Stock Close: घसरणीनंतर शेअरबाजार बंद, सेन्सेक्स 172 अंकांनी खाली, निफ्टी 11,700 अंकाच्या खाली 

Stock Market Close । स्थानिक शेअर बाजार गुरूवारी घसरणीनंतर बंद झाला. BSE च्या 30 शेअरवर आधारित संवेदी सूचकांक  Sensex 172.61  अंकांनी घसरून 39,749.85 अंकांवर बंद झाला.

nifty ends oct series below 11700
घसरणीनंतर शेअरबाजार बंद 

थोडं पण कामाचं

  • स्थानिक शेअर बाजार गुरूवारी घसरणीनंतर बंद झाला.
  • BSE च्या 30 शेअरवर आधारित संवेदी सूचकांक  Sensex 172.61  अंकांनी घसरून 39,749.85 अंकांवर बंद झाला.
  • आजच्या प्रमुख शेअर्समध्ये एशियन पेंट्स, टेक महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, श्री सिमेंट आणि एचसीएल टेकचे शेअर हिरव्या निशाणावर बंद झाले.

नवी दिल्ली :  स्थानिक शेअर बाजार गुरूवारी घसरणीनंतर बंद झाला. BSE च्या 30 शेअरवर आधारित संवेदी सूचकांक  Sensex 172.61  अंकांनी घसरून 39,749.85 अंकांवर बंद झाला. या पूर्वी गेल्या सत्रात Sensex  39922.46 अंकांवर बंद झाला होता. तर NSE चा Nifty 58.80  अंकांच्या घटीसह 11,670.80 अंकांवर बंद झाला.  

आज सकाळी सेन्सेक्स298.36 अंक खाली 39624.10 अंकांवर खुला झाल ा होता. तसेच नॅशनल स्टॉक एक्सेंज चा निफ्टी  96.30 अंकांच्या घटीसह 11633.30 अंकांवर खुला झाला होता. गेल्या सत्रात निफ्टी 159.80 अंकांची घटीसह 11729.60 अंकांवर बंद झाला होता. आज निफ्टीतील 50 शेअर्सपैकी  16 शेअर हिरव्या तर 34 शेअर्स लाल निशााणावर बंद झाले. 

आजच्या प्रमुख शेअर्समध्ये एशियन पेंट्स, टेक महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, श्री सिमेंट आणि एचसीएल टेकचे शेअर हिरव्या निशाणावर बंद झाले. दुसरीकडे एल एंड टी, टायटन, अडाणी पोर्ट्स, ओएनजीसी आणि एक्सिस बँक के शेअर लाल निशाणावर  बंद झाले.  सेक्टोरियल इंडेक्सवर नजर टाकली तर, आज आयटीचे सर्व सेक्टर्स लाल निशाणावर बंद झाले. यात रियल्टी, पीएसयू बँक, बँक, प्राइवेट बँक, फार्मा, मीडिया, एफएमसीजी, ऑटो, फाइनेंस सर्विसेज आणि मेटलचा समावेश आहे. 

स्थानिक बाजारात नरम वातावरण आणि मजबूत डॉलरमुळे गुरुवारी रुपयात घट दिसून आली. रुपया आंतरबँकिंग मुद्रा बाजारात  23 पैसे घसरून 74.10 प्रति डॉलरवर बंद झाला.  आंतरबँकिंग मुद्रा बाजारात रुपया 74.02 प्रति डॉलरवर कमजोर खुला झाला, काही वेळात हा  23 पैसे घसरून 74.10 प्रति डॉलरवर आला. व्यापारादरम्यान, रुपया 73.94 प्रति डॉलरच्या उच्चतम स्तरावर आणि 74.16 प्रति डॉलर खालच्या स्तर आला होता. बुधवारी रुपया 16 पैसे घसरून एक महिन्यापेक्षा अधिक काळावधीसाठी खालच्या स्तरावर 73.87 प्रति डॉलरवर बंद झाला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी