Multibagger Stock | अदानींच्या या शेअरने घातली आकाशाला गवसणी....27 रुपयांचा शेअर पोचला 2420 रुपयांवर

Investment in share market : शेअर बाजारात (Share Market) सध्या ज्या उद्योग समूहांच्या कंपन्यांच्या शेअर्सचा बोलबाला आहे त्यात अदानी उद्योग समूहाचा समावेश आहे. अदानी समूहातील हा शेअर गुंतवणुकदारांसाठी मल्टीबॅगर शेअर (Multibagger Stock) ठरला आहे. या दमदार शेअरने गुंतवणुकदारांना छोट्याशा गुंतवणुकीद्वारे श्रीमंत बनवले आहे. अदानी समूहाच्या या शेअरमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांची चांदी झाली आहे.

Multibagger Stock
मल्टीबॅगर शेअर 
थोडं पण कामाचं
  • या मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना तुफान कमाई करून दिली
  • 7 वर्षांत शेअरची किंमत 27.60 रुपयांवरून 2420 रुपयांपर्यंत वाढली
  • गुंतवणुकदारांना मिळाला सुमारे 86,680 टक्क्यांचा छप्परफाड परतावा

Mutlibagger Stock in 2022 : मुंबई : शेअर बाजारात (Share Market) सध्या ज्या उद्योग समूहांच्या कंपन्यांच्या शेअर्सचा बोलबाला आहे त्यात अदानी उद्योग समूहाचा समावेश आहे. अदानी समूहातील हा शेअर गुंतवणुकदारांसाठी मल्टीबॅगर शेअर (Multibagger Stock) ठरला आहे. या दमदार शेअरने गुंतवणुकदारांना छोट्याशा गुंतवणुकीद्वारे श्रीमंत बनवले आहे. अदानी समूहाच्या या शेअरमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांची चांदी झाली आहे. हा शेअर म्हणजे अदानी ट्रान्समिशन (Adani Transmission) या अदानी समूहातील एका कंपनीचा आहे. या मल्टीबॅगर शेअरने गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना तुफान परतावा दिला आहे. (Multibagger stock of Adani Transmission turned Rs 1 Lakh investment into Rs 88 Lakhs)

अदानी समूहाच्या शेअरमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांची दिवाळी झाली आहे. अदानी ट्रान्समिशनच्या शेअर्सचा समावेश 2021 च्या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये होता. कंपनीच्या शेअर्सनी गेल्या 7 वर्षात जबरदस्त परतावा दिला आहे. गेल्या 7 वर्षांत कंपनीच्या शेअरची किंमत 27.60 रुपयांवरून 2420 रुपयांपर्यंत वाढली आहे. अदानी ट्रान्समिशनच्या समभागांनी या कालावधीत गुंतवणुकदारांना सुमारे 86,680 टक्के परतावा दिला आहे.

अधिक वाचा : Multibagger Stock | फक्त 40 पैशांच्या शेअरने घातला धुमाकूळ...12 महिन्यांत 1 लाखाचे झाले 80 लाख रुपये, चिल्लरने बनवले करोडपती!

1 लाख रुपयांचे झाले 88 लाख रुपये

अदानी ग्रुपचा मल्टीबॅगर स्टॉक असलेल्या अदानी ट्रान्समिशनच्या शेअर्सची किंमत 31 मार्च 2015 ला राष्ट्रीय शेअर बाजारात 27.60 रुपये प्रति शेअर इतकी होती. 24 मार्च 2022 ला कंपनीचे शेअर्स 2420 रुपये प्रति शेअर्सच्या  पातळीवर पोहोचले आहेत. या कालावधीत अदानी ट्रान्समिशनच्या शेअर्समध्ये जवळपास 88 पट वाढ झाली आहे. जर एखाद्या व्यक्तीने 7 वर्षांपूर्वी अदानी ट्रान्समिशनच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर त्या गुंतवणुकीचे मूल्य आज जवळपास 88 लाख रुपये झाले असते. म्हणजेच गुंतवणुकीत 88 पटीने वाढ झाली असती.

अधिक वाचा : Multibagger Stock | या इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या फक्त 1 रुपयांच्या शेअरने दिला 2,100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा, गुंतवणुकदार झाले श्रीमंत!

या शेअरने 5 वर्षांत दिला 3600 टक्के परतावा

गेल्या 1 महिन्यात अदानी ट्रान्समिशनचे शेअर्स 2032 रुपयांवरून 2420 रुपयांपर्यंत वाढले आहेत. या काळात कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या 6 महिन्यांत हा मल्टीबॅगर स्टॉक 1578 रुपयांवरून 2420 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत कंपनीच्या समभागांनी सुमारे 55 टक्के परतावा दिला आहे. गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 190 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या 5 वर्षांत कंपनीचे शेअर्स 81.35 रुपयांवरून 2420 रुपयांपर्यंत वाढले आहेत. म्हणजेच या कालावधीत कंपनीच्या समभागांनी गुंतवणूकदारांना सुमारे 3670 टक्के परतावा दिला आहे. अदानी ट्रान्समिशनच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे या कालावधीत मालामाल झाले आहेत.

अधिक वाचा : Multibagger Stock | टाटांच्या कंपनीचा शेअर...चढला तेजीचा जबरदस्त रंग, सलग ८ व्या सत्रात अप्पर सर्किट

भारतीय शेअर बाजाराला सध्या सुगीचे दिवस आले आहेत. मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य गुंतवणुकदार शेअर बाजाराकडे आकर्षित होत आहेत. जगभरातील मोठ्या गुंतवणुकदारांचे लक्ष भारतीय शेअर बाजाराकडे आहेच, मात्र त्याचबरोबर देशांतर्गत गुंतवणुकदारांचाही कल शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे वाढत चालला आहे.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी