Multibagger Stock | फक्त 40 पैशांच्या शेअरने घातला धुमाकूळ...12 महिन्यांत 1 लाखाचे झाले 80 लाख रुपये, चिल्लरने बनवले करोडपती!

Investment in Penny Stock : शेअर बाजार हा कमाईच्या भन्नाट संधीसाठीच लोकप्रिय आहे. अनेक शेअर्स गुंतवणुकदारांना आयुष्यभराची संधी मिळवून देत असतात. अनेकवेळा चांगल्या प्रसिद्ध कंपन्यांचे शेअर्स कमाई करून देत असतात. मात्र त्याचबरोबर छोटे आणि फारसे प्रसिद्ध नसणारे शेअर्सदेखील छप्परफाड कमाई करून देतात. मागील वर्ष तर अशा जबरदस्त मल्टीबॅगर शेअरने (Multibagger Stock) गाजवले आहे. त्याचबरोबर पेनीस्टॉक्सचादेखील मोठा बोलबाला आहे. या तुफान पेनीस्टॉकने गुंतवणुकदारांसाठी मोठी संपत्ती निर्माण करून दिली आहे.

Multibagger Stock
मल्टीबॅगर शेअर 
थोडं पण कामाचं
  • एरवी परिचित नसणाऱ्या या पेनीस्टॉकने गुंतवणुकदारांना बनवले करोडपती
  • फक्त वर्षभरात 1 लाखाचे झाले 80 लाख रुपये
  • 40 पैशांवरून हा मल्टीबॅगर पेनीस्टॉक पोचला 32 रुपयांवर

Multibagger Penny Stock : मुंबई : शेअर बाजार (Share Market) हा कमाईच्या भन्नाट संधीसाठीच लोकप्रिय आहे. अनेक शेअर्स गुंतवणुकदारांना आयुष्यभराची संधी मिळवून देत असतात. अनेकवेळा चांगल्या प्रसिद्ध कंपन्यांचे शेअर्स कमाई करून देत असतात. मात्र त्याचबरोबर छोटे आणि फारसे प्रसिद्ध नसणारे शेअर्सदेखील छप्परफाड कमाई करून देतात. मागील वर्ष तर अशा जबरदस्त मल्टीबॅगर शेअरने (Multibagger Stock) गाजवले आहे. त्याचबरोबर पेनीस्टॉक्सचादेखील (Penny Stock) मोठा बोलबाला आहे. असाच एक तुफान पेनीस्टॉक असे आहे ज्याने गुंतवणुकदारांसाठी मोठी संपत्ती निर्माण (Wealth Creation) करून दिली आहे. या शेअरने गुंतवणुकदारांना छोट्याशा गुंतवणुकीतून करोडपती केले आहे. हा शेअर कोणत्या कंपनीचा आहे आणि त्याने किती कमाई करून दिली आहे ते पाहूया. (Multibagger stock of Kaiser Corporation Ltd turned Rs 1 Lakh investment into Rs 80 Lakhs)

कैसर कॉर्पोरेशनचा सुपर डुपर शेअर (Multibagger Penny Stock of Kaiser Corporation Ltd)

तुम्हीदेखील जर पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर एका भन्नाट पेनीस्टॉक बद्दल जाणून घेऊया. हा मल्टीबॅगर पेनीस्टॉक आहे कैसर कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीचा.  हा या वर्षातील संभाव्य मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक मानला जातो आहे. कैसर कॉर्पोरेशनच्या शेअरने मागील एका वर्षात ७,९२५% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. त्याच वेळी, या स्टॉकने या वर्षी 2022 मध्ये आतापर्यंत 999 टक्के दणदणीत परतावा दिला आहे. मागील अनेक सत्रांपासून हा शेअर सातत्याने अप्पर सर्किटला धडकतो आहे. या वर्षी आतापर्यंत हा शेअर 2 रुपयांवरून 31 रुपयांपर्यंत वाढला आहे.

शेअरची तुफानी तेजी (Share Price of Kaiser Corporation Ltd)

एका वर्षात हा शेअर तडाखेबंद वाढला आहे. 18 मार्च 2021ला या शेअरची किंमत फक्त 40 पैसे प्रति शेअर इतकीच होती. तिथून घोडदौड करत कैसर कॉर्पोरेशनचा हा पैनी शेअर आज 32.10 रुपये प्रति शेअर इतक्या किंमतीचा झाला आहे. या कंपनीच्या शेअरने एका वर्षात 7,925% परतावा दिला आहे. त्याच वेळी, या मल्टीबॅगर पेनी स्टॉकने 2022 मध्ये आतापर्यंत 999.32% चा जबरदस्त परतावा दिला आहे. कैसर कॉर्पोरेशन लि. (Kaiser Corporation Ltd.) चे शेअर्स 3 जानेवारी 2022 ला 2.92 रुपयांच्या पातळीवर होते. तोच आता तुफानी तेजी दाखवत 32.10 रुपयांवर पोचला आहे. कंपनीचे शेअर्स एका महिन्यापूर्वी (13 फेब्रुवारी 2022) 13.53 रुपयांच्या पातळीवर होते. त्यानंतर या शेअरमध्ये 137.25 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये कैसरचा शेअर 21.13% वाढला आहे.

गुंतवणूकदार झाले करोडपती

जर एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी फक्त 1 लाख रुपयांची गुंतवणूक कैसर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या शेअरमध्ये केली असती तर आज त्याचे मूल्य जवळपास 80.25 लाख रुपये झाले असते. जर एखाद्या गुंतवणूकदाराने या वर्षाच्या सुरूवातीला या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे मूल्य 10.99 लाख रुपये झाले असते. त्याच वेळी, एका महिन्यापूर्वी, जर एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये 13.53 रुपयांच्या किंमतीवर या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज ही रक्कम 2.38 लाख रुपये झाली असती. म्हणजेच एका महिन्यातच गुंतवणूकदारांना दुपटीहून अधिक फायदा झाला असेल.

कैसर कॉर्पोरेशनचा व्यवसाय

1993 मध्ये मुंबईत प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून कैसर कॉर्पोरेशनची स्थापना करण्यात आली. 15 मार्च 1995 रोजी, कंपनीचे कैसर प्रेस लिमिटेड नावाने पब्लिक लिमिटेड कंपनीत रूपांतर करण्यात आले. 5 नोव्हेंबर 2013 रोजी कंपनीचे नाव बदलून "कैसर कॉर्पोरेशन लिमिटेड" असे करण्यात आले. कैसर कॉर्पोरेशन लि. ही कंपनी लेबल, स्टेशनरी वस्तू, मासिके आणि कार्टन्सच्या व्यवसायात काम करते. कैसर कॉर्पोरेशनच्या साहाय्यक कंपन्यांद्वारे अभियांत्रिकी वस्तू, इलेक्ट्रिक आणि मेकॅनिकल हीट ट्रेसिंग आणि टर्नकी प्रकल्पांमध्ये देखील व्यवहार करते.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी