आता बदलणार LPG सिलेंडरच्या होम डिलीव्हरीची सिस्टीम, १ नोव्हेंबरपासून नवा नियम लागू

काम-धंदा
Updated Oct 16, 2020 | 16:37 IST | टाइम्स नाऊ मराठी

Gas cylinder home delievery: गॅस सिलेंडरच्या होम डिलीव्हरीबाबत नवा नियम लागू केला जात आहे. १ नोव्हेंबरपासून हा नवा नियम लागू होतोय. 

lpg cylinder
आता बदलणार LPG सिलेंडरच्या होम डिलीव्हरीची सिस्टीम 

थोडं पण कामाचं

  • सिलेंडरच्या होम डिलीव्हरीची सिस्टीम बदलणार
  • एलपीजी सिलेंडर आता ओटीपीशिवाय मिळणार नाही
  • नव्या सिस्टीमला डिलीव्हरी ऑथेंटिकेशन कोडचे नाव देण्यात आले आहे. 

मुंबई: एलपीजी गॅस सिलेंडरबाबत(new rule for LPG gas cylinder) आता नवा नियम लागू केला जाणार आहे. हा नवा नियम येत्या १ नोव्हेंबरपासून(rule apply from 1 november) लागू केला जाऊ शकतो. एलपीजी सिलेंडर(LPG cylinder) आता ओटीपीशिवाय(OTP) तुम्हाला मिळणारा नाही. यामुळे एलपीजी गॅस सिलेंडरची डिलीव्हरी सिस्टीम बदलली जात आहे. होम डिली्व्हरीची प्रक्रिया आधीसारखी असणार नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार सरकारी तेल कंपन्यांनी नव्या सिस्टीमला लागू करण्याची संपूर्ण तयारी केली आहे. नवी सिस्टीमला डिलीव्हरी ऑथेंटिकेशन कोड(DAC) हे नाव देण्यात आले आहे.

सिलेंडरमधून गॅस चोरी रोखणे हे लक्ष्य

सूत्रांच्या माहितीनुसार, ही नवी सिस्टीम लागू करण्यामागचे ध्येय म्हणजे सिलेंडरमधून केली जाणारी गॅस चोरी रोखणे. यासोबतच सिलेंडरची केली जाणारी हेराफेरी रोखण्यासाठी हा नवा नियम लागू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. ही नवी सिस्टीम सगळ्यात आली पहिल्या १०० स्मार्ट सिटीमध्ये लागू केली जाईल. त्यानंतर इतर शहरांमध्ये हा नियम लागू होईल. याचा पायलट प्रोजेक्ट जयपूरमध्ये सुरू आहे. 

होम डिलीव्हरीची नवी सिस्टीम

सूत्रांच्या माहितीनुसार तेल कंपन्या नव्या सिस्टीमला डिलीव्हरी ऑथेंटिकेशन कोडशी जोडणार आहेत. ज्यामुळे बुकिंग केल्यानंतर रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक कोड पाठवला जाईल. या सिस्टीमअंतर्गत जोपर्यंत तुम्ही डिलीव्हरी बॉयला हा ओटीपी दाखवत नाही तोपर्यंत सिलेंडरची डिलीव्हरी होणार नाही. याचाच अर्थ केवळ सिलेंडर बुक करून भागणार नाही. 

मोबाईल नंबर रजिस्टर्ड करणे गरजेचे

जर एखाद्या ग्राहकाचा मोबाईल नंबर अपडेट नाही आहे तर डिलीव्हरी बॉयकडे अॅप असेल. डिलीव्हरी करताना त्याच्या अॅपच्या मदतीने तुम्ही तुमचा मोबाईल नंबर अपडेट करू शकता. मोबाईल नंबर अपडेट झाल्यानंतर एक कोड जनरेट होईल. मात्र जर तुमचा मोबाईल नंबर गॅस विक्रेत्याकडे अपडे नसेल अथवा रजिस्टर्ड नसेल तरच असे करावे लागेल. यासाठी गॅस एजन्सीमध्ये तुमचा मोबाईल नंबर आणि पत्ता योग्य द्या. ज्यामुळे तुमच्याकडे नीट डिलीव्हरी होईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी