Mumbai Metro 3: मुंबई रेल्वे कॉर्पोरेशन (MMRC) ने मेट्रो ३ च्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात केली असून, शक्य तितक्या लवकर मेट्रो मुंबईकरांच्या सेवेसाठी दाखल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ३१ जानेवारी २०२३ पर्यंत मेट्रो ३ च्या कामाच्या पुनरावलोकन अहवालानुसार एकूण योजनेचे ७९ टक्के कार्य हे पूर्ण झाले आहे.
7th pay commission: सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकार देऊ शकते मोठे गिफ्ट; इतकी वाढेल सॅलरी
या मार्गाचे काम दोन टप्प्यावर सुरू आहे. डिसेंबर २०२३ मध्ये आरे – बीकेसी चा पहिला टप्पा सुरू करण्याचे एम एम आर सी चे लक्ष्य आहे. त्यासाठी या टप्प्याचे कम जलद पातळीवर सुरू आहे, आतापर्यंत या टप्प्याचे ८४ टक्के काम पूर्ण झाले आहे.
पुनरावलोकन अहवालानुसार एकंदरीत योजनेच्या ९०.६ टक्के कामकाज पूर्ण झाले आहे. सिस्टम चे ४६.१ टक्के, रेल्वे रुळा चे ५३.८ टक्के आणि स्थानकांचे ८८.३ टक्के काम पूर्ण झाले आहे. तसेच लेंड रिफॉर्म चे काम जवळपास पूर्ण झाले आहे.
Bank Crisis: अमेरिकेतील बँका दिवाळखोरीत जाण्यामागचं कारण काय? भारतीय बँकांवर काय होणार परिणाम?
आरे – बीकेसी मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे एकूण ८४ टक्के काम पूर्ण झाले आहे. ज्यात स्थानक आणि भुयाराचे ९७.१ टक्के, सिस्टम चे ५९.१ टक्के आणि रुळाचे ७.०६ टक्के काम पूर्ण झाले आहे. यादरम्यान बीकेसी – कफ परेड च्या दुसऱ्या टप्प्याचे ७५.६ टक्के काम पूर्ण झाले आहे. यात मेट्रो स्थानक आणि भुयारचे ९४.५ टक्के, रुळाचे ४४.२ टक्के आणि सिस्टम चे ३९.६ टक्के कम पूर्ण झाले आहे. एकंदरीत कामकाजाचा आढावा घेतल्यास मेट्रो ३ मार्गाच्या बांधकामाला आता वेग आला आहे.