Multibagger Stock | ६० दिनमें हुई सालोंकी कमाई...१ लाखाचे ९ लाख करणारा सुपर शेअर

Investment in share market: ६० दिवसांपूर्वी डिग्जॅम लि. चा शेअरची २० रुपयांच्या आसपास होती. डिग्जॅम लि. च्या (Share price of Digjam Ltd) शेअरने २ महिन्यात जवळपास ७७७ टक्क्यांचा भरघोस परतावा गुंतवणुकदारांना दिला आहे. २२ ऑक्टोबर २०२१ ला या शेअरची किंमत २०.९० रुपये प्रति शेअर होती. सध्या हा शेअर १८३.२० रुपये प्रति शेअर या पातळीवर आहे. फक्त २ महिन्यात या शेअरच्या किंमतीत जवळपास ९ पट वाढ झाली आहे. या मल्टीबॅगर शेअरने गुंतवणुकदारांना मोठी संपत्ती कमावण्याची संधी दिली आहे.

Share Market Investment
जबरदस्त कमाई करून देणारा शेअर 
थोडं पण कामाचं
  • डिग्जॅम लि.च्या शेअरने दिला ७७७ टक्क्यांचा परतावा
  • ६० दिवसात गुंतवणुकदार झाले मालामाल
  • १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे मूल्य झाले जवळपास ९ लाख रुपये

Share Market update | मुंबई: डिग्जॅम लि.च्या शेअरने गुंतवणुकदारांना फक्त ६० दिवसांत जबरदस्त कमाई करून दिली आहे. दोनच महिन्यांपूर्वी २० रुपयांच्या पातळीवर असणाऱ्या या शेअरने ६० दिवसांत सुपर डुपर उसळी घेत गुंतवणुकदारांचे खिसे पैशाने भरून टाकले आहेत. या शेअरने ६० दिवसांच्या कालावधीत कित्येक पटीने वाढ नोंदवली आहे. शेअर बाजारात सध्या पेनी स्टॉक (Penny stock) किंवा छोटे शेअर्स ज्यांची किंमत फारच कमी आहे, अशा शेअर्सची चलती आहे. शेअर बाजाराच्या तेजीत काही शेअर्स मल्टीबॅगर्स (Multibagger stock) बनले आहेत. डिग्जॅम लि. या शेअरने दोनच महिन्यात ७७७ टक्क्यांचा परतावा गुंतवणुकदारांना दिला आहे. (Share Market: Multibagger stock of Digjam Ltd turned Rs 1 lakh into Rs 9 lakhs in 2 months)

डिग्जॅम लि.च्या शेअरची कमाल

६० दिवसांपूर्वी डिग्जॅम लि. चा शेअरची २० रुपयांच्या आसपास होती. डिग्जॅम लि. च्या (Share price of Digjam Ltd) शेअरने २ महिन्यात जवळपास ७७७ टक्क्यांचा भरघोस परतावा गुंतवणुकदारांना दिला आहे. २२ ऑक्टोबर २०२१ ला या शेअरची किंमत २०.९० रुपये प्रति शेअर होती. सध्या हा शेअर १८३.२० रुपये प्रति शेअर  या पातळीवर आहे. फक्त २ महिन्यात या शेअरच्या किंमतीत जवळपास ९ पट वाढ झाली आहे. या मल्टीबॅगर शेअरने गुंतवणुकदारांना मोठी संपत्ती कमावण्याची संधी दिली आहे. यावर्षी छोट्या आणि मध्यम श्रेणीतील शेअर्सनी मोठा परतावा दिला आहे. शेअर बाजारातील तेजी छोट्या आणि मध्यम श्रेणीतील शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या फायद्याची ठरली आहे. २ महिन्यापूर्वी या शेअरमध्ये गुंतवलेल्या १ लाख रुपयांचे मूल्य आज जवळपास ९ लाख रुपये झाले आहे. कंपनीची स्थापना २०१५ मध्ये झाली होती.

सेन्सेक्स आणि निफ्टी

शेअर बाजारात मागील काही दिवसांपासून चढउतार सुरू आहेत. या आठवड्याच्या सुरूवातीला शेअर बाजार गडगडला होता. मात्र त्यानंतर बाजाराने सावरत पुन्हा वाढ नोंदवली आहे. आज दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ५७,३१५ अंशांच्या पातळीवर होता. सेन्सेक्सने आज ३८४ रुपयांची तेजी नोंदवली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या निफ्टीने आज ११७ अंशांच्या वाढीसह १७,०७२ अंशांची पातळी राखली. मागील वर्षापासून शेअर बाजाराने केलेल्या विक्रमी घोडदौडीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी दोघांनीही आतापर्यतची उच्चांकी पातळी गाठली होती. जागतिक शेअर बाजारावर जागतिक घटकांचा परिणाम होतो आहे. त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक आपल्या विक्रमी पातळीवरून खाली आले आहेत. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. अर्थात  शेअर बाजारात सावधपणे पावले उचलणेच योग्य ठरते. तरुण गुंतवणुकदार आणि नवीन गुंतवणुकदार वर्षभरात मोठ्या प्रमाणात बाजाराकडे आकर्षित झाले आहेत. मागील एका वर्षात मोठ्या संख्येने डीमॅट खाती सुरू झाली आहेत.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.) 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी