Mumbai Real Estate Deal of 250 crore: मुंबईत रिअल इस्टेट प्रॉपर्टीची एक मोठी डील झाली आहे. मुंबईतील मलबार हिल परिसरात समुद्र किनाऱ्यावर असलेल्या पेंटहाऊससाठी तब्बल 250 कोटी रुपये मोजण्यात आले आहेत. समुद्राच्या अगदी समोर असलेलं ट्रिपलक्स अपार्टमेंट नेमकं कसं आहे आणि कोणी खरेदी केलं? जाणून घ्या...
हे पण वाचा : अरे बापरे! तुमची ढेकर या गंभीर आजाराचे असू शकते लक्षण
बजाज ऑटोचे चेअरमन मलबार हिलमध्ये मेक्रोटेक डेव्हलपर्सकडून सी-फेसिंग ट्रिपलक्स अपार्टमेंट खरेदी केला आहे. या अपार्टमेंटची किंमत 252.5 कोटी रुपये असल्याचं बोललं जात आहे. मुंबईत झालेल्या या मोठ्या रिअल इस्टेट व्यवहाराचे अॅग्रीमेंट 13 मार्च 2023 मध्ये झालं आहे. कागदपत्रांनुसार, खरेदी करण्यात आलेल्या तीन अपार्टमेंटचा एकूण एरिया हा 18,008 स्वेअर फूट (कारपेट एरिया 12,624 स्वेअर फूट) इतका आहे. तर पार्किंगसाठी 8 स्लॉट्स देण्यात आले आहेत.
हे पण वाचा : सकाळी रिकाम्या पोटी काळा चहा पिण्याचे 5 जबरदस्त फायदे
Just In | Chairman of Bajaj Auto, Niraj Bajaj has bought a plush penthouse in Mumbai's 'Malabar Hill', for a whopping cost of Rs 252.5 cr. #BajajAuto #NirajBajaj #Mumbai #MalabarHill pic.twitter.com/DEVWS7x2px — ET NOW (@ETNOWlive) March 15, 2023
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रॉपर्टीच्या डीलसाठी भरण्यात आलेलं मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) 15.15 कोटी रुपये इतकं आहे. हा प्रोजेक्ट लोढा मलबार पॅलेस असून त्यामध्ये एकूण 31 फ्लोअर्स आहेत. स्थानिक ब्रोकर्सने सांगितले की, लोढा द्वारा सुरू करण्यात आलेल्या हा एक रिडेव्हलपमेंट लक्झरी प्रोजेक्ट आहे. येथे एका यूनिटची कमीत कमी साईज 9,000 स्क्वेअर फूट इतकी आहे. या ठिकाणी प्रत्येक अपार्टमेंटची किंमत 100 कोटी रुपयांहून अधिक आहे.
हे पण वाचा : टॉवेल न धुतल्याने होऊ शकते मोठे नुकसान
गेल्या महिन्यात वेलस्पन ग्रुपचे चेअरमन बीके गोयंका यांनी 230 कोटी रुपायांत एक पेंटहाऊस खरेदी केलं होतं. ज्यानंतर काही दिवसांतच 1238 कोटी रुपयांचं 28 हाऊसिंग युनिट् राधाकृष्ण दमानी यांच्या कुटुंबातील सदस्यांनी खरेदी केलं होतं.