EPFO Update : पैसा हवाय? मग UAN नंबरशिवाय PFअकाऊंटवरून काढा पैसे; जाणून घ्या प्रक्रिया

काम-धंदा
भरत जाधव
Updated Jan 12, 2023 | 10:49 IST

EPFO Update : प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनच्या (Provident Fund Organization) नियमांनुसार, दरमहा कर्मचार्‍यांच्या पगारातून कापल्या जाणार्‍या रकमेपैकी, जे पीएफ खात्यात जाते, 8.3 टक्के कर्मचारी पेन्शन योजनेत (Employee Pension Scheme)आणि 3.67 टक्के रक्कम दरमहा ईपीएफमध्ये जमा होतं असते.

Need money? But how to withdraw money from PF?
पैशांची गरज पडलीय? पण PF मधील पैसा काढायचा कसा?   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • तुम्हाला पैशांची गरज असली तर तुम्ही ही रक्कम काढू शकतात.
  • जर तुमच्याकडे युएन नंबर नसेल तरीही तुम्ही पैसे काढू शकणार आहात.
  • नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 011-229014016 वर मिस कॉल देऊन पीएफची रक्कम तपासू शकता.

मुंबई : नोकरदारांच्या पगारातील (salary) काही भाग पीएफ (PF) म्हणून कापला जातो. गरज भासल्यास तुम्ही हे पैसे काढू शकता. प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनच्या (Provident Fund Organization) नियमांनुसार, दरमहा कर्मचार्‍यांच्या पगारातून कापल्या जाणार्‍या रकमेपैकी, जे पीएफ खात्यात जाते, 8.3 टक्के कर्मचारी पेन्शन योजनेत (Employee Pension Scheme)आणि 3.67 टक्के रक्कम दरमहा ईपीएफमध्ये जमा होतं असते.  (Need money? Then withdraw money from PF account without UAN number; Learn the process)

अधिक वाचा  : टीम इंडिया सीरिज जिंकणार? जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन

तुम्हाला पैशांची गरज असली तर तुम्ही ही रक्कम काढू शकतात. पीएफमध्ये आपले खाते उघडल्यानंतर ईपीएफओ आपल्याला एक युएन नंबर देत असते. जर आपल्याला पीएफ खात्यातील पैसे काढायचे असतील तर युएन नंबर खूप महत्त्वाचा असतो. या नंबरशिवाय आपल्याला पैसे काढता येत नाही. परंतु नवीन आलेल्या अपडेटनुसार, जर तुमच्याकडे युएन नंबर नसेल तरीही तुम्ही पैसे काढू शकणार आहात. युएन नंबर नसेल तर पैसे काढायचे हे आपण जाणून घेणार आहोत. 

 नेमकी किती रक्कम आहे जाणून घ्या या पद्धतीने 

EPFO च्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ही रक्कम पाहू शकता. यासाठी तिथं तुम्ही फक्त Universal Account Number (UAN) देणं गरजेचं आहे.  हा नंबर टाईप केल्यानंतर सुरु होणाऱ्या विंडोवर तुम्ही "For Employees"वर क्लिक करणं अपेक्षित आहे. इथून तुम्ही "Member Passbook" या पर्यायावर या. मग आता तुम्हाला खात्यातील पैशांची माहिती दिसेल. तुम्ही ईपीएफओच्या अॅपवरूनही पीएफ खात्यातील रक्कम पाहू शकता.

यासाठी तुम्ही सर्वप्रथम EPFO वर नोंदणी करून तिथं तुमचा युएएन नंबर लिंक करणं अपेक्षित असेल. आणखी एक सोपी पद्धत म्हणजे 7738299899 या क्रमांकावर एसएमएस पाठवून रक्कम पाहणं. तुम्ही UAN आणि बँक अकाऊंट नंबरमधील शेवटचे चार आकडे इतकी माहिती देणं अपेक्षित असते. पण, यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक पीएफ खात्याशी लिंक असेल याची काळजी घ्या.  Umang app या इंटिग्रेटेड सरकारी अॅपमधूनही तुम्ही पीएफ खात्यातील रक्कम पाहू शकता. 

अधिक वाचा  : उर्फीच्या च्या मदतीला अमृता फडणवीस आल्या धावून

UAN नंबरशिवाय PF अकाऊंटवरून काढता येतील पैसे

बहुतेक कर्मचार्‍यांकडे त्यांचा UAN क्रमांक असतो, परंतु कंपनी बंद झाल्यानंतर काही लोकांकडे हा क्रमांक नसतो. तुमच्याकडे UANनंबरही नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. कारण तुम्ही तुमच्या मोबईलद्वारे पीएफमधील पैशांची माहिती तसेच तो पैसा काढता येणार आहे.  तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 011-229014016 वर मिस कॉल देऊन पीएफची रक्कम तपासू शकता. 

अधिक वाचा  : सदा सरवणकरांच्या अडचणीत वाढ होणार

 पैसा कसा मिळेल
 

  • UAN नंबरशिवाय पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी तुम्हाला स्थानिक पोस्ट
  • ऑफिसमध्ये जावे लागेल.
  • येथे एक नॉन कंपोझिट फॉर्म भरावा लागेल. 
  •  यानंतर तुम्ही PF खात्यातून पैसे काढू शकाल.

जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पैसे काढत असाल तर तुम्हाला UAN क्रमांक, पॅन कार्ड आणि आधार कार्ड क्रमांक आवश्यक असेल. त्यानंतरच तुम्ही पैसे काढू शकाल. ईपीएफओने (EPFO) पीएफ खात्यातून ऑनलाइन पैसे (Online Money) काढण्याची सुविधाही दिली आहे. 

अशाप्रकारे काढू शकता पैसे 

  • सर्वप्रथम https://unifiedportal-mem.epfindia.gov.in या लिंकवर जा. 
  • येथे तुम्हाला ऑनलाइन सेवेवर (Online Services) क्लेम फॉर्म दिसेल, येथे तुम्हाला Form-31,19,10C आणि 10D दिसेल.
  • तुमचा बँक अकाउंट नंबर पूर्ण टाका आणि (Verify) पडताळणी करून घ्या यानंतर Proceed for Online Claim वर क्लिक करा.
  • ड्रॉप डाउनमधून पीएफ ऍडव्हान्स चा पर्याय निवडा (फॉर्म 31) आता तुम्हाला ज्या कारणासाठी पैसे हवे असतील, ते कारण निवडा.
  • जे रक्कम काढायची ती रक्कम प्रविष्ट करा आणि चेकची किंवा बँक पासबुक (Cheque or Bank Passbook) स्कॅन केलेली प्रत अपलोड करा. 
  • नंतर तुमचा पत्ता त्या समाविष्ट करा.
  • Get Aadhaar OTP वर क्लिक करा आणि आधार लिंक केलेल्या मोबाईलवर आलेला OTP (One Time Password) टाका.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी