Share Market Investment | मुंबई: शेअर बाजारात सध्या पेनी स्टॉकचा बोलबाला आहे. मागील काही महिन्यात पेनी शेअर्सनी (Penny stock) गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. छोट्या शेअर्समधून मोठी कमाई करता येते मात्र अशा गुंतवणुकीत मोठा धोका असतो. काही पेनी स्टॉक्सनी गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. ली अॅंड नी सॉफ्टवेअर्स (Lee And Nee Softwares) हा शेअर असाच एक दमदार शेअर आहे. हा शेअर सध्या तेजीत आहे. हा पेनी स्टॉक यावर्षी मल्टीबॅगर शेअर (Multibagger stock) बनला आहे. यावर्षी या शेअरने गुंतवणुकदारांना कित्येक पटींनी नफा कमावून दिला आहे. शेअर बाजाराने (Share market) वर्षभरात दाखवलेल्या अभूतपूर्व तेजीमुळे अनेक छोटे शेअर्स मल्टीबॅगर्स बनले आहेत. (Share Market: Multibagger stock of Lee And Nee Softwares turned Rs 1 lakh into Rs 7 lakhs in 7 months)
सध्या हा शेअर १७.४४ रुपये प्रति शेअर (Share price of Lee And Nee Softwares) या पातळीवर आहे. ली अॅंड नी सॉफ्टवेअर्सच्या शेअरने महिनाभरात जवळपास ६३६ टक्क्यांचा भरघोस परतावा गुंतवणुकदारांना दिला आहे. १४ मे २०२० ला या शेअरची किंमत २.३७ रुपये प्रति शेअर होती. जवळपास ७ महिन्यात या शेअरच्या किंमतीत जवळपास ७ पट वाढ झाली आहे. या मल्टीबॅगर शेअरने गुंतवणुकदारांना मोठी संपत्ती कमावण्याची संधी दिली आहे. यावर्षी छोट्या आणि मध्यम श्रेणीतील शेअर्सनी मोठा परतावा दिला आहे. शेअर बाजारातील तेजी छोट्या आणि मध्यम श्रेणीतील शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या फायद्याची ठरली आहे. महिनाभराच्या कालावधीत या शेअरने ६३६ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. सात महिन्यापूर्वी या शेअरमध्ये गुंतवलेल्या १ लाख रुपयांचे मूल्य आज जवळपास ७.३ लाख रुपये झाले आहे. कंपनीची स्थापना १९८८ मध्ये झाली होती.
शेअर बाजाराचे आकर्षण छोट्या गुंतवणुकदारांना भुरळ घालते आहे. शेअर बाजारात सध्या चढ उतार सुरू आहेत. जागतिक शेअर बाजारावर जागतिक घटकांचा परिणाम होतो आहे. अर्थात बाजारातील घसरणीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक आपल्या विक्रमी पातळीवरून खाली आले आहेत. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये आज वाढ झाली आहे. या वर्षभरात शेअर बाजाराने सध्या अभूतपूर्व तेजी दाखवली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी उच्चांकी पातळी नोंदवली आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. अर्थात शेअर बाजारात सावधपणे पावले उचलणेच योग्य ठरते.
(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)