Mutual Fund Investment | नेगेटीव्ह कम्पाउंडिंग काय असते? म्युच्युअल फंडात गुंतवणुकदारांनी काय करावे?

Mutual Fund Negative Compounding | म्युच्युअल फंडात आपण जेव्हा दीर्घकालावधीसाठी गुंतवणूक करतो तेव्हा आपल्या गुंतवणुकीवर आपल्याला दरवर्षी एक परतावा मिळत असतो. प्रत्येक म्युच्युअल फंड स्कीम वेगवेगळा परतावा दरवर्षी देत असते. अनेकवेळा गुंतवणुकदारांनी एकापेक्षा जास्त विविध प्रकारच्या म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक केलेली असते. गुंतवणुकीत वैविध्य आणण्यासाठी हे आवश्यकदेखील असते.

Mutual Fund Investment
म्युच्युअल फंडात गुंतवणूक कशी करावी 
थोडं पण कामाचं
  • म्युच्युअल फंडांच्या बाबतीत नेहमी दीर्घकालीन गुंतवणुकीचा सल्ला
  • दीर्घकालावधीसाठी गुंतवणूक केल्याने कम्पाउंडिंग म्हणजे चक्रवाढ वृद्धीचाही फायदा
  • कम्पाउंडिंगमुळे जसा मोठा फायदा होतो, त्याच्याच नेमकी उलटीदेखील एक स्थिती असते ज्याला नेगेटीव्ह कम्पाउंडिंग म्हणतात

Mutual Fund Negative Compounding | नवी दिल्ली : म्युच्युअल फंडातील (Mutual Fund) गुंतवणूक अलीकडच्या काळात खूप लोकप्रिय झाली आहे. म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचा (Mutual Fund Investment)चांगला पर्याय आहेत. अर्थात काही अल्पकालीन आर्थिक उद्दिष्टे सोडल्यास म्युच्युअल फंडांच्या बाबतीत नेहमी दीर्घकालीन गुंतवणुकीचा (Long Term Investment)सल्ला दिला जातो. कारण दीर्घकालावधीसाठी गुंतवणूक केल्याने अधिक रकमेची तर गुंतवणूक होतेच, मात्र त्याचबरोबर कम्पाउंडिंग (Compounding)म्हणजे चक्रवाढ वृद्धीचाही फायदा गुंतवणुकदारांना होतो. शिवाय दीर्घकालात मोठी रक्कम उभारण्यासाठी इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली जात असल्याने, त्यात शेअर बाजारातील (Share Market)चढ उताराच्या जोखमीचाही समावेश असतो. अशावेळी दीर्घकालीन गुंतवणुकच योग्य ठरते. मात्र कम्पाउंडिंगमुळे जसा मोठा फायदा होतो, त्याच्याच नेमकी उलटीदेखील एक स्थिती असते ज्याला नेगेटीव्ह कम्पाउंडिंग (Negative Compounding)म्हणतात. नेगेटीव्ह कम्पाउंडिंग काय असते, त्याला कसे हाताळते, तुमचा पोर्टफोलिओ कसा सांभाळायचा हे जाणून घेऊया. (Mutual Fund Investment : What is Mutual Fund Negative Compounding? how to handle it?)

नेगेटिव्ह कम्पाउंडिंग काय असते?

म्युच्युअल फंडात आपण जेव्हा दीर्घकालावधीसाठी गुंतवणूक करतो तेव्हा आपल्या गुंतवणुकीवर आपल्याला दरवर्षी एक परतावा मिळत असतो. प्रत्येक म्युच्युअल फंड स्कीम वेगवेगळा परतावा दरवर्षी देत असते. अनेकवेळा गुंतवणुकदारांनी एकापेक्षा जास्त विविध प्रकारच्या म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक केलेली असते. गुंतवणुकीत वैविध्य आणण्यासाठी हे आवश्यकदेखील असते. समजा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तीन म्युच्युअल फंड योजना आहेत. पहिल्या म्युच्युअल फंड योजनेने तुम्हाला वार्षिक २० टक्के परतावा दिला, दुसऱ्या म्युच्युअल फंड योजनेतून तुम्हाला वार्षिक १० टक्के परतावा मिळाला आणि तिसऱ्या योजनेतून तुम्हाला उणे १० दहा टक्के परतावा मिळाला. म्हणजेच तिसऱ्या स्कीममधून तुम्हाला परतावा मिळाला नाहीच उलट तुमचे भांडवल १० टक्क्यांनी कमी झाले. अशावेळी एकत्रितरित्या तिन्ही योजनांमधून मिळालेल्या परताव्याचा विचार करता एकूण २० टक्केच परतावाच तुम्हाला मिळाला. कारण तिसऱ्या योजनेत उणे १० टक्के परतावा मिळाल्यामुळे दुसऱ्या योजनेतून मिळालेला परताव्याचा फायदा त्यामुळे निघून गेला. अशा प्रकारे एखादी योजना जर तुम्हाला नेगेटिव्ह परतावा देत असेल तर तुम्हाला अपेक्षित रक्कमेची उभारणी करता येणार नाही. कारण एका बाजूला तुम्हाला फायदा होत असताना दुसरीकडे तोटा होत असतो.

नेगेटीव्ह कम्पाउंडिंगवर मार्ग काय?

नेगेटीव्ह कम्पाउंडिंगचा तोटा टाळण्यासाठी नेहमी ठराविक अंतराने म्हणजे काही महिन्यांनी किंवा वर्षभराने आपल्या म्युच्युअल फंड योजना कशी कामगिरी करत आहेत, त्यातून आपल्याला किती परतावा मिळतो आहे याचा आढावा घ्यावा. यालाच पोर्टफोलिओ रिव्हूव करणे असे म्हणतात. ज्या योजनांमधून तुम्हाला नफा होत असेल, चांगला परतावा मिळत असेल त्या तशाच सुरू ठेवाव्यात. मात्र ज्या योजना नेगेटिव्ह परतावा देत आहेत म्हणजेच ज्यातून तोटा होत आहे, त्या योजनांमध्ये भविष्या मोठी तेजी येईल, त्यातून आपण खूप नफा कमवू अशी अपेक्षा ठेवण्याऐवजी त्या योजनेतून बाहेर पडणचे योग्य ठरते. म्हणजेच अशा योजनांमधील आपली गुंतवणूक काढून घ्या आणि दुसऱ्या एखाद्या चांगल्या परतावा देणाऱ्या योजनेत तुमची गुंतवणूक सुरू करा. यालाच पोर्टफोलिओ हाताळणे असे म्हणतात. अर्थात तुमची योजना चांगला परतावा देत नाही हे तुम्ही वर्षभराच्या कामगिरीचा आढावा घेऊन आणि त्याआधीच्या वर्षांची त्याची कामगिरी बघूनच हा निर्णय घ्यायचा असतो.

ऐकीव माहितीवर गुंतवणूक करू नका

या प्रकारच्या अडचणींना तोंड देण्याची वेळ येऊ नये यासाठी म्युच्युअल फंड योजना निवडताना एजन्टने सांगितली म्हणून किंवा कोणतीही सूचवली म्हणून न निवडता, त्या योजनेची मागील काही वर्षातील कामगिरी काय आहे, त्या फंडाने कशात गुंतवणूक केली आहे याचा अभ्यास करणेच योग्य ठरते. ज्या फंडाच्या कामगिरीत सातत्य नाही किंवा ज्याची कामगिरी मागील तीन ते पाच वर्षात चांगली झालेली नाही अशा फंडांपासून दूर राहावे.

गुंतवणूक करताना जास्तीचे प्रयोग टाळा

गुंतवणूक करताना जास्त परतावा मिळवण्याच्या नादात जास्तीचे प्रयोग करणे टाळले पाहिजे. त्याचबरोबर ज्या योजनेत तुम्ही गुंतवणूक करणार आहात त्याचा योग्य तो आढावा, अभ्यास नक्की केला पाहिजे. कारण त्यामुळे तुमच्या पोर्टफोलिओला स्थैर्य येते. अनावश्यक प्रयोग केल्यामुळे तुमचा पोर्टफोलिओ अस्थिर होतो आणि फायदा होण्याऐवजी तुमचे पैसे बुडण्याचीच शक्यता जास्त असते. शिवाय या प्रकारच्या दृष्टीकोनामुळे तुम्हाला दीर्घकालात मोठी रक्कम उभारता येत नाही. त्यामुळे तुमचे आर्थिक उद्दिष्ट, जोखीम क्षमता, तुमचे वार्षिक उत्पन्न, तुमच्यावरील जबाबदाऱ्या, तुमचे वय यासारख्या बाबी लक्षात घेऊन आणि आर्थिक सल्लागाराच्या मदतीनेच गुंतवणुकीचा निर्णय घेणे श्रेयस्कर ठरते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी