Stock market news updates: शेअर बाजारात चढउतार होतच असतात. गेल्या काही वर्षांत भारतीय स्टॉक मार्केटमध्ये असे काही स्टॉक्स आहेत ज्यांनी फारच कमी वेळेत बंपर रिटर्न्स दिले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्टॉक संदर्भात सांगणार आहोत. ज्याने गुंतवणुकदारांना मालामाल केलं आहे. या स्टॉकने गेल्या सहा महिन्यांमध्ये गुंतवणुकदारांना मोठा परतावा मिळवून दिला आहे.
या स्टॉकचं नाव आहे वेरेनियम क्लाऊड (Varanium Cloud shares). वेरेनियम क्लाऊड या शेअरने गुंतवणुकदारांना सलग चांगला परतावा मिळवून दिला आहे. सहा महिन्यांपूर्वी ज्या गुंतवणुकदारांनी वेरेनियम क्लाऊड या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवणूक केली होती त्यांना आतापर्यंत जवळपास 28 लाख रुपयांचा परतावा मिळाला आहे. म्हणजेच गुरुवारी वेरेनियम क्लाऊड हा शेअर 700 रुपयांवर पोहोचला. या शेअरमध्ये खूपच तेजी पहायला मिळत आहे.
हे पण वाचा : कमी झोपणाऱ्यांनो सावधान..., आरोग्याला होऊ शकते मोठे नुकसान
वेरेनियम क्लाऊडचा आयपीओ सप्टेंबर 2022 मध्ये 122 रुपये प्रति इक्विटी शेअर प्राईस बँडवर लॉन्च करण्यात आला होता. 27 सप्टेंबर 2022 रोजी हा शेअर लिस्ट झाला होता. एनएसई, एसएमई एक्सचेंजवर 131 रुपये प्रति शेअर 7 टक्के प्रीमियमवर लिस्ट झाला होता. हा एसएमई शेअर जानेवारी 2023 मध्ये एनएसईवर 1602 रुपयांच्या आपल्या आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचला होता. लिस्टिंग नंतर या शेअरने गुंतवणुकदारांना 1200 टक्के इतका बंपर रिटर्न दिला आहे.
हे पण वाचा : लग्न करण्याचे तोटे, वाचल्यावर म्हणाल काय खरे अन् काय खोटे
कंपनीने नुकतेच गुंतवणुकदारांना बोनस शेअर देण्याची घोषणा केली होती. कंपनीने 1:2 स्टॉक विभाजन आणि मार्च 2023 मध्ये 1:1 बोनस शेअर देण्याची घोषणा केली होती. अशा स्थितीत लिस्टिंग झाल्यावर ज्या गुंतवणुकदारांनी कंपनीचे शेअर्स होल्ड केले आहेत त्यांचे शेअर्सचा भाव चार पटीने वाढला आहे.
हे पण वाचा : सिझेरियन डिलिव्हरीनंतर या गोष्टी अजिबात करू नका
हा शेअर 122 रुपयांवर लॉन्च झाला होता. 1:1 बोनसची घोषणा केल्यावर गुंतवणुकदारांच्या शेअर्सची एकूण संख्या दोन हजार इतकी झाली आहे. आता 1:2 स्टॉक विभाजनाची घोषणा झाल्यावर ही संख्या जवळपास चार हजार झाली आहे. आयपीओमध्ये एका लॉटसाठी गुंतवणुकदारांनी 1.22 लाख रुपये जमा करायचे होते. जर एखाद्या गुंतवणुकदाराने आतापर्यंत हा शेअर होल्ड केला आहे त्यांच्या शेअर्सची संख्या 4 हजार शेअर्सपर्यंत वाढते. आता या शेअरची किंमत 700 रुपयांच्या घरात आहे. जर एखाद्या गुंतवणुकदाराने या शेअर्सला आतापर्यंत होल्ड करुन ठेवलं असेल त्यांच्या गुंतवणुकीचा परतावा हा जवळपास 28 लाख रुपये इतका झाला असेल.