Multibagger Stock | हा १ रुपयाचा चिल्लर शेअर ठरला खजिन्याची किल्ली, करून दिली आयुष्यभराची कमाई, हजारो पट नफा

Investment in Multibagger stock : या अस्थिर वातावरणात धाडसाने शेअर बाजारात गुंतवणूक (Investment in share market) करणाऱ्यांना बाजाराने चांगली परतफेड केली आहे. शेअर बाजारातील या अभूतपूर्व तेजीमुळे अनेक शेअर्स मल्टीबॅगर्स (Multibagger stock) ठरले आहेत. छोट्या शेअरनेदेखील गुंतवणुकदारांना तडाखेबंद कमाई करून दिली आहे. पेनी स्टॉकचा तर या दिवसांमध्ये बोलबाला आहे. असाच एक पेनी स्टॉक असलेला मात्र आता मल्टीबॅगर स्टॉक बनलेला शेअर आहे सुरज इंडस्ट्रीज (Suraj Industries) या कंपनीचा.

Penny stock become Multibagger stock
या चिल्लर शेअरने करून दिली आयु्ष्यभराची कमाई 
थोडं पण कामाचं
  • पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, करून दिली आयुष्यभराची कमाई
  • दिला साडेसहा हजार पटींपेक्षा जास्त परतावा
  • १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे झाले ६६ लाख रुपये

Share Market Investment | मुंबई: कोरोना महामारीने अर्थव्यवस्थेला लोळवल्यानंतरदेखील शेअर बाजाराने (Share Market) मागील दीड वर्षात जबरदस्त मुसंडी मारली आहे. या अस्थिर वातावरणात धाडसाने शेअर बाजारात गुंतवणूक (Investment in share market) करणाऱ्यांना बाजाराने चांगली परतफेड केली आहे. शेअर बाजारातील या अभूतपूर्व तेजीमुळे अनेक शेअर्स मल्टीबॅगर्स (Multibagger stock) ठरले आहेत. छोट्या शेअरनेदेखील गुंतवणुकदारांना तडाखेबंद कमाई करून दिली आहे. पेनी स्टॉकचा तर या दिवसांमध्ये बोलबाला आहे. असाच एक पेनी स्टॉक असलेला मात्र आता मल्टीबॅगर स्टॉक बनलेला शेअर आहे सुरज इंडस्ट्रीज (Suraj Industries) या कंपनीचा. सुरज इंडस्ट्रीजच्या शेअरने फक्त काही महिन्यांतच गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. मागील वर्षी सुरज इंडस्ट्रीजचा शेअर फक्त एक रुपयात मिळत होता. त्यानंतर त्यात कित्येक पटींची वाढ झाली आहे. (Share Market: Multibagger stock of Suraj Industries turned Rs 1 lakh into Rs 66 lakhs in just 15 months)

वर्षभरात गुंतवणूक 66 पट करणारा छोटासा शेअर

सुरज इंडस्ट्रीजच्या (Share Price of Suraj Industries) शेअरची किंमत सध्या ७८.१५ रुपये आहे. मात्र १९ ऑगस्ट २०२० ला हा शेअर फक्त १.१८ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता. त्यानंतर अकरा महिन्यात या शेअरने दणदणीत कमाई करून दिली आहे. या शेअरमधील तेजी सुरूच आहे. या शेअरमध्ये काही महिन्यांपूर्वी गुंतवणूक करणारे करोडपती झाले आहेत. या शेअरने जवळपास १५ महिन्यात ६,५२२ टक्क्यांचा परतावा दिला आहे. सुरज इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये १५ महिन्यांपूर्वी गुंतवलेल्या १ लाख रुपयाचे मूल्य आज जवळपास ६६ लाख रुपये झाले आहे. एरवी छोटासा असणारा हा शेअर गुंतवणुकदारांसाठी मल्टीबॅगर शेअर ठरला आहे. सुरज इंडस्ट्रीज या कंपनीची स्थापना १९९२ मध्ये झाली होती. या छोट्याशा शेअर गुंतवणुकदारांसाठी मोठी संपत्ती (Wealth creation) निर्माण केली आहे.

शेअर बाजाराची दिशा

मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात चढ उतार सुरू आहेत. तरीही बाजाराचा एकंदरीत कल सकारात्मकच दिसून येतो आहे. गुंतवणुकदारांच्या उत्साहावरदेखील याचा परिणाम झालेला नाही. मागील दीड वर्षात तरुण गुंतवणुकादर शेअर बाजाराकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित झाले आहेत. अर्थात बाजारातील घसरणीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक आपल्या विक्रमी पातळीवरून खाली आले आहेत. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये आज वाढ झाली आहे. या वर्षभरात शेअर बाजाराने सध्या अभूतपूर्व तेजी दाखवली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी उच्चांकी पातळी नोंदवली आहे. 

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.) 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी