Multibagger Stock | जानेवारीत चहाच्या किंमतीत मिळणारा शेअर...डिसेंबरपर्यत पोचला पिझ्झाच्या किंमतीवर, रग्गड कमाई

Investment in Multibagger | सार्थक इंडस्ट्रीजचा शेअर १ जानेवारी २०२१ ला ८.५० रुपये प्रति शेअरच्या (Share price of Sarthak Industries) पातळीवर व्यवहार करत होता. तर वर्ष संपता संपता २४ डिसेंबर २०२१ला या शेअरची किंमत १०४.०० रुपये प्रति शेअर इतकी झाली आहे. या महिन्यातदेखील या शेअरने तेजी दाखवली आहे. १० ऑगस्ट २०२१ ला सार्थकचा शेअर १३४.९५ रुपयांच्या किंमतीवर पोचला होता.

Investment in Multibagger stock
मल्टीबॅगर शेअरमधील दमदार गुंतवणूक 
थोडं पण कामाचं
  • या पेनी स्टॉकने दिला दणदणीत परतावा
  • सार्थक इंडस्ट्रीजच्या शेअरची जबरदस्त तेजी
  • एक लाखाच्या गुंतवणुकीचे झाले १२ लाख रुपये

Share Market Investment| मुंबई: मागील वर्ष शेअर बाजारातील गुंतवणुकदारांसाठी सुगीचे गेले आहे. शेअर बाजारातून (Share market)लोकांनी जोरदार कमाई केली आहे. सार्थक इंडस्ट्रीजच्या (Sarthak Industries)शेअरने मागील १२ महिन्यात गुंतवणुकदारांना छप्परफाड कमाई करून दिली आहे. सार्थक इंडस्ट्रीजचा शेअर १ जानेवारी २०२१ ला ८.५० रुपये प्रति शेअरच्या (Share price of Sarthak Industries) पातळीवर व्यवहार करत होता. तर वर्ष संपता संपता २४ डिसेंबर २०२१ला या शेअरची किंमत १०४.०० रुपये प्रति शेअर इतकी झाली आहे. या महिन्यातदेखील या शेअरने तेजी दाखवली आहे. १० ऑगस्ट २०२१ ला सार्थकचा शेअर १३४.९५ रुपयांच्या किंमतीवर पोचला होता. त्यानंतर या शेअरच्या किंमतीत मोठी घसरण होत तो २ सप्टेंबर २०२१ला ५९.६५ रुपयांवर पोचला होता. त्यानंतर मात्र हा शेअर सावरला. अर्थात पुढील दोन तीन महिन्यात त्यात थोडे चढ उतार झाले मात्र नंतर पुन्हा या शेअरमध्ये तेजी आली आहे. हा पेनी स्टॉक (Penny stock) एका वर्षात मल्टीबॅगर शेअर (Multibagger stock)बनला आहे. शेअर बाजारातील तेजीत या शेअरने गुंतवणुकदारांची दिवाळी केली आहे. (Share Market: Multibagger Penny stock of Sarthak Industries Ltd turned Rs 1 lakh into Rs 12 lakhs in 12 months)

सार्थकने गुंतवणुकदारांना दिला बंपर परतावा

जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२१ या बारा महिन्यांच्या कालावधीत सार्थक इंडस्ट्रीजच्या शेअरने गुंतवणुकदारांना जवळपास १,१२४ टक्क्यांचा दणदणीत परतावा दिला आहे. या वर्षातील मधल्या काही महिन्यांमध्ये आलेल्या घसरणीला वगळून या शेअरने शानदार वाटचाल केली आहे. जानेवारी महिन्यात या शेअरमध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक करणाऱ्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य डिसेंबर महिन्यात १२.२३ लाख रुपये झाले आहे. या शेअरने एका वर्षात १२ पटीपेक्षा जास्त तेजी नोंदवली आहे. 

सार्थक इंडस्ट्रीजची स्थापना १९८२ मध्ये झाली होती. सार्थक इंडस्ट्रीज ही मध्य प्रदेशातील इंदूरस्थित कंपनी आहे. कंपनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या उत्पादनाच्या व्यवसायात आहे. सार्थक इंडस्ट्रीज, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, हिंदूस्थान पेट्रोलियम यासारख्या पेट्रोलियम कंपन्यांना एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरवठा करते. सध्या कंपनीची उत्पादन क्षमता दरवर्षी ७ लाख एलपीजी सिलिंडरचे उत्पादन करण्याची आहे.

सेन्सेक्स आणि निफ्टीचे झोके

मागील दीड वर्ष शेअर बाजारासाठी अभूतपूर्व ठरले आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांकांनी आपली आतापर्यतची उच्चांकी पातळी नोंदवली आहे. मागील काही आठवड्यात झालेल्या घसरणीमुळे हे दोन्ही निर्देशांक उच्चांकीवरून मागे फिरले आहेत. मात्र अजूनही शेअर बाजारात तेजी दिसून येते आहे. अर्थात हा आठवडा शेअर बाजारासाठी फारसा चांगला गेला नाही. सुरूवातीला झालेल्या घसरणीनंतर बाजार पुन्हा सावरला. मात्र चढ उतारांचा सिलसिला सुरू आहे. परकी गुंतवणुकदारांनी भारतीय शेअर बाजारातून मागील दोन महिन्यात मोठी रक्कम काढून घेतली असली तरी देशांतर्गत गुंतवणुकदारांच्या पैशाच्या जोरावर बाजारातील तेजी टिकून आहे. तरुण गुंतवणुकदार आणि नवीन गुंतवणुकदार वर्षभरात मोठ्या प्रमाणात बाजाराकडे आकर्षित झाले आहेत. मागील एका वर्षात मोठ्या संख्येने डीमॅट खाती सुरू झाली आहेत. ओमायक्रॉन, कच्चे तेल आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे धोरण यावर शेअर बाजाराची आगामी दिवसांमधील वाटचाल अवलंबून असणार आहे.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.) 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी