19kg cylinder of LPG मुंबई: व्यावसायिक सिलेंडर महागला

व्यावसायिक हेतूसाठी वापरला जाणारा १९ किलोचा एलपीजी सिलेंडर मुंबईत २६६ रुपयांनी महागला. आता हा सिलेंडर मुंबईत १९५० रुपयांना उपलब्ध आहे.

Mumbai: 19kg cylinder of LPG up Rs 266
मुंबई: व्यावसायिक सिलेंडर महागला 
थोडं पण कामाचं
  • मुंबई: व्यावसायिक सिलेंडर महागला
  • १९ किलोचा एलपीजी सिलेंडर मुंबईत २६६ रुपयांनी महागला
  • एक लिटर पेट्रोल ११५.८५ रुपये आणि एक लिटर डिझेल १०६.६२ रुपये या दराने उपलब्ध

Mumbai: 19kg cylinder of LPG up Rs 266 । मुंबईः व्यावसायिक हेतूसाठी वापरला जाणारा १९ किलोचा एलपीजी सिलेंडर मुंबईत २६६ रुपयांनी महागला. आता हा सिलेंडर मुंबईत १९५० रुपयांना उपलब्ध आहे. घरगुती वापराच्या १४.२ किलोच्या सिलेंरच्या दरात बदल झालेला नाही. यामुळे घरगुती वापराचा १४.२ किलोचा सिलेंडर मुंबईत ९०० रुपयांना उपलब्ध आहे. मुंबईत आज (मंगळवार २ नोव्हेंबर २०२१) एक लिटर पेट्रोल ११५.८५ रुपये आणि एक लिटर डिझेल १०६.६२ रुपये या दराने उपलब्ध आहे.

दिल्लीत आज एक लिटर पेट्रोल ११०.०४ रुपये आणि एक लिटर डिझेल ९८.४२ रुपये या दराने उपलब्ध आहे. कोलकातामध्ये आज एक लिटर पेट्रोल ११०.४९ रुपये आणि एक लिटर डिझेल १०१.५६ रुपये या दराने उपलब्ध आहे. चेन्नईमध्ये आज एक लिटर पेट्रोल १०६.६६ रुपये आणि एक लिटर डिझेल १०२.५९ रुपये या दराने उपलब्ध आहे. बंगळुरूमध्ये आज एक लिटर पेट्रोल ११३.९३ रुपये आणि एक लिटर डिझेल १०४.५० रुपये या दराने उपलब्ध आहे. हैदराबादमध्ये आज एक लिटर पेट्रोल ११४.४९ रुपये आणि एक लिटर डिझेल १०७.४० रुपये या दराने उपलब्ध आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी