Netflix & Chill : आता नेटफ्लिक्स पहा अवघ्या १५० रुपयांत, कंपनीने सबस्क्रिप्शनचे घटवले दर, वाचा अधिक फीचर

ऍमेझॉन सारखे ओटीटी प्लॅटफॉर्म आपले सबस्क्रिप्शनचे दर वाढवत असताना नेटफ्लिक्सने आपले सबस्क्रिप्शन दर कमी केले आहेत. पूर्वी २०० रुपयांत मिळणारे सब्सस्क्रिप्शन आता अवघ्या १५० रुपयांत मिळणार आहे. Netflix introduce new plant worth 150 and 200

netflix
नेटफ्लिक्स 
थोडं पण कामाचं
  • नेटफ्लिक्सने आपले सबस्क्रिप्शन चार्जेस कमी केले आहेत.
  • १५० रुपयांत तुम्ही नेटफ्लिक्सवरील मूव्हीज आणि वेबसीरीजचा आनंद लुटू शकता
  • इतर सबस्क्रिप्शन दरातही नेटफ्लिक्सने बदल केले आहेत.

ऍमेझॉन (Amazon Prime) सारखे ओटीटी प्लॅटफॉर्म (OTT Platform) आपले सबस्क्रिप्शन दर वाढवत असताना नेटफ्लिक्सने (Netflix) आपले सबस्क्रिप्शन दर कमी केले आहेत. पूर्वी २०० रुपयांत मिळणारे सब्सस्क्रिप्शन आता अवघ्या १५० रुपयांत मिळणार आहे. म्हणजेच १५० रुपयांत तुम्ही नेटफ्लिक्सवरील मूव्हीज आणि वेबसीरीजचा आनंद लुटू शकता. इतकेच नाही तर इतर सबस्क्रिप्शन दरातही नेटफ्लिक्सने बदल केले आहेत.  (Netflix introduce new plant worth 150 and 200)

२०० चे सबस्क्रिप्शन आता दीडशे रुपयांत

नेटफ्लिक्सने भारताचा प्रेक्षकवर्ग समोर ठेवून मोबाईल प्लॅन सुरू केला होता. त्यानुसार २०० रुपयांत ग्राहकांना नेटफ्लिक्सचा कंटेट पाहता येणार होता. हा प्लॅन सुरू केल्यानंतर भारतात त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. कारण मोबाईलमधून चित्रपट आणि वेबसीरीज पाहण्यार्‍यांची संख्या मोठी आहे. आता नेटफ्लिक्सने आपल्या मोबाईल ग्राहकांसाठी आणखी एक खुषखबर दिली आहे. २०० रुपयांत मिळणारा हा प्लॅन आता १५० रुपयांना मिळणार आहे.

२०० रुपयांचा नवा प्लॅन

भारतात उपलब्ध असलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्मपैकी सर्वात महाग सबस्क्रिप्शन नेटफ्लिक्सचे आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण बहुतांश ओटीटीचे वार्षिक सबस्क्रिप्शन २००, ५०० ते हजार रुपयांपर्यंत आहे. आता ऍमेझॉन प्राईम लवकरच आपल्या वार्शिक सबस्क्रिप्शनमध्ये ५०० रुपयांनी वाढ करणार आहे. त्याउलट नेटफ्लिक्सचे वार्षिक सबस्क्रिप्शन उपलब्ध नसून बेसिक सबस्क्रिप्शन ५०० रुपयांपासून सुरू होत होते. आता नेटफ्लिक्सने २०० रुपयांचा नवा प्लॅन आणला आहे. त्यात तुम्हाला नेटफ्लिक्स मोबाईल, टॅब आणि लॅपटॉप आणि टीव्हीवर पाहता येणार आहे. पूर्वीचा २०० रुपयांच्या प्लॅनमध्ये नेटफ्लिक्सचा फक्त मोबाईलमध्ये एक्सेस होता.

नवे दर लागू

नेटफ्लिक्सने आता ५०० रुपयांचे सबस्क्रिप्शन ४९९ रुपयांना देऊ केले आहे. तर ८०० रुपयांचे सबस्क्रिप्शन ६५० रुपयांत केले आहे. ५०० रुपयांच्या सबस्क्रिप्शनमध्ये पूर्वी एक स्क्रीनची मुभा होती. आता ४९९ च्या सबस्क्रिप्शनमध्ये २ स्क्रीनची मुभा देण्यात आली आहे. तसेच ६५० च्या प्लॅनमध्ये पूर्वी ८०० रुपयांच्या सबस्क्रिप्शनच्याच सुविधा लागू आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी