Multibagger Stock | या शेअरने ५५ दिवसात केले १ लाखाच्या गुंतवणुकीचे ४ लाख

Multibagger Investment | सुप्रीमेक्स शाइन स्टील्स लि. चा शेअर सध्या ९.०३ रुपये प्रति शेअरच्या (Share price of Supremex Shine Steels Ltd) पातळीवर व्यवहार करत आहे. १ नोव्हेंबर २०२१ ला सुप्रीमेक्स शाइन स्टील्स लि. शेअर २.०७ रुपयांच्या किंमतीवर होता. मागील काही महिन्यात या शेअरमध्ये चढउतार झाले आहेत. सध्यादेखील या शेअरच्या किंमतीत घसरण झाली आहे. मात्र फक्त दीड महिन्यात या शेअरने जबरदस्त कमाई करून दिली आहे.

Multibagger Stock
मल्टीबॅगर शेअर 
थोडं पण कामाचं
  • फक्त दीड महिन्यात या शेअरने दिला ३३६ टक्क्यांचा परतावा
  • एक लाखाच्या गुंतवणुकीचे झाले ४.३ लाख रुपये
  • हा पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर शेअर, गुंतवणुकदार झाले मालामाल

Share Market Investment| मुंबई: शेअर बाजारासाठी मागील वर्ष अभूतपूर्व होते. शेअर बाजारातून (Share market)लोकांनी जोरदार कमाई केली आहे. सुप्रीमेक्स शाइन स्टील्स लि. च्या (Supremex Shine Steels Ltd)शेअरने मागील दीड महिन्यात गुंतवणुकदारांना छप्परफाड कमाई करून दिली आहे. सुप्रीमेक्स शाइन स्टील्स लि. चा शेअर सध्या ९.०३ रुपये प्रति शेअरच्या (Share price of Supremex Shine Steels Ltd) पातळीवर व्यवहार करत आहे.  १ नोव्हेंबर २०२१ ला सुप्रीमेक्स शाइन स्टील्स लि. शेअर २.०७ रुपयांच्या किंमतीवर होता. मागील काही महिन्यात या शेअरमध्ये चढउतार झाले आहेत. सध्यादेखील या शेअरच्या किंमतीत घसरण झाली आहे. मात्र फक्त दीड महिन्यात या शेअरने जबरदस्त कमाई करून दिली आहे. हा पेनी स्टॉक (Penny stock) काही महिन्यातच मल्टीबॅगर शेअर (Multibagger stock)बनला आहे. (Share Market: Multibagger Penny stock of Supremex Shine Steels Ltd turned Rs 1 lakh into Rs 4.3 lakhs in 55 days)

सुप्रीमेक्स शाइन स्टील्स लि. ने दिला जबरदस्त परतावा

१ नोव्हेंबर २०२१ ते २५ डिसेंबर २०२१ या जवळपास दीड महिन्यांच्या कालावधीत सुप्रीमेक्स शाइन स्टील्स लि. च्या शेअरने गुंतवणुकदारांना जवळपास ३३६ टक्क्यांचा दणदणीत परतावा दिला आहे. या वर्षातील मधल्या काही महिन्यांमध्ये आलेल्या घसरणीला वगळून या शेअरने शानदार वाटचाल केली आहे. नोव्हेंबर महिन्यात या शेअरमध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक करणाऱ्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य डिसेंबर महिन्यात ४.३ लाख रुपये झाले आहे. सुप्रीमेक्स शाइन स्टील्स लि. ची स्थापना २०११मध्ये झाली होती. 

बाजारातील चढउतार आणि गुंतवणुकदार

मागील दीड वर्ष शेअर बाजारासाठी अभूतपूर्व ठरले आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांकांनी आपली आतापर्यतची उच्चांकी पातळी नोंदवली आहे. मागील काही आठवड्यात झालेल्या घसरणीमुळे हे दोन्ही निर्देशांक उच्चांकीवरून मागे फिरले आहेत. मात्र अजूनही शेअर बाजारात तेजी दिसून येते आहे. अर्थात हा आठवडा शेअर बाजारासाठी फारसा चांगला गेला नाही. सुरूवातीला झालेल्या घसरणीनंतर बाजार पुन्हा सावरला. मात्र चढ उतारांचा सिलसिला सुरू आहे. परकी गुंतवणुकदारांनी भारतीय शेअर बाजारातून मागील दोन महिन्यात मोठी रक्कम काढून घेतली असली तरी देशांतर्गत गुंतवणुकदारांच्या पैशाच्या जोरावर बाजारातील तेजी टिकून आहे. तरुण गुंतवणुकदार आणि नवीन गुंतवणुकदार वर्षभरात मोठ्या प्रमाणात बाजाराकडे आकर्षित झाले आहेत. मागील एका वर्षात मोठ्या संख्येने डीमॅट खाती सुरू झाली आहेत. ओमायक्रॉन, कच्चे तेल आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे धोरण यावर शेअर बाजाराची आगामी दिवसांमधील वाटचाल अवलंबून असणार आहे.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.) 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी