर करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. एक रिपोर्टनुसार इंटरनेटचे जगातील ग्राहकांच्या संख्येत भारताचा १२ टक्के भागिदारी आहे. त्यामुळे जगात इंटरनेटचा वापर करणाऱ्यांमध्ये भारताचा क्रमांक दुसरा झाला आहे.
मॅरी मीकर यांच्या इंटरनेट वापरावर आलेल्या २०१९ च्या रिपोर्ट नुसार ही बाब समोर आली आहे. रिपोर्टनुसार जिओला अमेरिकेच्या बाहेरची सर्वात वाढणारी कंपनी म्हटले आहे. यानुसार जगभरात एकूण ३.८ अब्ज लोक इंटरनेटचा वापर करतात. ही जगाच्या लोकसंख्येच्या निम्म्या पेक्षा जास्त आहे. यात २१ टक्के इंटरनेट यूजर्स हे चीनचे असून ते पहिल्या क्रमांकावर आहेत.
जगभरातील इंटरनेट युजर्सपैकी केवळ ८ टक्के युजर्स अमेरिकेत आहेत. जगभरात इंटरनेट युजर्सची संख्या झपाट्याने वाढते आहे. २०१८ मध्ये ही टक्केवारी ६ टक्के होती. पण २०१७ च्या सात टक्क्यांपेक्षा कमी आहे. रिपोर्टनुसार रिलायन्स जिओने ३०.७ कोटी मोबाईल फोनचे टार्गेट पूर्ण केले आहे.
यात जिओचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या हवाल्याने सांगितले की, ते एक हायब्रिड ऑनलाइनपासून ऑफलाइन वाणिज्य मंच तयार करत आहे. यात रिलायन्स रिटेलच्या मार्केटप्लेसला जिओच्या माध्यमातून डिजिटलशी जोडणार आहे. उल्लेखनिय गोष्ट ही आहे की, पाच सप्टेंबर २०१६ ममध्ये जिओचे स्वस्त प्लान बाजारात धडकले आणि भारतीय इंटरनेट वापरात क्रांती आली. त्यानंतर इंटरनेट ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढली आणि प्रतिस्पर्धी कंपन्यांची झोपही उडाली. त्यांनाही आपले प्लान स्वस्त करावे लागेल.