रोज फक्त ३६७ रुपयांची बचत, मॅच्युरिटीला मिळवा १ कोटींचा फंड

काम-धंदा
Updated May 04, 2021 | 13:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतून तुमचा मोठा फंड वेगाने तयार होऊ शकतो. योग्य म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतून तुम्हाला १२ ते १५ टक्क्यांपर्यतचा परतावा मिळू शकतो. दीर्घ कालावधीत इतका परतावा खूपच फायदेशीर ठरतो.

Investment in Mutual Fund
म्यु्च्युअल फंडात एसआयपीद्वारे गुंतवणूक 

थोडं पण कामाचं

  • म्युच्युअल फंड एसआयपी
  • छोट्या गुंतवणुकीतून मोठी रक्कम
  • दीर्घकालावधीत चांगला परतावा

नवी दिल्ली : जर तुम्हाला कोट्यधीश व्हायचे असेल तर लवकरात लवकर म्युच्युअल फंडात (Mutual Fund) गुंतवणूक सुरू करा. म्युच्युअल फंडात दीर्घकालीन आणि नियमित गुंतवणूक केल्याने तुम्ही मोठी रक्कम उभी करू शकता. या गुंतवणुकीत तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतून तुमचा मोठा फंड वेगाने तयार होऊ शकतो. योग्य म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतून तुम्हाला १२ ते १५ टक्क्यांपर्यतचा परतावा मिळू शकतो. दीर्घ कालावधीत इतका परतावा खूपच फायदेशीर ठरतो.

म्युच्युअल फंडात एकरकमी किंवा एसआयपीद्वारे (SIP) गुंतवणूक करता येते. यासाठी जर तुम्हाला जर रिटायर होण्याआधीच एक कोटी रुपयांचा फंड जमा करायचा असेल तर रोज ३६७ रुपयांची बचत किंवा गुंतवणूक करून तुम्ही हे उद्दिष्ट साध्य करू शकाल.

लवकर व्हा निवृत्त


सर्वसाधारणपणे लोक ६० व्या वर्षी निवृत्त होतात. मात्र अलीकडच्या  काळात ५०व्या वर्षांपर्यतच निवृत्ती घेण्याचाही ट्रेंड सुरू झाला आहे. यानंतर लोक आपल्या बचतीतून आणि गुंतवणुकीतून उभ्या राहिलेल्या रकमेचा आनंद घेत जगतात. जर तुम्हालासुद्धा टेन्शनफ्री आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर २० ते ३० वर्षांच्या वयोगटातच गुंतवणुकीची सवय लावली पाहिजे.

१५ टक्के परताव्याची संधी


म्युच्युअल फंडातील एसआयपी सुरू केल्यावर तुम्ही ४५ ते ५० व्या वर्षापर्यत एक कोटी रुपयांचा फंड उभा करू शकता. यामध्ये तुम्हाला १२ ते १५ टक्के परतावा मिळतो. दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करणे लाभकारक ठरते. यासाठी तुम्हाला २० ते ३० वयोगटातच गुंतवणूक सुरू केली पाहिजे.

कोट्यवधींची रक्कम कशी उभाराल


जर तुम्ही २५ व्या वर्षी म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे गुंतवणुकीची सुरूवात केली आहे आणि तुम्हाला ४५व्या वर्षापर्यत १ कोटी रुपये जमवायचे आहेत तर तुम्हाला दर महिन्याला ११,००० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. म्हणजेच ३६७ रुपयांची रोज बचत करावी लागेल. जर तुम्हाला २० वर्षांच्या कालावधीमध्ये सरासरी १२ टक्के परतावा मिळाला तर तुमची एकूण रक्कम १.०९ कोटी रुपये इतकी होईल.

उदाहरण - 


वय - २५ वर्षे
रिटायरमेंट - ४५ वर्षे
गुंतवणूक कालावधी - २० वर्षे
दरमहा गुंतवणूक - ११,००० रुपये
अंदाजे परतावा - १२ टक्के
गुंतवलेली रक्कम - २६.४ लाख रुपये
एकूण परतावा- ८३.५० लाख रुपये
एकूण रक्कम - १.०९ कोटी रुपये

गुंतवणूक करताना आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखालीच करा. आपली आर्थिक उद्दिष्टे लक्षात घेऊन आर्थिक नियोजन करा. विविध गुंतवणूक पर्यायात गुंतवणूक करून आपला वैविध्यपूर्ण पोर्टफोलियो तयार करा. यामुळे जोखीम आणि परतावा या दोन्हीमध्ये संतुलन राखले जाईल. दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केल्याने तुम्ही भविष्यात मोठी रक्कम उभी करू शकाल. त्याचबरोबर तुम्ही मोठी बचतदेखील करू शकाल. तुम्हाला चांगला परतावा देखील मिळेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी