Multibagger Stock | तोट्यातील कंपनी आली नफ्यात, शेअरने वर्षभरात केले १ लाखाचे १९ लाख

Multibagger stock investment : वर्षभरापूर्वी जिंदाल पॉली इन्व्हेस्टमेंट अॅंड फायनान्सच्या शेअरची किंमत १९.२५ रुपये होती. सध्या हा शेअर ३६८.२० रुपये प्रति शेअरच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. एका वर्षात या शेअरने जवळपास १८१२ टक्क्यांचा जबरदस्त परतावा दिला आहे. या कालावधीत सेन्सेक्स फ्कत २८ टक्क्यांनी वधारला आहे. मात्र या मल्टीबॅगर शेअरने गुंतवणकदारांचा पैसा कित्येक पटींनी वाढवला आहे. या शेअरमध्ये गुंतवलेल्या एक लाख रुपयांचे मूल्य आज जवळपास १९ लाख रुपये झाले आहे.

Money making in Multibagger stock
धुवाधार कमाई करून देणारा शेअर 
थोडं पण कामाचं
  • या शेअरने वर्षभरात दिला १८१२ टक्क्यांचा परतावा
  • जिंदाल पॉली इन्व्हेस्टमेंट अॅंड फायनान्सच्या शेअरमधील १ लाखाच्या गुंतवणुकीचे झाले १९ लाख
  • फक्त १९ रुपयांचा शेअर पोचला ३६८ रुपयांवर

Share Market Investment | मुंबई: शेअर बाजारात (Share market)वर्षभरात ज्या शेअर्सनी दमदार कामगिरी करत गुंतवणुकदारांना मोठी कमाई करून दिली अशा शेअर्समध्ये जिंदाल पॉली इन्व्हेस्टमेंट अॅंड फायनान्स (Jindal Poly Investment & Finance Co Ltd) या शेअरचादेखील समावेश आहे. हा एक मल्टीबॅगर शेअर (Multibagger stock) ठरला आहे. वर्षभरात या शेअरने मोठी तेजी दाखवत गुंतवणुकदारांना कित्येक पटींनी नफा कमावून दिला आहे. शेअर बाजाराने वर्षभरात दाखवलेल्या अभूतपूर्व तेजीमुळे अनेक छोटे शेअर्स मल्टीबॅगर्स बनले आहेत. (Share Market: Multibagger stock of Jindal Poly Investment & Finance Co Ltd turned Rs 1 lakh into Rs 19 lakhs in 12 months)

वर्षभरात १८१२ टक्के परतावा देणारा शेअर

वर्षभरापूर्वी जिंदाल पॉली इन्व्हेस्टमेंट अॅंड फायनान्सच्या शेअरची किंमत १९.२५ रुपये होती. सध्या हा शेअर ३६८.२० रुपये प्रति शेअरच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. एका वर्षात या शेअरने जवळपास १८१२ टक्क्यांचा जबरदस्त परतावा दिला आहे. या कालावधीत सेन्सेक्स फ्कत २८ टक्क्यांनी वधारला आहे. मात्र या मल्टीबॅगर शेअरने गुंतवणकदारांचा पैसा कित्येक पटींनी वाढवला आहे. या शेअरमध्ये गुंतवलेल्या एक लाख रुपयांचे मूल्य आज जवळपास १९ लाख रुपये झाले आहे.

कंपनीची कामगिरी

जिंदाल पॉली इन्व्हेस्टमेंट अॅंड फायनान्स या कंपनीत तीन प्रवर्तक असून त्यांच्याकडे कंपनीचा ७४.६३ टक्के हिस्सा असून उर्वरित २५.३७ टक्के शेअर्स सर्वसामान्य गुंतवणुकदारांकडे आहेत. कंपनीच्या शेअरच्या किंमतीत झालेली जबरदस्त वाढ कंपनीची आर्थिक कामगिरी चांगली झाल्याचे दर्शविते. सप्टेंबरअखेर सरलेल्या तिमाहीत कंपनीला ३०१.३५ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीला ३.८० कोटी रुपयांचा तोटा झाला होता. कंपनीच्या विक्रीत आणि महसूलातदेखील वाढ झाली आहे. सप्टेंबरअखेर कंपनीच्या विक्रीत वाढ होत ती ४७०.७० कोटी रुपयांवर पोचली आहे. तर कंपनीचा ऑपरेटिंग नफा ५,०५४ टक्क्यांनी वाढून २८८.६७ कोटी रुपयांवर पोचला आहे.

शेअर बाजारात सध्या चढ उतार सुरू आहेत. जागतिक शेअर बाजारावर जागतिक घटकांचा परिणाम होतो आहे. अर्थात बाजारातील घसरणीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक आपल्या विक्रमी पातळीवरून खाली आले आहेत. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये आज वाढ झाली आहे. या वर्षभरात शेअर बाजाराने सध्या अभूतपूर्व तेजी दाखवली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी उच्चांकी पातळी नोंदवली आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. अर्थात  शेअर बाजारात सावधपणे पावले उचलणेच योग्य ठरते. 

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.) 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी