Multibagger Stock: हा शेअर एका महिन्यात वाढला 75 टक्क्यांनी... त्यात कंपनीने केली अशी घोषणा की गुंतवणुकदारांची झाली डबल दिवाळी

Share Market Investment : शेअर बाजारातील (Share Market) गुंतवणूक ही जोखीमयुक्त असते. इथे तुमचा एक निर्णय तुम्हाला करोडपती बनवू शकतो, पण तुमचा एक चुकीचा निर्णय तुम्हाला अडचणीतदेखील आणू शकतो. जागतिक परिस्थितीचा दबाव सध्या शेअर बाजारातही दिसून येत आहे. त्यामुळेच बाजारात विक्रीचे वातावरण आहे. या वातावरणातही काही मल्टीबॅगर शेअर्स (Multibagger Stock) त्यांच्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहेत.

Multibagger Stock
मल्टीबॅगर शेअर 
थोडं पण कामाचं
  • या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर जाहीर केला
  • या शेअरने एकाच महिन्यात दिला 75 टक्क्यांचा परतावा
  • शेअर दाखवतोय तेजीचा ट्रेंड, शेअरची किंमत 25.90 रुपयांवरून 57 रुपयांच्या पातळीवर

Multibagger Stock 2022: मुंबई : शेअर बाजारातील (Share Market) गुंतवणूक ही जोखीमयुक्त असते. इथे तुमचा एक निर्णय तुम्हाला करोडपती बनवू शकतो, पण तुमचा एक चुकीचा निर्णय तुम्हाला अडचणीतदेखील आणू शकतो. जागतिक परिस्थितीचा दबाव सध्या शेअर बाजारातही दिसून येत आहे. त्यामुळेच बाजारात विक्रीचे वातावरण आहे. या वातावरणातही काही मल्टीबॅगर शेअर्स (Multibagger Stock) त्यांच्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहेत. अशावेळी जेव्हा शेअर बाजारातील एखादा शेअर जबरदस्त परतावा देत असतो आणि त्याच वेळी कंपनी बोनस जाहीर करते तेव्हा गुंतवणुकदारांना लॉटरी लागण्याचाच आनंद होतो. ( Multibagger Stock  of Yug Decor Ltd has given 75% returns in one month)

अधिक वाचा : Vastu Tips for home: रात्री झोपताना बेडरूममध्ये पती-पत्नीने करू नये 'या' चुका, अन्यथा...

गुंतवणुकदारांना मिळणार बोनस शेअर

असाच एक मल्टीबॅगर स्टॉक (Multibagger Stock) म्हणजे युग डेकोर लिमिटेड (Yug Decor Ltd) या कंपनीचा शेअर. या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर जाहीर केला आहे. 16 ऑगस्ट रोजी झालेल्या कंपनीच्या बोर्डाच्या बैठकीत कंपनीने हा मोठा निर्णय घेतला आहे.  या समभागाने गुंतवणुकदारांना जोरदार परतावा दिला आहे. या शेअरबद्दल जाणून घेऊया.

अधिक वाचा : Cuttputlli teaser launch: 'कटपुतली' सिनेमाचा टीझर रिलीज, अक्षय कुमार उलगडणार सीरियल किलरचा माईंड गेम

या शेअरने दिला तुफान परतावा

हा शेअर या वर्षातील अशा काही समभागांपैकी एक आहे ज्याने गुंतवणुकदारांना निराश केले नाही. कंपनीने गेल्या एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 75% चा उत्कृष्ट परतावा दिला आहे. या कंपनीचे शेअर्स अवघ्या एका महिन्यात 32.50 रुपयांवरून 57 रुपये प्रति शेअरच्या पातळीवर पोचले आहेत. गेल्या 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने BSE वर जवळपास 90% उसळी घेतली आहे. 2022 च्या संपूर्ण वर्षाबद्दल बोलायचे झाले तर, आतापर्यंत युग डेकोरने या कालावधीत 120% परतावा दिला आहे. 3 जानेवारी 2022 ते 16 ऑगस्ट या कालावधीत कंपनीच्या शेअरची किंमत 25.90 रुपयांवरून 57 रुपयांच्या पातळीवर पोचली आहे. यावरून या शेअरचा तेजीचा ट्रेंड दिसून येतो.

मिळणार बोनस शेअर

आता कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत कंपनीने म्हटले आहे की, 'पात्र शेअरधारकांना 2 शेअरसाठी एक शेअर बोनस स्वरूपात दिला जाईल. कंपनीकडून रेकॉर्ड डेटही लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. या कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांक 63.55 रुपये आहे, तर नीचांकी पातळी 22 रुपये प्रति शेअर आहे.

अधिक वाचा : पुण्यात Income Tax अधिकाऱ्याच्या घरी चोरी, मोलकरीणच निघाली मास्टरमाईंड

कंपनी काय करते?

ही कंपनी गुजरातमध्ये 2003 मध्ये स्थापन झाली असून गोंद म्हणजे डिंक बनवण्याचा व्यवसाय करते. कंपनीने गेल्या आर्थिक वर्षात चांगला महसूलही कमावला आहे.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी