रिपब्लिक वादानंतर BARC कडून न्यूज चॅनेल्सच्या वीकली TRP लिस्टवर तात्पुरती बंदी

काम-धंदा
Updated Oct 15, 2020 | 16:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

TRP Issue: रिपब्लिक वादानंतर BARC टेलिव्हिन रेटिंग पॉईंट आठ ते बारा आठवड्यांसाठी बंदी घातली आहे. तांत्रिक कमिटी याबाबत रिव्ह्यू करणार आहे.

mumbai police
न्यूज चॅनेल्सच्या वीकली TRP लिस्टवर तात्पुरती बंदी 

थोडं पण कामाचं

  • ही बंदी आठ ते बारा आठवड्यांसाठी असू शकते.
  • रिपब्लिक टीव्हीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.
  • दर गुरूवारी  BARC आपला डेटा जाहीर करतात.

मुंबई: ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल (BARC)ने टेलिव्हिन रेटिंग पॉईंट((TRP)अस्थायी काळासाठी बंदी घातली आहे. ही बंदी आठ ते बारा आठवड्यांसाठी असू शकते. काऊंन्सिलची तात्रिक कमिटी TRP प्रसिद्ध करण्याची संपूर्ण प्रोसेस रिव्ह्यू करेल आणि व्हॅलिडेशननंतर पुन्हा सुरू केले जाईल. गेल्या गुरूवारी मुंबई पोलिसांनी दावा केला होता की रिपब्लिकसारखे काही चॅनेल पैसे देऊन टीआरपी वाढवतात. 

BARC इंडिया बोर्डाचे चेअरमन पुनीत गोएंका म्हणाले, सध्याची परिस्थिती पाहता हा निर्णय खूप गरजेचा होता. बोर्डाचे म्हणणे आहे की BARC ला आपल्या कडक प्रोटोकॉलचा रिव्ह्यू केला पाहिजे. या दिशेने सकारात्मक पावले उचलली पाहिजे ज्यामुळे खोट्या टीआरपीच्या घटना पुन्हा घडणार नाहीत. 

BARC चे सीईओ सुनील लुल्ला म्हणाले,आम्ही BARC मध्ये आमची भूमिका संपूर्ण इमानदारीने निभावतो आणि देश जे पाहतो तसाच रिपोर्ट देतो. आम्ही असे पर्याय शोधत आहोत ज्यामुळे बेकायदेशीर कामांवर पूर्णपणे बंदी घातली जाईल. 

सुप्रीम कोर्टाने रिपब्लिक टीव्हीला हायकोर्टात जाण्यास सांगितले

मुंबई पोलिसांकडून समन्स पाठवल्याविरोधात रिपब्लिक टीव्हीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. यावर सुप्रीम कोर्टाने त्यांना बॉम्बे हायकोर्टाकडे जाण्यास सांगितले. कोर्टाने पोलीस आयुक्तांच्या मुलाखत देण्यावरही चिंता व्यक्त केली होती. 

मुंबई पोलिसांनी टीआरपीमध्ये घोटाळा असल्याचा दावा केला होता

मुंबई पोलिसांनी ८ ऑक्टोबरला प्रेस कॉन्फरन्समध्ये चुकीच टीआरपी रॅकेटचा भांडाफोड केल्याचा दावा केला होता. पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सांगितले होते की रिपब्लिक टीव्हीसह तीन चॅनेल्स पैसे देऊन टीआरपी खरेदी करतात तसेच वाढवतात. या प्रकरणी पाच लोकांना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी अटक केलेल्या लोकांनी मान्यही केले की हे चॅनेल पैसे देऊन टीआरपी बदलत होते. तर दुसरीकडे रिपब्लिक मीडिया नेटवर्कने हे आरोप खोटे असल्याचे म्हटले होते. 

काय आहे BARC

BARC एक इंडस्ट्री बॉडी आहे जे जाहिरात,जाहिरात एजन्सीज आणि ब्रॉडकास्टिंग कंपन्या चालवतात. इंडियन सोसायटी ऑफ एडवर्टायजर्स, इंडियन ब्रॉडकास्टिंग फाउंडेशन आणि अॅडव्हर्टायजिंग एजन्सी असोसिएशन ऑफ इंडिया याचे संयुक्त मालक आहेत. 

दर गुरूवारी  BARC आपला डेटा जाहीर करतात. कोणता शो किती लोकांनी पाहिला हे दाखवले जाते. यावर चॅनेलचा जाहिरात रेव्हेन्यू अवलंबून असतो. 

याचा अर्थ संपूर्ण देश काय बघत आहे हे ४५ हजार कुटुंबाच्या टीव्हीवर लावण्यात आलेला डिव्हाईस सांगतो.  BARC या डिव्हाईसची गोपनीयता कायम ठेवतो मात्र यातही छेडछाड केल्याचा आरोप याआधीही लावण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी