Common Myths of Mutual Funds SIP: नवी दिल्ली : म्युच्युअल फंडातील (Mutual Funds Investment)गुंतवणूक दिवसेंदिवस लोकप्रिय होते आहे. हा गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय आहे. मात्र त्याचबरोबर म्युच्युअल फंडातील गुंतवणूक आणि विशेषत: एसआयपीद्वारे (SIP)केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीसंदर्भात अनेक गैरसमज किंवा मिथक (Myths of SIP)गुंतवणुकदारांमध्ये दिसून येतात. त्यामुळे ते मोठ्या फायद्यापासून वंचित राहतात. ते मोठी संपत्ती निर्मिती (Wealth creation)करू शकत नाहीत. तुम्हीही म्युच्युअल फंड, एसआयपी, गुंतवणुकीबाबत कोणते गैरसमज ठेवले असतील, तर तुम्ही हा लेख नक्की वाचा आणि समजून घ्या. येथे तुमचे सर्व गैरसमज दूर होतील. आज आम्ही तुम्हाला सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपी (SIP) बद्दलच्या अशा मिथकांबद्दल म्हणजे गैरसमजांबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे गुंतवणूक करताना तुमचा गोंधळ उडतो आणि जितका फायदा मिळवता आला पाहिजे तितका तुम्ही मिळवत नाहीत. हे जाणून घेतल्यास तुम्हाला दमदार कमाई करता येणार आहे. (know about these 7 myths of mutual fund SIP & earn good money)
सत्य- जर तुम्हाला असे वाटत असेल की SIP फक्त लहान गुंतवणुकदारांसाठी आहे तर असा विचार करणे पूर्णपणे चुकीचे आहे. SIP ची सुरुवात छोट्या रकमेने येते परंतु नंतर तुम्ही रक्कम वाढवू शकता. तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये 1 लाख रुपये किंवा त्याहून अधिकच्या SIP द्वारे गुंतवणूक देखील करू शकता.
सत्य- SIP म्हणजे सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच ही गुंतवणुकीची एक पद्धत आहे ज्याद्वारे तुम्ही नियमित अंतराने म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून चांगला नफा मिळवता. ही गुंतवणूक योजना नाही. म्युच्युअल फंड कंपन्यांच्या अनेक योजना बाजारात आहेत. त्या सर्वांमध्ये तुम्ही एसआयपीद्वारे गुंतवणूक करू शकता. लक्षात ठेवा की तुम्ही SIP द्वारे एखाद्या म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करता.
अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 14 May 2022: धुमधडाक्यात करा लग्न, सोने झाले स्वस्त...पाहा ताजा भाव
सत्य: लोकांमध्ये एक गैरसमज आहे की जेव्हा बाजारात घसरण होते तेव्हा एसआयपी करावी. पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. जेव्हा तुम्ही दीर्घ कालावधीसाठी एसआयपी करता तेव्हा त्यावर तेजी किंवा घसरण यासारख्या अस्थिरतेचा परिणाम होत नाही. त्यामुळे तुम्ही सातत्यपूर्णरित्या नियमितपणे एसआयपीद्वारे गुंतवणूक केली पाहिजे.
सत्य: जर तुम्हालाही वाटत असेल की तुम्ही SIP द्वारे केलेल्या गुंतवणुकीची रक्कम बदलू शकत नाही, तर या गोंधळातून बाहेर या. एसआयपी ही एक लवचिक गुंतवणूक आहे, ज्यामध्ये तुम्ही तुम्हाला हवे तेव्हा गुंतवणुकीची रक्कम वाढवू किंवा कमी करू शकता. यामध्ये गुंतवणुकीची काल मर्यादाही वाढवली किंवा कमी केली जाऊ शकते.
सत्य- अनेकांमध्ये हा गैरसमज असतो की की जेव्हा शेअर मार्केटमध्ये मंदी असते तेव्हा एसआयपी थांबवावी, परंतु असे अजिबात नाही. जेव्हा तुम्ही पडत्या बाजारात गुंतवणूक करणे थांबवता तेव्हा SIP द्वारे गुंतवणुकीचा उद्देश अयशस्वी होतो. त्यामुळेच बाजारातील चढ उतारांकडे तुम्ही लक्ष देऊ नका. तुम्ही चांगले म्युच्युअल फंड निवडा आणि नियमितपणे एसआयपी सुरू ठेवा.
सत्य- लोकांचा असा विश्वास आहे की जेव्हा ते वर्षानुवर्षे समान एसआयपी रक्कम चालू ठेवतात तेव्हा त्यांना मोठा नफा मिळतो. उलट असे नाही, उलट तुम्ही तुमच्या SIP ची रक्कम वेळोवेळी वाढवत राहिली पाहिजे. दरवर्षी तुमचा पगार जसजसा वाढत जातो तसतशी SIP ची रक्कमदेखील वाढवत नेली पाहिजे.
सत्य- SIP द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्याने तुम्हाला खात्रीशीर परतावा मिळतो हा गैरसमज अनेकांना असतो. तुम्हाला तसे वाटत असेल, तर तसे अजिबात नाही. वास्तविक, म्युच्युअल फंड देखील शेअर बाजाराशी जोडलेले असतात. त्यामुळे बाजारातील चढउतारांचा परिणाम तुमच्या परताव्यावरही होतो. मात्र जेव्हा तुम्ही दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करता तेव्हा या चढ उतारांच्या पलीकडे जाऊन वार्षिक चक्रवाढ वाढीचा लाभ मिळत तुम्हाला फायदा होतो. अर्थात जर दीर्घ कालावधीसाठी बाजारात मंदीच असली आणि तेव्हाच तुम्ही गुंतवणूक काढून घेणार असाल तर तुम्हाला फटका बसू शकतो.
(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)