Mutual Fund Investment | श्रीमंत होण्यासाठी, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना लक्षात ठेवा ही ५ सूत्रे

Mutual Fund Tips | अलीकडच्या काळात म्युच्युअल फंड हा गुंतवणुक प्रकार लोकप्रिय झाला आहे. म्युच्युअल फंडातून पैसा कमावतो येतो, मात्र त्याचबरोबर तुम्हा काही मुद्दे लक्षात घेणे आवश्यक असते. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना काही चुका टाळल्या पाहिजेत.

Mutual Fund Tips
म्युच्युअल फंड टिप्स 
थोडं पण कामाचं
  • म्युच्युअल फंडांचे विविध पर्याय उपलब्ध, तुमच्या गरजेनुरुप निवडणे महत्त्वाचे
  • सर्वसामान्य गुंतवणुकदारांना सुरक्षितता आणि चांगला परतावा देणारा पर्याय
  • म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना काही बाबी लक्षात घेणे महत्त्वाचे

Mutual Fund Investment | मुंबई:  श्रीमंत होण्यासाठी गुंतवणूक करणे फारच महत्त्वाचे आहे. गुंतवणुकीचे विविध पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. हे पर्याय निवडताना आपले उत्पन्न, बचत, जोखीम क्षमता, भविष्यातील गरजा लक्षात घेणे आवश्यक ठरते. अलीकडच्या काळात म्युच्युअल फंड हा गुंतवणुक प्रकार लोकप्रिय झाला आहे. विविध उत्पन्न गटातील गुंतवणुकदार यामध्ये गुंतवणूक करत आहेत. आवश्यकतेनुसार विविध प्रकारच्या म्युच्युअल फंडांचे विविध पर्याय उपलब्ध असल्याने गुंतवणूकदार या गुंतवणुकीकडे (Investment) वळताना दिसत आहेत. त्यातच शेअर बाजाराचे (Share market) ज्ञान नाही, बाजारातील अस्थिरतेला हाताळता येत नाही, मोठी रक्कम हाती नाही अशा अडचणी अनेक सर्वसामान्य गुंतवणुकदारांसमोर असतात. या सर्व प्रश्नांवर म्युच्युअल फंडातील (Mutual Fund) गुंतवणूक पर्याय ठरत असल्यामुळे सर्वसामान्य गुंतवणुकदारांसाठी हा एक चांगला पर्याय (Investment Option) आहे. म्युच्युअल फंडातून पैसा कमावतो येतो, मात्र त्याचबरोबर तुम्हा काही मुद्दे लक्षात घेणे आवश्यक असते. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना काही चुका टाळल्या पाहिजेत. संपत्ती निर्मितीसाठी (Wealth creation) योग्य पद्धतीने गुंतवणूक करणे सर्वात महत्त्वाचे असते. (Mutual Fund Tips : Top points to be considered while investing in Mutual Funds)

म्युच्युअल फंडांचा पोर्टफोलिओ

नियमितपणे गुंतवणूक करत संपत्ती निर्मिती करण्यासाठी म्युच्युअल फंड चांगला पर्याय आहेत. तुमचे आर्थिक उद्दिष्ट अल्पकालीन आहे की दीर्घकालीन, जोखीम क्षमता, उत्पन्न यासारख्या असंख्य बाबींवर तुम्ही गुंतवणूक कशी करायची हे अवलंबून असते. बऱ्याचवेळा एकाच प्रकारच्या अनेक योजनांमध्ये गुंतवणूकदारांनी पैसा गुंतवलेला असतो. त्यामुळे अपेक्षित असलेला लाभ त्यांना मिळत नाही. गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ व्यवस्थित बनवणे खूपच आवश्यक असते. गुंतवणूक करताना काही चुका टाळण्यात आल्या पाहिजेत. अन्यथा त्याचा परिणाम तुमच्या परताव्यावर आणि आर्थिक उद्दिष्टांवर होतो. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना कोणत्या बाबी लक्षात घ्यायच्या ते पाहूया.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतानाची महत्त्वाची सूत्रे - 

  1. इक्विटी म्युच्युअल फंड हा प्रकार दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आहे. कारण इक्विटी म्यु्च्युअल फंडाद्वारे शेअर बाजारात गुंतवणूक केली जात असल्याने, बाजारातील अस्थिरतेचा म्युच्युअल फंडांच्या कामगिरीवरदेखील परिणाम होत असतो. बाजारातील चढउतारांनी घाबरून जाऊन तुमची गुंतवणूक घाईघाईने काढून घेऊ नका. सातत्याने दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करत राहा.
  2. म्युच्युअल फंडातील वेगवेगळे प्रकार लक्षात घ्या. डेट आणि इक्विटी हे दोन मुख्य प्रकार म्युच्युअल फंडात असतात. आपले आर्थिक उद्दिष्ट, वयोगट, जोखीम क्षमता या बाबी लक्षात घेऊन दोन्ही प्रकारच्या योजनांमध्ये गुंतवणूक करावी. डेट फंडांच्या तुलनेत इक्विटी प्रकारात परतावा अधिक असतो. मात्र त्याचबरोबर डेट फंडांच्या तुलनेत इक्विटीमध्ये जोखीमदेखील अधिक असते. त्यामुळेच यामुळे दोन्ही प्रकारच्या योजनांचा समतोल आपल्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओत ठेवावा. फक्त एकाच प्रकारच्या योजनांमध्ये पैसा गुंतवणे जोखमीचे ठरते.
  3. सावधपणे गुंतवणूक करा मात्र अकारण सुरक्षतितेलाच अती महत्त्व देऊ नका. शक्य असेल तिचे विचारपूर्वक जोखीम घ्या. जर तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल, उत्पन्न चांगले असेल किंवा तुम्ही तरुण असाल तर इक्विटीसारख्या तुलनेने जोखमीच्या पर्यायाची तुम्ही निवड केली पाहिजे कारण यातूनच संपत्ती निर्मिती होत असते. म्हणूनच तरुण वयातच गुंतवणूक करणे श्रेयस्कर ठरते. कारण तुम्ही जास्त जोखीम घेऊ शकता. जोखीम आणि परतावा या एकमेकाशी निगडीत बाबी आहेत.
  4. अल्पकालीन आर्थिक उद्दिष्टांसाठी डेट प्रकारातील फंड योग्य असतात. अल्पकालीन म्हणजे दोन ते तीन वर्ष किंवा पाच वर्षांचा कालावधी. तर दीर्घकालीन म्हणजेच पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी गुंतवणूक करावयाची असल्यास इक्विटी प्रकार योग्य ठरतो. डेट प्रकाराच्या तुलनेत इक्विटी प्रकारात परतावा अधिक असला तरी अस्थिरता आणि जोखीमदेखील अधिक असते. त्यामुळेच दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी इक्विटी प्रकाराची निवड करावी. आपली आर्थिक उद्दिष्टे लक्षात घेऊनच प्रकार निवडावा.
  5. नव्याने सुरूवात करणाऱ्यांनी टप्प्याटप्प्याने पुढे सरकावे. म्युच्युअल फंडातील बारकावे समजूत घेत गुंतवणूक वाढवत न्यावी. एकदम मोठी गुंतवणूक केली म्हणजे चटकन मोठा फायदा होईल अशा भ्रमात राहू नये. सुरूवातील सोप्या प्रकारात गुंतवणूक करावी. मग हळूहळू जास्त जोखमीच्या आणि जास्त परतावा देणाऱ्या प्रकाराकडे वळावे. यातून गुंतवणुकीतील बारकावे समजतात आणि शिस्तबद्धपणे गुंतवणूक होते. आपल्या गुंतवणूक सल्लागाराचे मार्गदर्शन घेण्यास कुचराई करू नका.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी