Personal Loan : या कामांसाठी कधीही घेऊ नका पर्सनल लोन, फेडता फेडता होईल पुरेवाट

पर्सनल लोन हे सर्वात सहज उपलब्ध होणारं कर्ज असल्यामुळे ते घेण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र त्यामुळे आपली आर्थिक गणितं बिघडून आर्थिक घडी बिघडण्याची शक्यताच अधिक असते.

Personal Loan
या कामांसाठी कधीही घेऊ नका पर्सनल लोन  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पर्सनल लोन सर्वात सहज उपलब्ध
  • चुकीच्या कारणासाठी कधीही घेऊ नका पर्सनल लोन
  • भरमसाठ व्याजदाराचा बसेल भुर्दंड

Personal Loan : अनेकदा वेगवेगळ्या कारणांसाठी सर्वसामान्यांना बँकेतून कर्ज (bank loan) घेण्याची गरज निर्माण होते. घर घ्यायचं असेल तर (Home Loan) होम लोन, गाडी घ्यायची असेल तर (Car loan) कार लोन, शिक्षणासाठी एज्युकेशन (education loan) लोन घेतलं जातं. याशिवाय अनेक बँका सध्या पर्सनल लोनही (Personal Loan) देऊ करतात. हे कर्ज सर्वात असुरक्षित कर्ज (Insecure loan) असल्याचं मानलं जातं. यासाठी कुठलीही वस्तू तारण ठेवली जात नाही. मात्र या कर्जाचा व्याजदर सर्वाधिक असतो. अनेकदा तर 20 टक्के किंवा त्याहूनही अधिक दराने हे कर्ज दिलं जातं. बँकांकडून हे कर्ज उपलब्ध करून दिलं जात असलं तरी काही कामांसाठी मात्र हे कर्ज बिलकूल घेऊ नये, असा सल्ला अर्थतज्ज्ञांकडून देण्यात येतो. 

मालमत्ता खरेदीसाठी नका घेऊ पर्सनल लोन

मालमत्ता खरेदी करण्यासाठी कधीही पर्सनल लोन घेऊ नये, असा सल्ला दिला जातो. कुठलीही मालमत्ता खऱेदी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सवलती या कर्जात मिळत नाहीत. पर्सनल लोनचा व्याजदरदेखील भरमसाठ असतो. त्यामुळे हे कर्ज डोईजड होण्याची शक्यता असते. 

अधिक वाचा - 7th Pay Commission : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! खात्यात आले डीए थकबाकीचे पैसे, लगेच तपासा

कर्जाच्या जाळ्यात फसू नका

अनेकदा काहीजण क्रेडीट कार्डचं बिल भरण्यासाठी पर्सनल लोन घेतात. क्रेडिट कार्डचा व्याजदर यापेक्षा अधिक असल्याचं सांगत अनेकांना पर्सनल लोन घेऊन क्रेडिट कार्ड बिल भरण्याची कल्पना सुचते. मात्र ही आर्थिकदृष्ट्या आत्मघाती कल्पना असल्याचं सांगितलं जातं. या कर्जाचा एकही हफ्ता तुम्ही चुकवला तरी तुमचा ईबिल स्कोअर खराब होऊ शकतो आणि भविष्यात कुठल्याही प्रकारचं कर्ज मिळवण्यासाठी तुम्ही अपात्र ठरू शकता. शिवाय हफ्ता चुकला तर अव्वाच्या सव्वा व्याजदर तुमच्याकडून आकारला जातो आणि तुम्ही हळूहळू कर्जाच्या विळख्यात अडकायला सुुरुवात होते. 

अधिक वाचा - ITR Filing : प्राप्तिकर विवरणपत्र भरताना मिळेल 2.5 लाख रुपयांची अतिरिक्त सूट, जाणून घ्या कसे

छंद जोपासण्यासाठी नका घेऊ पर्सनल लोन

अनेकांना आपले छंद जोपासण्यासाठी आणि मौजमजा करण्यासाठी पर्सनल लोन घेण्याची सवय असते. महागडा मोबाईल घेण्यासाठी किंवा एखाद्या पर्यटनस्थळी फिरायला जाण्यासाठी लोक कर्ज काढतात. मात्र त्याचा मोठा फटका भविष्यात बसू शकतो. आपण जेव्हा होम लोन घेतो, कार लोन घेतो, तेव्हा त्या गोष्टी या तारण असतात. पैसे फेडता आले नाहीत, तर त्या गोष्टी विकून आपण कर्जातून मुक्त होऊ शकतो. मात्र पर्सनल लोनसाठी अशी कुठलीही वस्तू तारण नसल्याने कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडणं कठीण होऊन बसतं. 

अधिक वाचा -  Gold-Silver Rate Today, 25 July 2022: सोन्यावरील अस्थिरतेचे सावट कायम, चांदीच्या भावातदेखील घसरण, पाहा ताजा भाव

सोय आहे, मात्र जपून…

अनेकदा अत्यावश्यक कारणासाठी सहज उपलब्ध होणारं कर्ज म्हणून पर्सनल लोन ही चांगली सोय ठरते. बऱ्याचदा वैद्यकीय कारणांसाठी किंवा इतर काही तातडीच्या गरजेपायी पैशांची गरज निर्माण झाली, तर एका क्लिकवर उपलब्ध होणारं लोन म्हणून पर्सनल लोन ही मोठी सोय आहे. मात्र त्या सोयीचा नको त्या ठिकाणी वापर केला, तर मात्र भविष्यात आपली मोठी गैरसोय होण्याची शक्यता असते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी