NEET Result : NEET परीक्षेची उत्तरपत्रिका निकालाआधीच जाहीर, अशाप्रकारे करा डाऊनलोड, कुठे पाहता येणार तुमचा निकाल

काम-धंदा
भरत जाधव
Updated Aug 30, 2022 | 14:26 IST

वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या NEET UG परीक्षेचा निकाल 7 सप्टेंबरपर्यंत जाहीर केला जाणार आहे. तर उत्तरपत्रिका (Answer Key) 30 ऑगस्टपर्यंत म्हणजे आज जाहीर करण्यात आली आहे.

NEET Exam Answer Key announced before the result, download it
NEET परीक्षेची Answer Key निकालाआधीच जाहीर, असं करा डाऊनलोड  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (एनटीए) अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली
  • विद्यार्थी आजपासून आपल्या आक्षेप नोंदवू शकतात.
  • आक्षेप नोंदविण्यासाठी साधरण 24-48 तासाची मुदत मिळणार

NEET Result, Answer Key Date : मुंबई : वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या NEET UG परीक्षेचा निकाल 7 सप्टेंबरपर्यंत जाहीर केला जाणार आहे. तर उत्तरपत्रिका (Answer Key) 30 ऑगस्टपर्यंत म्हणजे आज जाहीर करण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (एनटीए) अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. NEET उमेदवार neet.nta.nic.in वर भेट देऊन उत्तरपत्रिका आणि निकाल तपासण्यास सक्षम असतील.  (NEET Exam answer key published, Download here, where you get your result )

NTA ने अधिसूचना जारी केली आहे की, NEET उमेदवारांना आक्षेप घेण्याची संधी देखील मिळेल. विद्यार्थी आजपासून आपल्या आक्षेप नोंदवू शकतात, परंतु आक्षेप नोंदविण्यासाठी साधरण 24-48 तासाची मुदत मिळणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना प्रति प्रश्न 200 रुपये मोजावे लागतात. याशिवाय, रेकॉर्डेड रिस्पॉन्स चॅलेंज (प्रति प्रश्न 200 रुपये) मिळवण्याचीही संधी असेल.  

Read Also : कमाईत Six मारण्यासाठी Hardikकडे मोठं-मोठ्या ब्रँडची रांग

दरम्यान, यंदा परीक्षेला 95 टक्के रजिस्टर विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. ही आतापर्यंतची उच्चांकी संख्या असून यावर्षी परीक्षेसाठी एकूण 18,72,329 उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 10.64 लाख विद्यार्थिनी होत्या. देशात प्रथमच 18 लाखांहून अधिक उमेदवारांनी राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा (NEET) साठी नोंदणी केली होती. 2021 च्या तुलनेत परीक्षार्थींच्या संख्येत 2.5 लाखांनी वाढ झाली आहे. NEET-UG परीक्षा 17 जुलै रोजी देशाबाहेरील 14 शहरांसह एकूण 497 शहरांमधील 3,570 केंद्रांवर घेण्यात आली.   

Read Also : बेळगावातील मराठी भाषिकांना न्याय मिळणार?

NEET Answer Key कशी डाउनलोड करायची

  • NEET Answer Key रिलीज झाल्यानंतर, neet.nta.nic.in या वेबसाइटला भेट द्या.
  • NEET आंसर की 2022 वर क्लिक करा.
  • तुमचा अर्ज क्रमांक, पासवर्ड इत्यादीसह लॉगिन करा आणि आवश्यक तपशील भरा.
  • तपशील भरल्यानंतर, सबमिट केल्यानंतर आंसर की तुमच्या समोर असेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी