New Rules: 1 ऑक्टोबर 2019 पासून या 10 गोष्टींमध्ये होणार बदल, या नियमात बदल

काम-धंदा
Updated Oct 01, 2019 | 11:17 IST

1 ऑक्टोबर 2019 पासून  काही गोष्टींमध्ये बदल होणार आहे. यात जीएसटी, लोन, लायसन्स याच्याशी संबंधित काही बदल होणार आहेत. येथे बघा या बदलाची पूर्ण यादी. 

1 october
New Rules: 1 ऑक्टोबर 2019 पासून या 10 गोष्टींमध्ये होणार बदल, या नियमात बदल  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

 •  1 ऑक्टोबर 2019 पासून काही मोठे बदल होत आहेत.
 • यात जीएसटी, बँकेचे नियम, लायसन्स यासंबंधीत काही नियम आहेत.
 • . या नियमांमुळे तुमच्या जीवनावर बराच परिणाम जाणवणार आहे.

मुंबईः  1 ऑक्टोबर 2019 पासून काही मोठे बदल होत आहेत. यात जीएसटी, बँकेचे नियम, लायसन्स यासंबंधीत काही नियम आहेत. या नियमांमुळे तुमच्या जीवनावर बराच परिणाम जाणवणार आहे. ऑक्टोबर महिन्यात जीएसटी कौन्सिलनं जे निर्णय घेतले होते ते आजपासून लागू होतील. जीएसटी कौन्सिलनं गोव्यात झालेल्या बैठकीत काही बदल केले होते. याव्यतिरिक्त रिझर्व्ह बँकेनं बँकांना सांगितलं की, त्यांनी त्यांचं कर्ज बाह्य बेंचमार्कशी जोडलं पाहिजे. यासाठी रिझर्व्ह बँकेनं बँकांना 1 ऑक्टोबर 2019 ची डेडलाइन दिली होती. ज्यानंतर काही बँकांनी कर्ज बाह्य बेंचमार्कनी लिंक करण्याची घोषणा केली होती. येथे जाणून घ्या 1 ऑक्टोबर 2019 म्हणजेच आजपासून कोणकोणत्या गोष्टींमध्ये बदल होणार आहे.

 1. SBI च्या क्रेडिट कार्डनं पेट्रोल, डिझेलची खरेदी केल्यावर 0.75 टक्के कॅशबॅक मिळणार नाही आहे. नोटबंदीनंतर एसबीआय कॅशबॅक देत होती. आता ते कॅशबॅक बंद करण्याचा निर्णय एसबीआयनं घेतला आहे. 
 2. हॉटेल्सवरील जीएसटीमुळे दिलासा मिळेल. हॉटेलमध्ये जर 7500 रूपयांपर्यंत बुक केलेली रूम असेल तर त्यावर 12 टक्के जीएसटी लागेल. तर 1 हजार रूपयांपर्यंतच्या रूमवल कोणताच जीएसटी लागणार नाही. 
 3. पेन्शनच्या नियमांमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. 7 वर्ष सर्व्हिस करणारे कर्मचाऱ्यांचं निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना वाढलेली पेन्शन मिळेल.
 4. ड्रायव्हिंग लायसन्स आणि रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटमध्ये मायक्रोचिप लावण्यात येईल. याव्यतिरिक्त यात क्यूआर कोड देखील देण्यात येईल. यासाठी ऑनलाईन प्रकिया होईल. 3 सीटर असलेल्या पेट्रोल, डिझेलच्या वाहनांवरील सेसमध्ये घट होईल. 
 5. एसबीआयच्या काही नियमांमध्ये बदल होतील. एसबीआयकडून मेट्रो शहरांमध्ये 20 फ्री ट्रान्झॅक्शनची सुविधा मिळेल. अन्य शहरांमध्ये 12 फ्री ट्रान्झॅक्शन मिळतील. 
 6. 1 ऑक्टोबरपासून बँकांना आपलं कर्ज बाह्य बेंचमार्कनी लिंक करावं लागेल. एसबीआय, यूनियन बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पीएनबी सारख्या बँकाचे कर्ज रेपो रेटशी लिंक होतील. त्यानंतर तुम्हांला कमी व्याजावर कर्ज मिळेल. 
 7. जीएसटी रिटर्नचा फॉर्म 1 ऑक्टोबर 2019 पासून बदलला जाईल. आता व्यावसायिकांना जीएसटी एएनएक्स- 1 फॉर्म भरावा लागेल. छोट्या व्यावसायिकांसाठी 2020 पासून अनिवार्य केले जाईल. 
 8. 1 ऑक्टोबर 2019 नंतर जी कंपनी भारतात मॅन्युफॅक्चरिंग यूनिट लावेल. त्यांना एकूण 15 टक्के कॉर्पोरेट टॅक्स द्यावा लागेल. सरकारनं हल्लीच कॉर्पोरेट टॅक्समध्ये घट संबंधित घोषणा करताना याची माहिती दिली. 
 9. 1 ऑक्टोबरपासून एमजी हेक्टर कारची पुन्हा बुकिंग होईल. हेक्टर मिड साइज एसयूव्ही आहे. जी 27 जूनला लॉन्च करण्यात आली होती. 
 10. सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड स्मार्टफोन 1 ऑक्टोबर 2019 ला भारतात लॉन्च होईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...