Gold Price: सोन्याच्या भाव आज झाले कमी, जाणून घ्या रेट 

काम-धंदा
Updated May 20, 2019 | 19:21 IST | टाइम्स नाऊ मराठी

Gold Price:  सोन्याच्या भावात सोमवारी घट जाणवली. दिल्लीच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घट दिसून आली. जाणून घ्या मुंबईत आजचा दर काय आहे. 

gold price in mumbai
सोन्याचा मुंबईतील दर   |  फोटो सौजन्य: Thinkstock

नवी दिल्ली :  जागतिक बाजारपेठेत सोन्याची मागणी कमी झाल्याने स्थानिक बाजारात दागिन्यांची निर्मितीसाठी सोन्याची कमी मागणी नोंदविण्यात आल्याने दिल्ली सराफा बाजार सोन्याच्या किंमतीत १५० रुपयांनी घट झाली. त्यामुळे सोन्याचे दर दिल्ली प्रति १० ग्रॅमला ३२.७२० रुपये झाला आहे. मुंबई हा रेट प्रति दहा ग्रॅमसाठी ३२ हजार ५८० रुपये  झाला आहे. 

बाजारातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परदेशातील कमकुवत ट्रेंड आणि स्थानिक बाजारात दागिने तयार करणाऱ्या व्यापाऱ्यांनी केलेली कमी मागणी यामुळे सोने बाजारात घट दिसून आली. तसेच किंमतीवरही दबाव दिसून आला. तसेच स्थानिक शेअर बाजार आणि रुपयांतील तेजी यामुळे सराफा बाजारावर परिणाम झाला. 

लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल आल्यानंतर एनडीएला बहुमत मिळणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला. त्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १४०० अंकापेक्षा अधिक वाढला. तसेच अंर्तबँक विदेशी विनिमय बाजारातील व्यापारात रुपयाच्या मुल्यात ६३ पैशांनी सुधार झाली. त्यामुळे डॉलरच्या तुलने रुपयाचे मूल्य ६९.६० रुपये प्रति डॉलर झाला आहे. 

जागतिक स्तरावर न्यूयॉर्कमध्ये सोन्याचा भाव १२७५.३० डॉलर प्रति औंस झाला आहे. तर चांदीच्या किंमतीतही घट झाली आणि १४.४३ डॉलर प्रति औंस दर झाला आहे. 

दिल्ली सराफा बाजारात ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्ध सोन्याचा दर प्रत्येकी १५० रुपयांनी घटला आहे. त्यामुळे सोन्याची किंमत ३२,७२० आणि ३२५५० रुपये प्रति  दरा ग्रॅमसाठी झाली आहे. दरम्यान आठ ग्रॅमच्या गिन्नीचा भाव २६,५०० प्रति नगावर स्थीर राहिला आहे. 

शनिवारी सोन्याचे दर ३०० रुपयांनी घटून ३२,८७० रुपये प्रति १० ग्रॅम वर बंद झाला होता. याच दरम्यान चांदीच्या किंमतीतही २५० रुपयांची घट होऊ ३७,३५० रुपये प्रति किलो चांदी झाली होती. साप्ताहिक डिलेव्हरीच्या चांदीचा दर ४१६ रुपये ३६, १६१ रुपये प्रति किलोग्रॅम वर बंद झाला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी