Bank of Baroda Update : महत्त्वाचे! बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी चेकसाठी लागू झाला नवा नियम...जर 'हे' केले नाही तर चेक अडकणार

Bank of Baroda customers : देशातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बॅंक असलेल्या बॅंक ऑफ बडोदाच्या (Bank of Baroda) ग्राहकांच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे. बॅंक ऑफ बडोदाच्या ग्राहकांना आता चेकसंदर्भात मोठी खबरदारी घ्यावी लागणार आहे. आता त्यांच्या चेकची (Cheque) पूर्तता होण्यासाठी त्यांना  महत्त्वाच्या माहिती इलेक्ट्रॉनिक पद्धतीने खातरजमा करून द्यावी लागणार आहे. 5 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या चेकसाठी हा नवा नियम लागू होणार आहे.

New rule for Bank of Baroda customers
बॅंक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी नवा नियम 
थोडं पण कामाचं
  • बॅंक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी
  • बॅंकेच्या ग्राहकांसाठी चेक क्रिअरन्ससाठी लागू होणार नवा नियम
  • 5 लाखांपेक्षा जास्त रकमेसाठी लागू होणार नवा नियम

Bank of Baroda Customers : नवी दिल्ली: देशातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बॅंक असलेल्या बॅंक ऑफ बडोदाच्या (Bank of Baroda) ग्राहकांच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे. बॅंक ऑफ बडोदाच्या ग्राहकांना आता चेकसंदर्भात मोठी खबरदारी घ्यावी लागणार आहे. आता त्यांच्या चेकची (Cheque) पूर्तता होण्यासाठी त्यांना  महत्त्वाच्या माहिती इलेक्ट्रॉनिक पद्धतीने खातरजमा करून द्यावी लागणार आहे. 5 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या चेकसाठी हा नवा नियम लागू होणार आहे. बॅंक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी हा नवा नियम (New rule for Cheque clearance) 1 ऑगस्ट 2022 पासून लागू होणार आहे. आता ग्राहकांना चेक लाभार्थींना देण्यापूर्वी बॅंकेला त्यासंदर्भात महत्त्वाची माहिती इलेक्ट्रॉनिक स्वरुपात द्यावी लागणार आहे. जास्त रकमेचे म्हणजेच 5 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या चेकसाठी हा नवा नियम लागू होणार आहे. ग्राहकाने माहिती दिल्याशिवाय चेक सीटीएस क्लिअरिंगसाठी जाणार नाही. (New rule for Bank of Baroda customers for cheque over Rs 5 lakh)

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 07 July 2022: मजबूत डॉलरने केली सोन्याच्या मुस्कटदाबी, सोन्याच्या भाव किंचित वाढला मात्र थांबली घोडदौड

बॅंक ऑफ बडोदाचा 5 लाखांवरील चेकसाठीचा नियम

"1 ऑगस्ट 2022 पासून  किंवा नंतर प्रदान केलेले 5 लाख रुपयाचे किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या चेकसाठी हे बंधनकारक असणारआहे. याचा अर्थ 5 लाख रुपयाचे किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचे चेक हे जर महत्त्वाची माहिती दिलेली नसल्यास म्हणजे पॉझिटिव्ह पे कन्फर्मेशन दिलेले नसल्यास क्रिअरिंग प्रक्रियेत परत पाठवले जातील, असे बॅंकेने त्यांच्या परिपत्रकात सांगितले आहे.

अधिक वाचा : Children Adhar Card : मुलांचं आधार कार्ड बनवताना या गोष्टी विसरू नका, अन्यथा भविष्यात होईल डोकेदुखी

ग्राहकांना चेकसंदर्भात द्यावी लागणार ही माहिती

बॅंकेने आपल्या ग्राहकांना असेही सांगितले की ते विविध प्रकारे पॉझिटिव्ह पेमेंटसंदर्भाती महत्त्वाची माहिती बॅंकेत देऊ शकतात. बॅंक ऑफ बडोदा वर्ल्ड (मोबाइल बँकिंग), नेट बँकिंग, कॉल सेंटर किंवा भारतातील कोणत्याही बँक ऑफ बडोदा शाखेत भेट देऊन ग्राहकांना हे करता येणार आहे.
पॉझिटिव्ह पेमेंटची खातरजमा करण्यासाठी ग्राहकांना खालील 6 माहिती देणे बंधनकारक असणार आहे.

  1. - चेकची तारीख 
  2. - ज्याला रक्कम द्यायची आहे त्याचे नाव
  3. - रक्कम
  4. - खाते क्रमांक
  5. - चेक क्रमांक 
  6. - ट्रॅन्झॅक्शन कोड

ग्राहकांनी दिलेली माहिती जेव्हा सादर केलेल्या चेकबरोबर जुळेल तेव्हा चेक सीटीएस क्लिअरिंगसाठी पुढे जाऊ शकणार आहे. 

अधिक वाचा : Life Insurance : तुमच्यासाठी किती रकमेचा आयुर्विमा पुरेसा ठरेल? यासाठीची सूत्रे जाणून घ्या

5 लाख रुपयांखालील रकमेच्या चेकसाठी काय?

बॅंक ऑफ बडोदाच्या म्हणण्यानुसार, "50,000 रुपये आणि त्यापेक्षा जास्त रकमेच्या चेकसाठीदेखील ही महत्त्वाची माहिती म्हणजे पॉझिटिव्ह पे कन्फर्मेशन दिली जाऊ शकते. मात्र 50 हजार रुपयांपासून ते  4,99,999.99 रुपयांपर्यतच्या रकमेसाठीच्या चेकसंदर्भात हा नियम ग्राहकांसाठी बंधनकारक नसणार आहे. माहिती देणे हे ग्राहकांसाठी ऐच्छिक असणार आहे.

बॅंक ऑफ बडोदाला पॉझिटिव्ह पे संदर्भात माहिती देण्याचे विविध मार्ग -

मोबाइल बँकिंगद्वारे
ग्राहकांनी त्यांचे लॉग इन क्रेडेन्शियल्स द्यावे> पर्याय निवडा> विनंती सेवा> पॉझिटिव्ह पेची खातरजमा> ऑपरेटिव्ह खाते निवडा> चेक नंबर टाका> उर्वरित अनिवार्य फील्डला भरा. 1. रक्कम 2. देयकाचे नाव 3. तारीख 4. ट्रॅन्झॅक्शन कोड > खातरजमा करा> एमपीआयएन> सबमिट करा.

नेट बँकिंगद्वारे
ग्राहकांनी त्यांचे लॉग इन क्रेडेन्शियल्स द्याव> पर्याय निवडा> सेवा> चेक बुक> केंद्रीकृत पॉझिटिव्ह पे यंत्रणा> अनिवार्य फील्डला प्रतिसाद> 1. ऑपरेटिव्ह खाते निवडा>2. चेक क्रमांक 3. रक्कम 4. देयकाचे नाव आणि तारीख 5. टॅन्झॅक्शन कोड> खातरजमा करा> टॅन्झॅक्शन पासवर्ड> सबमिट करा.

बॅंकेच्या शाखेत भेट देऊन
भारतातील बॅंक ऑफ बडोदाच्या कोणत्याही शाखेत वैयक्तिक भेट देऊन ग्राहक त्यांची पॉझिटिव्ह पे संदर्भातील माहिती देऊ शकतात. त्यांना निर्धारित पद्धतीच्या स्वरूपात बंधनकारक माहिती द्यावी. 

एसएमएस द्वारे
व्हर्च्युअल मोबाइल क्रमांक 8422009988 च्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या जारी केलेल्या धनादेशांवर त्यांची पॉझिटिव्ह पे संदर्भातील माहिती द्यावी लागेल. सर्व माहिती देताना स्पेस असावी आणि देयकाचे कॅपिटल लेटर्समध्ये देण्यात यावे. 

ग्राहक सेवा केंद्राला कॉल करून
ग्राहक ओळख प्रक्रियेनंतर 1800 258 4455 आणि 1800 102 4455 - खालील टोल फ्री नंबरद्वारे ग्राहक पॉझिटिव्ह पे संदर्भातील माहिती प्रदान करू शकतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी