Multibagger stock | फक्त ८ महिन्यात ९०० टक्के परतावा देणारा हा आहे 'अनमोल रतन' शेअर

Multibagger stock RattanIndia Enterprises | रतनइंडिया एंटरप्राइझेसच्या (Share Price of RattanIndia Enterprises) शेअरची किंमत सध्या ४३.९५ रुपये आहे. मात्र ६ एप्रिल २०२१ ला हा शेअर फक्त ४.४८ रुपयांना उपलब्ध होता. त्यानंतर आठच महिन्यात या शेअरने धुवाधार कामगिरी करून दाखवली आहे. सध्या या शेअरमध्ये मोठी घसरण होत लोअर सर्किट जरी लागलेले असले तरी या शेअरमध्ये काही महिन्यांपूर्वी गुंतवणूक करणारे करोडपती झाले आहेत. कंपनीचे बाजारमूल्य सध्या ६,०७५ कोटी रुपये आहे.

Multibagger Stock of RattanIndia Enterprises
रतनइंडिया एंटरप्राइझेसचा मल्टीबॅगर शेअर 
थोडं पण कामाचं
  • रतनइंडियाच्या छोट्याशा शेअरने गुंतवणुकदारांना केले करोडपती
  • फक्त ८ महिन्यात दिला ९०० टक्के परतावा
  • एक लाखाचे झाले दहा लाख रुपये

Multibagger stock  in Share market  | मुंबई: सध्या शेअर बाजारात (Share Market) तेजीबरोबरच घसरण देखील दिसून येते आहे. मागील काही दिवसात शेअर बाजारात घसरण झालेली पाहायला मिळाली. त्यामुळे बाजाराच्या घोडदौडीला लगाम बसला आहे. अर्थात शेअर बाजारातील वर्षभरातील तेजीमुळे यावर्षी अनेक शेअर्स मल्टीबॅगर (Multibagger stock)ठरले आहेत. काही कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतींना मागील थोड्या कालावधीत चांगलेच सुगीचे दिवस आले आहेत. काही मल्टीबॅगर शेअरमध्ये गुंतवणूक केलेल्यांना मोठी कमाई करण्याची संधी मिळाली आहे. असाच एक जबरदस्त शेअर आहे रतनइंडिया एंटरप्राइझेस (RattanIndia Enterprises)या कंपनीचा. रतनइंडिया एंटरप्राइझेसच्या शेअरने फक्त काही महिन्यांतच गुंतवणुकदारांना दणदणीत कमाई करून दिली आहे. सध्या हा शेअर ४३.९५ रुपये प्रति शेअरच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. (Share Market: Multibagger stock of RattanIndia Enterprises gave 900% returns in just 8 months)

रतनइंडिया एंटरप्राइझेसच्या शेअरची घौडदोड

रतनइंडिया एंटरप्राइझेसच्या (Share Price of RattanIndia Enterprises) शेअरची किंमत सध्या ४३.९५ रुपये आहे. मात्र ६ एप्रिल २०२१ ला हा शेअर फक्त ४.४८ रुपयांना उपलब्ध होता. त्यानंतर आठच महिन्यात या शेअरने धुवाधार कामगिरी करून दाखवली आहे. सध्या या शेअरमध्ये मोठी घसरण होत लोअर सर्किट जरी लागलेले असले तरी या शेअरमध्ये काही महिन्यांपूर्वी गुंतवणूक करणारे करोडपती झाले आहेत. कंपनीचे बाजारमूल्य सध्या ६,०७५ कोटी रुपये आहे. या शेअरने जवळपास आठ महिन्यात ८८१ टक्क्यांचा परतावा दिला आहे.

आठ महिन्यात १ लाखाचे झाले १० लाख

रतन इंडियाच्या शेअरमध्ये आठ महिन्यांपूर्वी गुंतवलेल्या १ लाख रुपयाचे मूल्य आज जवळपास १० लाख रुपये झाले आहे. काही महिन्यांच्या कालावधीतच या शेअरने जवळपास ९०० टक्क्यांचा परतावा देत गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. छोटासा असणारा हा शेअर गुंतवणुकदारांसाठी मल्टीबॅगर शेअर ठरला आहे. एका वर्षात रतन इंडियाचा शेअर ६८६ टक्क्यांनी वधारला आहे. तर यावर्षाच्या सुरूवातीपासून आतापर्यत या शेअरच्या किंमतीत ५५० टक्क्यांची वाढ झाली आहे. याआधी जुलै महिन्यात हा शेअर आतापर्यतच्या उच्चांकीवर म्हणजे ७०.६५ रुपयांच्या किंमतीवर पोचला होता. सप्टेंबरअखेर कंपनीची ७४.८० टक्के हिस्सेदारी चार प्रवर्तकांकडे आहे. तर उर्वरित म्हणजे २५.२० टक्के शेअर्सची मालकी सर्वसामान्य गुंतवणुकदारांकडे आहे.

शेअर बाजाराची हवा

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये सध्या घसरण दिसून येते आहे. मात्र तरीही शेअर बाजाराची दिशा तेजीचीच आहे. या वर्षभरात शेअर बाजाराने सध्या अभूतपूर्व तेजी दाखवली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी उच्चांकी पातळी नोंदवली आहे. यामुळे अनेक नवीन सर्वसामान्य गुंतवणुकदार शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे आकर्षित झाले आहेत. मागील दीड वर्षात अनेक छोटे गुंतवणुकदार शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे आकर्षित झाले आहेत. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. अर्थात शेअर बाजारात सावधपणे पावले उचलणेच योग्य ठरते. 

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.) 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी