7th Pay Commission : सातव्या वेतन आयोग (7th Pay Commission) अंतर्गत महाराष्ट्र सरकारने (Maharashtra State Government) महागाई भत्त्यात वाढीची (DA Hike) घोषणा केली आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या नोकरदार वर्गाला लवकरच डीएचा (DA) हप्ता मिळण्याची शक्यता आहे. सध्या राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना 31 टक्के दराने महागाई भत्ता (DA Update) मिळत आहे. लवकर यात वाढ होत कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता मिळेल.
‘मनी कंट्रोल’ने दिलेल्या वृत्तानुसार केंद्र सरकारनंतर आता अनेक राज्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे.
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आता 34 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे. त्यानुसार राज्यात देखील सातव्या वेतन आयोग अंतर्गत हप्त्यांद्वारे महागाई भत्ता वाढवला जाईल. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसह जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना 2019 मध्ये 7 व्या वेतन आयोगाच्या कक्षेत आणण्यात आले होते. राज्य सरकारने यापूर्वी सातव्या वेतन आयोगाचे दोन हप्ते दिले असून आता तिसरा हप्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण पाच हत्यात कर्मचाऱ्यांना ही रक्कम दिली जाणार आहे. सरकारच्या या निर्णयाचा जवळपास 17 लाख कर्मचार्यांना फायदा होणार आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तिसऱ्या हप्त्यानुसार ‘ए’ वर्गाच्या अधिकाऱ्यांना 30 ते 40 हजार रुपये मिळतील. ‘बी’ वर्गाच्या अधिकाऱ्यांना 20 ते 30 हजार, ‘सी’ वर्गवाल्यांना 10 ते 15 हजार तर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना 8 ते 10 हजार रुपये इतका लाभ होणार आहे. राज्य सरकारतर्फे मार्च महिन्यात 3 टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवण्यात आला होता. राज्य सरकारकडून हा हप्ता कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात किंवा पीएफ खात्यात जमा केली जाईल. तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात ही रक्कम जमा केली जाईल.