Multibagger stock | या दमदार शेअरने दिला वर्षभरात २,००० टक्क्यांचा परतावा, जबरदस्त कमाई

Multibagger stock | पॉलीमर प्रोसेसिंग करणाऱ्या एक्स्प्रो इंडियाच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना बंपर कमाई करता आली आहे. या शेअरने इक्स्प्रो इंडियाचा २,००० टक्क्यांचा परतावा दिला आहे. या मल्टीबॅगर शेअरने सर्वसामान्य गुंतवणुकदारांना छोट्याशा गुंतवणुकीद्वारे मोठी संपत्ती उभी करून दिली आहे. कंपनीची स्थापना १९९७ मध्ये झाली होती.

Bumper share
जबरदस्त परतावा देणारा शेअर 
थोडं पण कामाचं
  • काही छुप्या रुस्तम शेअर्सनी गुंतवणुकदारांना प्रचंड नफा कमावून दिला
  • इक्स्प्रो इंडिया (Xpro India)या कंपनीच्या शेअरने करून दिली दणदणीत कमाई
  • फक्त वर्षभरात २,००० टक्क्यांचा बंपर परतावा

Multibagger stock | मुंबई: शेअर बाजाराच्या (Share Market)घोडदौडीमुळे यावर्षी अनेक शेअर्स मल्टीबॅगर ठरले आहेत. या मल्टीबॅगर शेअरमध्ये गुंतवणूक केलेल्यांना मोठी कमाई करण्याची संधी मिळाली आहे. मागील फक्त एक ते दीड वर्षाच्या कालावधीतच गुंतवणुकदारांचा पैसा कित्येक पटींनी वाढला आहे. काही छुप्या रुस्तम शेअर्सनी गुंतवणुकदारांना प्रचंड नफा कमावून दिला आहे. पॉलीमर प्रोसेसिंग करणाऱ्या एका कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांचे भांडवल कित्येक पटींनी वाढवले आहे. हा शेअर आहे इक्स्प्रो इंडिया (Xpro India)या कंपनीचा. एक्स्प्रो इंडियाच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना बंपर कमाई करता आली आहे. मागील वर्षी ३३ रुपयांच्या पातळीवर असणारा हा शेअर सध्या ६९३ रुपये प्रति शेअरच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. (Share Market: Investment of Rs 1 Lakh in Multibagger Stock of Xpro India turned to Rs 21 Lakhs in 1 year)

इक्स्प्रो इंडियाचा २,००० टक्क्यांचा परतावा 

सध्या इक्स्प्रो इंडियाचा शेअर ६९३.०० रुपयांच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. फक्त वर्षांपूर्वी म्हणजे ३० डिसेंबर २०२०ला इक्स्प्रो इंडियाच्या शेअरची किंमत ३३.५० रुपये प्रति शेअर इतकी होती. इतक्या कमी किंमतीत मिळणाऱ्या या शेअरने एका वर्षात जवळपास २,००० टक्क्यांचा छप्परफाड परतावा गुंतवणुकदारांना दिला आहे. फक्त १२ महिन्यातच यात गुंतवणूक करणाऱ्यांचे पैसे कित्येक पटींनी वाढले आहेत.

एक लाखाच्या गुंतवणुकीचे २१ लाख रुपये

इक्स्प्रो इंडियाच्या शेअरच्या किंमत वर्षभराच्या कालावधीत जवळपास २१ पट वाढ झाली आहे. एक वर्षापूर्वी या शेअरमध्ये गुंतवलेल्या १ लाखाचे मूल्य आज २१ लाख रुपये झाले आहे. या मल्टीबॅगर शेअरने सर्वसामान्य गुंतवणुकदारांना छोट्याशा गुंतवणुकीद्वारे मोठी संपत्ती उभी करून दिली आहे. कंपनीची स्थापना १९९७ मध्ये झाली होती.

शेअर बाजाराची वाटचाल

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये आज घसरण नोंदवण्यात आली. मात्र तरीही शेअर बाजार विक्रमी पातळीवरच आहे. या वर्षभरात शेअर बाजाराने सध्या अभूतपूर्व तेजी दाखवली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी उच्चांकी पातळी नोंदवली आहे. यामुळे अनेक नवीन सर्वसामान्य गुंतवणुकदार शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे आकर्षित झाले आहेत. अर्थात शेअर बाजारात सावधपणे पावले उचलणेच योग्य ठरते.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.) 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी