Investment Tips : गुंतवणुकीची दमदार संधी! ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष ऑफर, मिळवा 8.75% पर्यंत व्याज

FD Interest rate : रिझर्व्ह बॅंकेने (RBI) रेपो रेट वाढवल्यानंतर अनेक बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांनी म्हणजे एनबीएफसीने(NBFCs)त्यांच्या मुदतठेवींचे (FD) व्याजदर वाढवले ​​आहेत. अनेक कंपन्यांनी नियमित ग्राहकांसोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर वाढवले ​​आहेत. आज आपण अशाच काही नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांबद्दल पाहणार आहोत ज्या सध्या एफडीवर 8% ते 8.75% पर्यंत सर्वाधिक व्याज देत आहेत.

NBFC FD
एनबीएफसीच्या एफडीमधील गुंतवणूक 
थोडं पण कामाचं
  • अनेक बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांनी म्हणजे एनबीएफसीने(NBFCs)त्यांच्या मुदतठेवींचे (FD) व्याजदर वाढवले
  • काही नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या सध्या एफडीवर 8% ते 8.75% पर्यंत सर्वाधिक व्याज देत आहेत
  • ज्येष्ठ नागरिकांना गुंतवणुकीची चांगली संधी

NBFC Interest rates : नवी दिल्ली : रिझर्व्ह बॅंकेने (RBI) रेपो रेट वाढवल्यानंतर अनेक बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांनी म्हणजे  एनबीएफसीने (NBFC) त्यांच्या मुदतठेवींचे (FD) व्याजदर वाढवले ​​आहेत. अनेक कंपन्यांनी नियमित ग्राहकांसोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर वाढवले ​​आहेत. आज आपण अशाच काही नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांबद्दल पाहणार आहोत ज्या सध्या एफडीवर 8% ते 8.75% पर्यंत सर्वाधिक व्याज देत आहेत. ही एक गुंतवणुकीची चांगली संधी आहे. (NBFC's are giving interest rate up to 8.75% on FD for senior citizens)

अधिक वाचा : EPFO Scam: ईपीएफओ ​​अधिकाऱ्यांनीच केला मोठा घोटाळा! खोटे दावे करून पीएफमधून काढले 1000 कोटी

श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स-

श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स 8.75 टक्के व्याज देते आहे. या महिन्याच्या 10 ऑगस्ट रोजी श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्सने त्यांच्या मुदत ठेवी (FD) व्याजदरात वाढ केली आहे. आता श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स सर्वसामान्य नागरिकांना सर्वाधिक 8.25% तर ज्येष्ठ नागरिकांना 8.75% व्याज देत आहे. कंपनी हे व्याज 5 वर्षांच्या मुदतीच्या FD वर देत आहे. याशिवाय, कंपनी ज्येष्ठ नागरिकांना सामान्य ग्राहकांपेक्षा 0.50 टक्के अधिक व्याज देत आहे.

अधिक वाचा : Government Scheme: शेतकऱ्यांसाठी जबरदस्त योजना, मिळणार 1.60 लाख रुपये! जाणून घ्या काय आहे योजना?

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक-

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक FD वर 8.25 % पर्यंत व्याज देते आहे. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेने 12 ऑगस्टपासून त्यांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरातही वाढ केली आहे. बँकेने 700 दिवसांपासून ते 5 वर्षे मुदतीच्या कालावधीसाठी 2 कोटींपर्यंतच्या मुदतीच्या व्याजदरात वाढ केली आहे. बँक आता सर्वसामान्य नागरिकांना 7.50% आणि ज्येष्ठ नागरिकांना 75 बेसिस पॉइंट अधिक म्हणजे 8.25% व्याज देईल. बँकेने असेही म्हटले आहे की ज्येष्ठ नागरिकांना नियमित ग्राहकाकडून कोणत्याही कालावधीसाठी अतिरिक्त 75 बेस पॉइंट्स किंवा 0.75 टक्के व्याज मिळतील.

जन स्मॉल फायनान्स बँक -

जन स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांना 8.15% व्याज देत आहे. त्यानंतर जन स्मॉल फायनान्स बँकेने मुदत ठेवींवर (FD) व्याजदरात वाढ केली आहे. बँक आता 3 दिवस ते 5 वर्षांच्या कालावधीसाठी केलेल्या FD वर सामान्य नागरिकांसाठी 7.35% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 8.15% व्याज देईल. जन स्मॉल फायनान्स बँकेनेही ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या FD वरील व्याजदरात 80 आधार अंकांची वाढ केली आहे. बँकेचे नवीन वाढलेले दर 15 जूनपासून लागू होणार आहेत.

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 23 August 2022: भारतात आज सोन्याचे भाव एका महिन्यातील नीचांकीवर, चांदी आणखी घसरली, चेक करा ताजा भाव

अर्थात बॅंकांच्या तुलनेत एनबीएफसीमधील गुंतवणुकीवर जरी जास्त व्याजदर मिळत असले तरी बॅंकांच्या तुलनेत एनबीएफसीमधील गुंतवणुकीतील जोखीमदेखील जास्त असते. आपली जोखीम क्षमता लक्षात घेऊनच गुंतवणुकीचा प्रकार निवडला पाहिजे. गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ नेहमी वैविध्यपूर्ण असला पाहिजे.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी