‘एनईएफटी’द्वारे व्यवहार करता का? मग ही बातमी तुमच्यासाठी

काम-धंदा
Updated Dec 16, 2019 | 13:37 IST | टाइम्स नाऊ मराठी

आजपासून (१६ डिसेंबर) ‘एनईएफटी’च्या बाबतीत काही बदल होत आहेत. तुम्ही आता कोणत्याही वेळी दिवसातील २४ तास ‘एनईएफटी’ मार्फत पैशाची देवाणघेवाण करू शकता.

‘एनईएफटी’द्वारे व्यवहार करता का? मग ही बातमी तुमच्यासाठी
NEFT transfer online service available 24 hours from today   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसातील २४ तास ‘एनईएफटी’ मार्फत पैशाची देवाणघेवाण करू शकता.
  • ही सुविधा केवळ ऑनलाईन एनईएफटी करणाऱ्यांसाठी उपलब्ध आहे.
  • आज सोमवारपासून ही सुविधा दिवसरात्र सुरू असणार आहे.

मुंबई: बॅकेतील व्यवहारात सामान्यपण एनईएफटी आणि आरटीजीएस याद्वारे मोठी रक्कम पाठविली जाते. यापैकी तुम्ही जर ‘एनईएफटी’मार्फत पैशांची देवाणघेवाण करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आजपासून (१६ डिसेंबर) ‘एनईएफटी’च्या बाबतीत काही बदल होत आहेत. तुम्ही आता कोणत्याही वेळी दिवसातील २४ तास ‘एनईएफटी’ मार्फत पैशाची देवाणघेवाण करू शकता. ही सुविधा केवळ ऑनलाईन एनईएफटी करणाऱ्यांसाठी उपलब्ध आहे. महत्त्वाचे म्हणजे ही ऑनलाईन सेवा नि:शुल्क असणार आहे. यासाठी तुमच्या ऑनलाईन बॅंकिंग व्यवहाराव्यतिरिक्त कोणतेही इतर शुल्क लागणार नाही.

आज सोमवारपासून ही सुविधा दिवसरात्र सुरू असणार आहे. याआधी फक्त बॅंकेच्या कार्यालयीन वेळेत ‘एनईएफटी’मार्फत व्यवहार करता येत होते म्हणजेच २४ तास ही सेवा उपलब्ध नव्हती. रिझर्व्ह बॅंकेने जारी केलेल्या निवदेनानुसार, ‘एनईएफटी’अंतर्गत आर्थिक व्यवहारांची सुविधा आठवड्यातील सातही दिवस उपलब्ध असणार आहे. ‘एनईएफटी’च्या माध्यमातून एकावेळेला दोन लाख एवढी रक्कम हस्तांतर करता येते.

‘एनईएफटी’अंतर्गत करण्यात येणारे व्यवहार बॅंकिंग यंत्रणेमार्फत कार्यालयीन दिवशी सकाळी आठ वाजल्यापासून ते दुपारी एक वाजेपर्यंत पूर्ण केले जाते. सध्या बॅंकेच्या कामकाजाच्या वेळेनंतर ‘एनईएफटी’चे व्यवहार केल्यास बॅंका आपणहून तो व्यवहार ‘स्ट्रेट थ्रू प्रोसेसिंग’ (एसटीपी) माध्यमात वळता करतात. ‘एनईएफटी’द्वारे व्यवहार केल्यानंतर लाभार्थी खात्यात रक्कम जमा होण्यासाठी किंमान दोन तासांचा अवधी लागतो. हा नियम यापुढेही कायम राहील असेही रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे.

आता ‘एनईएफटी’चे व्यवहार ऑनलाईन बॅंकिंगद्वारे चोवीस तास उपलब्ध करून दिले जाती असे रिझर्व्ह बॅंकेने याआधी ऑगस्ट महिन्यात जाहीर केले होते. १५ डिसेंबर मध्यरात्री बारा वाजल्यापासून चोवीस तास ही सेवा सुरू करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे ही ऑनलाईन सेवा नि:शुल्क असणार आहे. यासाठी तुमच्या ऑनलाईन बॅंकिंग व्यवहाराव्यतिरिक्त कोणतेही इतर शुल्क लागणार नाही. या सेवेमुळे मोठ्या कंपन्या किंवा उद्योगधंदा करणाऱ्या ग्राहकांना मोठा फयदा होणार आहे. तातडीने आर्थिक व्यवहार कराव्या लागणाऱ्यांसाठी ही सेवा अतिशय महत्त्वाची ठरणार आहे.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी