मुंबईत सीएनजी ८० रुपये किलो आणि पीएनजी ४८.५० रुपये किलो

Mumbai: CNG and PNG prices go up again : मुंबईत बुधवार १३ जुलै २०२२ पासून सीएनजी ८० रुपये किलो आणि पीएनजी ४८.५० रुपये किलो या दराने उपलब्ध होणार आहे.

Mumbai: CNG and PNG prices go up again
मुंबईत सीएनजी ८० रुपये किलो आणि पीएनजी ४८.५० रुपये किलो  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मुंबईत सीएनजी ८० रुपये किलो आणि पीएनजी ४८.५० रुपये किलो
  • आधी सीएनजी ७६ रुपये किलो आणि पीएनजी ४५.५० रुपये किलो या दराने उपलब्ध होता
  • सीएनजीत ४ रुपये प्रति किलो आणि पीएनजीत ३ रुपये प्रति किलो एवढी दरवाढ

Mumbai: CNG and PNG prices go up again : मुंबईत बुधवार १३ जुलै २०२२ पासून सीएनजी ८० रुपये किलो आणि पीएनजी ४८.५० रुपये किलो या दराने उपलब्ध होणार आहे. आधी सीएनजी ७६ रुपये किलो आणि पीएनजी ४५.५० रुपये किलो या दराने उपलब्ध होता. पण सीएनजीत ४ रुपये प्रति किलो आणि पीएनजीत ३ रुपये प्रति किलो एवढी दरवाढ करण्यात आली. यामुळे बुधवार १३ जुलै २०२२ पासून मुंबईत मिळणाऱ्या सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. ही माहिती महानगर गॅस कंपनीच्या मुंबई कार्यालयाने दिली. । काम-धंदा

मुंबईत एक लिटर पेट्रोल १११ रुपये ३५ पैसे आणि एक लिटर डिझेल ९७ रुपये २८ पैसे या दराने उपलब्ध आहे. वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सीएनजीचा दर पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत कमी आहे. यामुळे सीएनजी गॅसचा वापर करून वाहन चालविणे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे आणि पर्यावरणाच्यादृष्टीने हिताचे आहे. 

मुंबई महानगर प्रदेशात (Mumbai Metropolitan Region - MMR) बहुसंख्य रिक्षा, टॅक्सी, बस सीएनजी गॅसचा वापर करतात. यामुळे ७६ रुपये किलो दराने सीएनजी खरेदी करून वाहन चालविणाऱ्यांच्या आर्थिक गणितात बुधवार १३ जुलै २०२२ पासून परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे.

आज पेट्रोल किती दराने उपलब्ध?

आजचा पेट्रोलचा दर आणि आजचा डिझेलचा दर जाणून घेणे सोपे आहे. भारतात दररोज सकाळी सहा वाजता प्रत्येक कंपनी त्यांचा पेट्रोल आणि डिझेलचा दर जाहीर करते. तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज एसएमएसद्वारेही पाहू शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> 9224992249 वर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक 9222201122   या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक 9223112222 या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.

लक्षात ठेवा प्रत्येक राज्यातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये तफावत असू शकते. संबंधित राज्यात इंधनावर लागू होणाऱ्या करांनुसार त्या राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित होतात. राज्यांचे एकमत होत नसल्यामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलवर जीएसटी लागू होत नाही. पेट्रोल आणि डिझेलवर देशात केंद्राचे तसेच राज्यांचे असे वेगवेगळे कर लागू होतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी