Multibagger Stock | सिर्फ ११ महिनेमें पैसा १८ गुना, बोले तो मालामाल, कटिंग चहाच्या किंमतीला मिळणारा आयटी शेअर

Investment in Multibagger stock : मल्टीबॅगर शेअरमध्ये (Multibagger stock) गुंतवणूक केलेल्यांना अभूतपूर्व कमाई करता आली आहे. अशीच छप्परफाड कमाई करून दिली आहे, ब्राइटकॉम ग्रुप (Brightcom Group Ltd)या कंपनीच्या शेअरने. ही एक आयटी क्षेत्रातील कंपनी आहे. ब्राइटकॉम ग्रुपच्या शेअरने फक्त काही महिन्यांतच गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. ब्राइटकॉम ग्रुपचा सध्या शेअर १२४.९५ रुपये प्रति शेअरच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. मात्र या वर्षाच्या सुरूवातीलाच हा शेअर अगदी किरकोळ किंमतीला उपलब्ध होता.

Investment in Multibagger stock
मल्टीबॅगर शेअरमधील गुंतवणूक 
थोडं पण कामाचं
  • छोट्याशा आयटी शेअरची छप्परफाड कमाई
  • फक्त ११ महिन्यात दिला १७०० टक्के परतावा
  • एक लाखाचे झाले १८ लाख रुपये

Share Market Investment | मुंबई: शेअर बाजारातील वर्षभरातील तेजीमुळे यावर्षी अनेक शेअर्स मल्टीबॅगर (Multibagger stock)ठरले आहेत. काही कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतींना मागील थोड्या कालावधीत चांगलेच सुगीचे दिवस आले आहेत. शेअर बाजारात (Share Market) गुंतवणुकदारांनी अभूतपूर्व कमाई केली आहे. मल्टीबॅगर शेअरमध्ये गुंतवणूक (Investment) केलेल्यांना अभूतपूर्व कमाई करता आली आहे. अशीच छप्परफाड कमाई करून दिली आहे, ब्राइटकॉम ग्रुप (Brightcom Group Ltd) या कंपनीच्या शेअरने. ही एक आयटी क्षेत्रातील कंपनी आहे. ब्राइटकॉम ग्रुपच्या शेअरने फक्त काही महिन्यांतच गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. ब्राइटकॉम ग्रुपचा सध्या शेअर १२४.९५ रुपये प्रति शेअरच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. मात्र या वर्षाच्या सुरूवातीलाच हा शेअर अगदी किरकोळ किंमतीला उपलब्ध होता. (Share Market: Multibagger stock of Brightcom Group Ltd turned Rs 1 lakh into Rs 18 lakhs in just 11 months)

Also Read : ​सोन्याची झळाळी वाढली, पाहा सोन्याचा लेटेस्ट भाव

काही महिन्यातच पैसे १८ पट करणारा शेअर

ब्राइटकॉम ग्रुप च्या (Share Price of Brightcom Group Ltd) शेअरची किंमत सध्या १२४.९५ रुपये आहे. मात्र १ जानेवारी २०२१ला हा शेअर फक्त ६.९६ रुपयांना उपलब्ध होता. त्यानंतर अकरा महिन्यात या शेअरने दणदणीत कमाई करून दिली आहे. या शेअरमधील तेजी सुरूच आहे. या शेअरमध्ये काही महिन्यांपूर्वी गुंतवणूक करणारे करोडपती झाले आहेत. या शेअरने जवळपास आठ महिन्यात १,६९५ टक्क्यांचा परतावा दिला आहे. ब्राइटकॉम ग्रुप च्या शेअरमध्ये आठ महिन्यांपूर्वी गुंतवलेल्या १ लाख रुपयाचे मूल्य आज जवळपास १८ लाख रुपये झाले आहे. एरवी छोटासा असणारा हा शेअर गुंतवणुकदारांसाठी मल्टीबॅगर शेअर ठरला आहे. ही एक डिजिटल मार्केटिंग कंपनी आहे. कंपनीची स्थापना २००० मध्ये झाली होती. कंपनीचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. कंपनीचा मागील वर्षाचा महसूल २,७०६ कोटी रुपये होता. 

Also Read :  एक जानेवारीपासून बदलणार गुगल पे चा हा नियम...

शेअर बाजाराची हवा

मागील दोन आठवड्यांमध्ये शेअर बाजाराने चढ उतार दोन्ही नोंदवले. मात्र त्यामुळे गुंतवणुकदारांच्या उत्साहावर परिणाम झालेला नाही. विशेषत: तरुण गुंतवणुकादर शेअर बाजाराकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित झाले आहेत. अर्थात बाजारातील घसरणीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक आपल्या विक्रमी पातळीवरून खाली आले आहेत. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये आज वाढ झाली आहे. या वर्षभरात शेअर बाजाराने सध्या अभूतपूर्व तेजी दाखवली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी उच्चांकी पातळी नोंदवली आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. अर्थात शेअर बाजारात सावधपणे पावले उचलणेच योग्य ठरते. 

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.) 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी