मुंबई : इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) मध्ये गुंतवणूक करून पैसे कमावणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वास्तविक, मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) टेलिकॉम कंपनी Jio देखील IPO लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. (Mukesh Ambani will launch a bigger IPO than LIC, Jio will enter the stock market!)
उद्योगपती मुकेश अंबानी RIL च्या पुढील वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) याबाबत घोषणा करू शकतात. अंबानींच्या योजनेत त्यांची दूरसंचार फर्म रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म (RJPL) आणि RIL ची उपकंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) साठी स्वतंत्र IPO समाविष्ट आहेत.या दोन कंपन्यांच्या IPO च्या माध्यमातून अंबानी 50,000 कोटी ते 75,000 कोटी रुपयांच्या दरम्यान मोठी रक्कम उभारण्याचा विचार करत आहेत. या IPO नंतर या दोन्ही कंपन्या शेअर बाजारात सूचिबद्ध होतील.
अधिक वाचा :
ग्लोबल लिस्टिंग देखील शक्य आहे: बिझनेस लाईनच्या सूत्रांनुसार, दोन्ही कंपन्यांची ग्लोबल लिस्टिंग देखील भारतातील सूचीसोबत होऊ शकते. रिलायन्स जिओला अमेरिकेतील नॅस्डॅक प्लॅटफॉर्मवर देखील सूचीबद्ध केले जाऊ शकते. Nasdaq हे तंत्रज्ञान कंपन्यांसाठी जगातील सर्वात मोठे मार्केटप्लेस आहे.
अधिक वाचा :
Indian Railway: खूशखबर, या खास गोष्टीमुळे वंदे भारतचा प्रवास होणार अधिक आरामदायक
सूत्रांनी सांगितले की रिलायन्स रिटेलचा IPO लॉन्च डिसेंबर 2022 पर्यंत होईल. यानंतर रिलायन्स जिओचा IPO लॉन्च होण्याची शक्यता आहे. 2020 मध्ये रिलायन्स जिओने फेसबुक आणि गुगलसह 13 गुंतवणूकदारांना 33 टक्के स्टेक विकले होते. रिलायन्सने या दोन कंपन्यांकडून अंदाजे रक्कम वाढवल्यास, हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO असेल. सध्या LIC चा IPO सर्वात मोठा मानला जातो. हा IPO 21 हजार कोटींचा आहे. LIC चा IPO लॉन्च 4 मे रोजी होणार आहे.